तेलंगणा कामगार मंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; जमावापासून बाहेर काढण्यात पोलिसांना आले यश

तेलंगणाचे कामगार मंत्री एम मल्ला रेड्डी यांच्या ताफ्यावर रविवारी घाटकेसरमध्ये एका गटाने मोठा हल्ला केला आहे.
Telangana Labour Minister M Malla Reddy
Telangana Labour Minister M Malla ReddyDainik Gomantak

तेलंगणाचे कामगार मंत्री एम मल्ला रेड्डी (Telangana Labour Minister M Malla Reddy) यांच्या ताफ्यावर रविवारी घाटकेसरमध्ये एका गटाने मोठा हल्ला केला आहे. 29 मे च्या रात्री संध्याकाळी बिगर राजकीय समुदाय मंच रेड्डी जागृतीने आयोजित केलेल्या सभेतून परतत असताना ताफ्यावर बूट, दगड आणि खुर्च्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. (Attack on Telangana labor minister convoy Police managed to get out of the crowd)

Telangana Labour Minister M Malla Reddy
Modi Govt 3 Years: उद्या शिमल्यात भाजपची मोठी रॅली, 15 दिवस चालवणार 'हा' कार्यक्रम

कार्यक्रमात, मल्ला रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांचे कौतुक करत होते, त्यानंतर जमावातील काही लोकांनी 'मल्ला रेड्डी डाऊन डाऊन' असे म्हणत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर काही लोकांनी ताफ्यावर खुर्च्या फेक केली. मात्र, जमावाला आटोक्यात आणण्यात आणि मंत्र्यांना कार्यक्रमाच्या बाहेर काढण्यात पोलिसांना पुरेपुर यश आले.

घाटकेसरचे पोलीस निरीक्षक एन चंद्रा बाबू यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे, मात्र या घटनेबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. "या प्रकरणी आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नाही. जर कोणाला तक्रार करायची असेल, तर आम्ही गुन्हा नोंदवतो, असे ते म्हणाले. समाजाच्या मागणीनुसार लवकरात लवकर रेड्डी कॉर्पोरेशन स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना आवाहन करणार असल्याची घोषणा मल्ला रेड्डी यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com