Domestic Violence: धक्कादायक! घरगुती हिंसाचारात 23 % वाढ; सायबर गुन्हे, बलात्काराच्या तक्रारीही अधिक

घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे आणि लोकांची मानसिकता बदलण्यासाठी अधिकाधिक लक्ष देण्याची गरज आहे.
Domestic Violence
Domestic ViolenceDainik Gomantak
Published on
Updated on

देशात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये 'कौटुंबिक हिंसाचाराविरूद्ध महिलांची सुरक्षा' या श्रेणीत 6,900 हून अधिक तक्रारी नोंदवल्या आहेत. NCW मध्ये नोंदवलेल्या 30,900 पेक्षा जास्त तक्रारींपैकी सुमारे 23 टक्के तक्रारी कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत.

Domestic Violence
Maharashtra ATS: पंजाबचा गँगस्टर सोनू खत्रीच्या तीन साथीदारांना अटक, एटीएसची कारवाई

कोविड महामारीच्या काळातील आकडेवारी 2020 मध्ये सुमारे 23,700 वरून 2021 मध्ये 30 टक्के ने वाढून 30,800 पेक्षा जास्त झाली आहे. 2022 मध्ये तक्रारींची संख्या जास्त राहिली असून, 30,900 चा टप्पा ओलांडला आहे.

गुन्ह्यांची टक्केवारी

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण (23 टक्के) आणि हुंड्यासह विवाहित महिलांचा छळ (15 टक्के). राज्यवार विभागणी दर्शविते की एकूण तक्रारींपैकी 55 टक्के तक्रारी उत्तरप्रदेशमध्ये झाल्या आहेत, त्यानंतर दिल्ली (10 टक्के) आणि महाराष्ट्र (5 टक्के) आहेत. 2021 मध्येही या तीन राज्यांमधून सर्वाधिक तक्रारी समोर आल्या आहेत.

Domestic Violence
Punjab Crime: आधी पत्नीची हत्या, नंतर स्वत:वर गोळी झाडली; लष्करी अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

गेल्या काही वर्षांत तक्रारींच्या वाढत्या संख्येमुळे, NCW चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करणार्‍या महिलांना तक्रार करण्यास, मदत मिळविण्यासाठी आणि सार्वजनिक सुनावणींद्वारे पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. जुलै 2021 मध्ये, 24x7 हेल्पलाइन प्लॅटफॉर्म (7827170170) सेवा सुरू करण्यात आली आहे.

घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे आणि लोकांची मानसिकता बदलण्यासाठी अधिकाधिक लक्ष देण्याची गरज आहे. अशा तक्रारी हाताळण्याव्यतिरिक्त, NCW जनजागृती कार्यक्रम आयोजित करते. असे एनसीडब्ल्यूचे अध्यक्ष म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com