Goa: नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांची फरफट!

गोव्याीतल (Goa) मोले पंचायतक्षेत्रात जंगलात, बसथांब्‍यावर विद्यार्थी करतात अभ्‍यास
Goa students study in the forest and bus stops
Goa students study in the forest and bus stopsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : गोव्यातील(Goa) मोले पंचायत क्षेत्रातील माकडये, सागोळ, सुकतळी, धाटफार्म येथील विद्यार्थ्यांना नेटवर्कची सुविधा नसल्याने डोंगरभागातील जंगलात व बसथांब्यावर बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. मोले पंचायत क्षेत्रातील बहुतेक भाग जंगलात येत असून नेटवर्कअभावी लांब पल्ला गाठत जागा शोधावी लागते. (In the Mole Panchayat area of Goa, students study in the forest and bus stops)

Goa students study in the forest and bus stops
Goa Curfew: हॉटेल, रेस्‍टॉरंटचालकांची मनमानी, शिथिलतेचा गैरफायदा

माकडये, सागोळ भागाचे पंचसदस्य राजेश सांगोडकर यांनी सांगितले की, मोबाईल टॉवरसाठी आमच्या प्रभागात कुणाचाच विरोध नाही. सध्या चार टॉवर आहेत. सरकारने सुरू केलेली नेटवर्कची सुविधा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नावापुरतीच राहिली आहे. विविध विद्यालयात, कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नेटवर्कसेवेअभावी शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंबंधी विचारणा केली असताना तात्पुरती नेटवर्क सेवा उपलब्ध होऊन गायब होते. पावसात नेटवर्क सेवा कोलमडून जाते. वर्गात मिळणारे शिक्षण हेच खरे शिक्षण आहे, अशी प्रतिक्रिया सांगोडकर यांनी व्यक्त केली.

Goa students study in the forest and bus stops
Goa: गावठी चिकन झाले गरम, डिचोलीत किलोमागे 20 रुपयांनी वाढ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com