Goa: ‘स्मार्टनेस’ हरवून बसलीय पणजी!

जागतिक कीर्तीचे पर्यटन राज्य असलेल्या गोव्याची (Goa) राजधानी पणजी (Panajim) राज्याचा केंद्रबिंदू असल्याने ‘पणजी’वर सर्वांचेच लक्ष असते.
panjim city
panjim cityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जागतिक कीर्तीचे पर्यटन राज्य असलेल्या गोव्याची (Goa) राजधानी पणजी (Panajim) राज्याचा केंद्रबिंदू असल्याने ‘पणजी’वर सर्वांचेच लक्ष असते. या शहराला ‘स्मार्ट सिटी’ (Smart City) म्हणून ओळखले जात असले तरी अद्याप हा दर्जा मात्र मिळालेला नाही. जुन्या काबिजादीपासून परिचित असलेले हे शहर आपली ओळख हरवत आहे. विस्तारीकरणाच्या नादात जवळचा ग्रामीण भागही पणजीने कवेत घेतल्यामुळे अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण जनतेची मानसिकता बदलून सर्वांगिण विकास करण्याचे मोठे आव्हान स्मार्ट सिटीसमोर आहे.

पणजी शहरात गेल्या काही वर्षांत अनेक नवे प्रकल्प उभे झाले, नव्या सुधारणा झाल्या. मात्र, नियोजनबध्द विकास झालाच नाही. पणजीची मूळ ओळख कायम ठेऊन विकास साध्य करणे सरकार व महापालिकेलाही शक्य झाले नाही. सांतिनेज नाला, पणजी मार्केट, पार्किंग समस्या, पणजी बसस्थानक आदी अनेक समस्यांवर कुणीच तोडगा काढू शकलेले नाही. राज्याच्या मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था तर पणजीच्या प्रतिमेची लक्तरे वेशीवर टांगते. पणजी मतदारसंघाला आत्तापर्यंत 9 आमदार लाभले. त्यातील मनोहर पर्रीकर हे सर्वांत जास्त म्हणजे सहावेळा निवडून आले. पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून बाबूश मोन्सेरात (Babush Monsera) हे निवडून आले. पणजी विधानसभा क्षेत्रात महापालिकेचे ३३ प्रभाग येतात तसेच रायबंदर बाजूचा जुने गोवे पंचायतीचा एक प्रभाग येतो.

panjim city
गोवा-कर्नाटकला जातायं? आधी हे नियम वाचा

पणजी महापालिकेवर मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) आमदार व मुख्यमंत्री असतानाही बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थक पॅनेलने सत्ता प्राप्त केली होती. ती आजतागायत कायम आहे. तरीही आमदार आणि महापालिका यांना समस्या सोडवता आलेल्या नाहीत. या सुधारणांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. येनकेन प्रकारे सत्ता प्राप्त करणे हेच धोरण ठेऊन निवडणुका लढवल्या जातात. त्यामुळे सत्ता मिळाल्यानंतर विकासाचे काहीच पडून जात नाही. यातून नागरी समस्या तशाच राहिल्या आहेत. पणजी मार्केटमधील ४०० दुकानांचे भाडे महापालिकेला गेली १२ वर्षे मिळत नाही. सत्ताधारी गटाचे समर्थक परस्पर दुकानदारांकडून हजारो रुपयांचे भाडे वसूल करून गब्बर झाले आहेत. हे मार्केट गोव्याच्या राजधानीतील मार्केट आहे, असे वाटतच नाही.

सीसी टीव्हींची नितांत गरज

सध्याच्या काळात गरजेचे असलेले सीसी टीव्ही पणजी शहरात बसवणे गरजेचे आहे. सिध्दार्थ कुंकळ्येकर हे आमदार असताना त्यांनी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, विरोधकांनी त्यात घोटाळ्याचा आरोप केल्यामुळे ते कॅमेरे खरेदी केले गेले नाहीत. राज्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे शहर असल्याने पणजीत घडणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांवर नजर ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नितांत गरज आहे.

panjim city
जुने गोवे चर्च कार्यालयात चोरी; हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्‍नचिन्ह राहिले उभे

पणजी शहरात देशी - विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या सेवेसाठी टॅक्सीसोबत रिक्षाही आहेत. मात्र, रिक्षासाठी योग्य असे स्टॅंड नाही. आरेखन केलेले व शेड बांधलेले व्यवस्थित स्टॅंड बांधले जावेत. विकास करताना सर्वसामान्यांचे हितही जपावे. - पांडुरंग नाईक, रिक्षाचालक पूर्वीच्या काळी एकाच ड्रेनेजमध्ये सर्वप्रकारच्या केबल टाकल्या जात. आता जो तो येतो व रस्ते फोडतो. खड्डे पडतात व परिसरात घाण होते. त्यामुळे राजकारण्यांनी कमिशनचा विचार न करता पुढील २० वर्षांचे नियोजन करून स्थानिकांना विश्‍वासात घेऊन सर्वप्रकारच्या केबलसाठी एकच व्यवस्था करावी. शहरात ज्या गॅरेज आहेत त्यांचे पुर्नवसन करावे.

गौरीश धोंड, उद्योजक

पणजी शहर हे योग्य नियोजन करून वसवलेले शहर होते. मात्र, अनियंत्रित विकासामुळे ते विस्कळीत झाले आहे. वाहतूक कोंडी व पार्किंग समस्या येथे आहे. त्याला कारण म्हणजे सरकारी वाहने व पर्यटक टॅक्सी. ही सर्व वाहने पार्किंग प्लाझामध्ये ठेवावीत. विकास प्रकल्प बांधतानाही नियोजन हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com