Goa Politics : गोव्याचे राजकारण पुढे कोणत्या दिशेने जाणार?

महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे रूपांतर मध्यमवर्गीयांच्या वादविवाद क्लबमधून एका जनसंघटनेमध्ये केले व त्याद्वारे आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेसने आज हा वारसा दरबारी राजकारणात बदलला हे खरोखरच दुर्दैवी आहे.
Digambar Kamat and CM Pramod Sawant
Digambar Kamat and CM Pramod SawantDainik Gomantak

Goa Politics : दिगंबर कामत यांनी सर्वांसमक्ष जाहीर केल्याप्रमाणे राजकारणात आपल्याला कोणतेही स्थान नाही असे देवाने ठामपणे सांगितले असेल व आमच्या शासनसंस्था पक्षांतर थांबवण्यास असमर्थ असतील, तसेच राजकीय पक्ष व सध्याची निवडणूक प्रणाली दलबदलू वर्तनासाठी उत्तेजन देत असेल व राष्ट्रीय पक्ष या विषारी राजकारणासाठी कारणीभूत असतील तर मग आम्ही काय करायचे? उत्तर स्पष्ट आहे. राष्ट्रीय पक्षांपासून दूर राहा. ‘दोन स्थानिक पक्षांची स्पर्धात्मक प्रणाली बांधण्याची’ पुनश्च सुरुवात करा.

केवळ नाममात्र अवशेष शिल्लक असलेल्या स्थानिक पक्षांकडे परत जा असे मी म्हणत नाही, परंतु त्याऐवजी स्थानिक राजकारणाचा नवीन टप्पा सुचवण्यासाठी मी ‘बांधणी’ हा शब्द वापरला. सध्या अस्तित्वात असलेली सर्व जुनी समीकरणे एकतर नेत्याचे वर्चस्व असलेली किंवा अतिवैचारिक आहेत. व्यावहारिक परंतु तत्त्वनिष्ठ सहयोगाद्वारे एक सर्वसमावेशक किमान कार्यक्रम तयार करण्यास ती असमर्थ आहेत. आपण राज्य पातळीवर गोव्यातील स्थानिक पक्षप्रणालीची कल्पना रुजवली पाहिजे जी संघटनात्मक दृष्टीने, मुळापासून शिर्षस्थानापर्यंत एकसंध असेल. भूतानच्या राजाने द्विपक्षीय व्यवस्थेच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन लोकशाहीची भरभराट होण्यासाठी अशी पावले उचलली. भूतानची सुमारे 7 लाख ही लोकसंख्या गोव्यापेक्षा कमी आहे.

कठोर परिश्रमाची सुरवात

दोन स्थानिक पक्षप्रणालीचे नूतनीकरण, ज्याला आपण म.गो. 2 0 विरुद्ध यु.गो. 2.0 संबोधू, कारण आपल्याला अनुसरण करण्यासाठी मॉडेल असणे आवश्यक आहे. ब्रिटनमधील पक्षप्रणाली एक चांगले मॉडेल आहे. येथे मतदारसंघातील घटकांना खूप शक्ती आहे. उमेदवारांची निवड मतदारसंघ स्तरावर केली जाते व तो पक्षाच्या हायकमांडद्वारे वरून लादला जाऊ जाऊ शकत नाही. ब्रिटनमध्ये मोठ्या संख्येने गोमंतकीय असल्याने आम्ही मतदारसंघ पातळीवर पक्ष कसे बांधायचे याबद्दल त्यांचा नक्कीच सल्ला घेऊ शकतो. असे पक्ष सक्रिय सभासदांची नोंदणी ठेवतात, स्थानिक संसाधने वाढवतात, संभाव्य मतदारांची माहिती ठेवतात, मोहिमेची थीम निवडतात, नियमित बैठका घेतात. याबद्दल जाणून घेण्यास ब्रिटनच्या राजकारणात सक्रिय असलेले गोमंतकीय कीथ वाझ व सुएला फर्नांडिस ब्रेव्हरमन यांच्याशी विचारविनिमय करता येईल. भाजपनेही असेच संघटनात्मक स्वरूप स्वीकारले आहे, परंतु त्यांचा आधार राष्ट्रीय स्वयंसेवक संघांतर्गत असलेल्या जातीयवादी संघटनांचे जाळे आहे, ज्या कायमस्वरूपी इतरांना शत्रू मानतात. त्यांच्या धर्माधिष्ठित व जातीय तत्त्वांमुळे हे मॉडेल स्वीकारार्ह नाही. कल्पित गोवा मॉडेल हे धर्मनिरपेक्ष असावे. ते प्रत्येक समुदाय, पंथ, लिंग व गोव्यातील सर्व नवीन रहिवाशांना समाविष्ट करणारे असावे. जोपर्यंत आपण वैश्विकता स्वीकारत नाही व जोपर्यंत आपण दोन स्थानिक

