UP Election 2022: मुकेश वर्मांसोबत 3 आमदारांनी BJPला ठोकला रामराम

योगी आदित्यनाथ यांना झटका, आतापर्यंत 7 आमदारांनी दिला भाजपचा राजीनामा
Mukesh Verma
Mukesh VermaDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला अनेक अडथळे येत आहेत. यावेळी शिकोहाबादचे चे आमदार मुकेश वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या 3 दिवसांत 8 आमदारांनी भाजप पक्ष सोडला. ज्या प्रमाणे दारा सिंग आणि स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्षावर दलित, मागास आणि अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्याच प्रमाणे मुकेश वर्मा यांनीही आपल्या राजीनाम्यात दलित, मागास आणि अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पक्षावर केला. (Uttar Pradesh Assembly Election 2022)

प्रसारमाध्यमानी दिलेल्या वृत्तानुसार, भाजप सरकारमध्ये दलित, मागास आणि अल्पसंख्याक समाजातील नेत्यांना कोणताही आदर दिला जात नाही. तसेच भाजप (Bjp) सरकारमध्ये शेतकरी, बेरोजगार आणि छोटे व्यवसायिक हे दुर्लक्षित आहेत. मुकेश वर्मा यांनी म्हटलं आहे की, स्वामी प्रसाद मौर्य हे त्यांचे नेते असून, स्वामी प्रसाद मौर्य यांच्याप्रमाणेच मुकेश वर्मा यांनीही भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Mukesh Verma
Assembly Election 2022: दिल्लीत आज भाजपच्या 300 उमेदवारांच्या नावावर विचारमंथन

7 आमदारांचा भाजपाला राम-राम

उत्तर प्रदेशात विधानसभा (Election) निवडणुक जाहीर झाल्यापासून भाजपाला मोठे धक्के बसले. वभागात ओबीसी नेते दारासिंग चौहान यांनी बुधवारी योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. गेल्या 2 दिवसांत राजीनामा देणारे दारा सिंग हे सहावे नेते आहेत. तर राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केलेले आमदार अवतारसिंग भडाना यांनीही भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. ईतकेच नव्हे तर मौर्यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या तीन आमदारांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली. तर काँग्रेस (Congress) आमदार नरेश साईनी आणि सपाचे आमदार हरिओम यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

स्वामी प्रसाद मौर्य यांच्याप्रमाणेच मंगळवारी तिंदवरीयेथील भाजपचे आमदार ब्रजेश प्रजापती, तिल्हारचे आमदार रोशनलाल वर्मा आणि बिलौरचे आमदार भगवती सागर यांनी आमदार पदाचा व भाजप च्या प्राथमिक सद्यसत्व पदाचा राजीनामा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com