यूपीच्या विधानसभा (UP Election) जागांसाठी भाजप (BJP) केंद्रीय निवडणूक समितीची बैठक (Central Election Committee meeting) सुरू झाली आहे. या बैठकीत 300 जागांच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब (candidates name announced) होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Modi) या बैठकीत सामील आहेत. या बैठकीला यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यूपी भाजपचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेही उपस्थित आहेत. त्यांच्याशिवाय अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, बीएल संतोष, शाहनवाज हुसेन, जुआल उराव हेही या बैठकीत उपस्थित आहेत. (will BJP Central Election Committee meeting candidates name announced)
सपाची उमेदवार यादी आज येऊ शकते
लखनौमध्ये समाजवादी पक्ष आज पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची घोषणा करू शकतो. अखिलेश यादव यांनी चर्चेसाठी साडे बारा वाजता बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत झालेल्या चर्चेत आरएलडीला 26 ते 30, राजभरला 8 ते 10, महान दलाला 3 ते 5, जनवादी पक्षाला 3, अपना दलाला 2, टीएमसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा दिली जाणार आहे.
यूपीमध्ये सात टप्प्यात तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या उर्वरित तीन राज्यांमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. उत्तराखंड, पंजाब आणि गोव्यात मतदानासाठी 14 फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
देशातील पाच राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. या पाच राज्यांमध्ये १० फेब्रुवारीपासून मतदान सुरू होणार असून 10 मार्चला सर्व राज्यांचे निकाल लागणार आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत, तर उत्तराखंडमध्ये 70 जागा आहेत. याशिवाय पंजाबमधील 117, मणिपूरमधील 60 आणि गोव्यातील 40 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.