पक्षप्रणालीच्या पुनर्बांधणीसाठी 2.0 चळवळीचे संस्थापक तत्त्व म्हणून विविधता स्वीकारत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय पक्ष आपल्याला नष्ट करून टाकतील कारण ते धूर्त व लबाड आहेत. अनुसरण करण्याजोगे मॉडेल सापडल्यानंतर, पक्षाचे संघटनात्मक स्वरूप पायापासून शीर्षस्थानापर्यंत एकसंध असणे गरजेचे कारण प्रत्येक लोकशाहीला पक्षांची आवश्यकता असते. नंतर या मॉडेलला भौतिक अस्तित्व देण्याचा पुढचा टप्पा येतो. म्हणजे, एक व्यापक रेखाचित्र बैठकीच्या खोलीतून प्रत्येक गावात, तालुक्यात व मतदारसंघात नेणे. पक्षबांधणी एक कठीण काम आहे. महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे रूपांतर मध्यमवर्गीयांच्या वादविवाद क्लबमधून एका जनसंघटनेमध्ये केले व त्याद्वारे आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेसने आज हा वारसा दरबारी राजकारणात बदलला हे खरोखरच दुर्दैवी आहे.

तळागाळातील संघटना म्हणून सुरू झालेला भाजपही आज त्रयस्थांच्या दरबारात रुपातंरित झाला आहे. याची परिणीतीही उघड आहे. उदाहरणार्थ गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह एका दिवसात बदलण्यात आले. दिल्ली नेहमीच मुघल दरबाराप्रमाणे चालते. अखिल गोवा पदयात्रा म्हणूनच नूतनीकरण केलेल्या स्थानिक पक्ष प्रणाली २.० साठी ब्रिटनच्या पार्टी मॉडेलचे पालन करण्याचे मी सुचवले आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणजे मडगाव किंवा वाळपईच्या दरबारात न जाता गोव्यातील खेड्यापाड्यात व तालुक्यांमध्ये जाणे, गोवाभर पदयात्रा काढणे. आंध्र प्रदेशात टीडीपी व वायएसआर काँग्रेसने तशा प्रकारचे काम करून दाखवले. चंद्रशेखर यांनी पदयात्रेतून जनता पक्षाला नवसंजीवनी दिली. गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळ याच माध्यमातून उभारली. जनतेशी पुन्हा संपर्क साधणे हा यामागचा उद्देश आहे. कुठल्यातरी तिठ्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी दैनंदिन बैठकांचे नियोजन करावे. हे भारत जोडो यात्रेसारखे वाटू शकते व भाजप नक्कीच तिला बदनाम करेल, परंतु यात वैयक्तिक नेतृत्व नसल्यामुळे तिचे स्वरूप वेगळे असेल. गोव्यात मतदारसंघ पातळीवर पक्ष व्यवस्था निर्माण करण्याची ही चळवळ आहे. प्रत्येक मतदारसंघातून संभाव्य पक्ष कार्यकर्त्यांची यादी, गोव्याचे खरे प्रेमी व स्थानिक प्रश्न घेऊन पदयात्रा निघेल. केरळमधील 9 व्या योजनेसाठीच्या जनमोहिमेने याच्यातून वचनबद्ध व्यक्ती शोधून काढल्या व विकास आराखडा तयार केला जो गोव्यासाठीही केला जाऊ शकतो.

Digambar Kamat and CM Pramod Sawant
Goa Politics : गोमंतकीय राजकारणावर पक्षांतराचा कलंक

प्रत्येक मतदारसंघात एक धर्मनिरपेक्ष कॉस्मोपॉलिटन गट स्थापन केला जाऊ शकतो. केवळ कुशल गोमंतकीयच नव्हेत तर तर ज्यांनी गोव्याला आपले घर मानले आहे त्यांच्याशीही प्रचंड प्रतिभा आहे. त्या सर्वांचा यात सहभाग असावा. केवळ 1400 चौरस मैल क्षेत्रफळ असल्याने संपूर्ण गोव्याची पदयात्रा सहज शक्य आहे. गोव्याच्या राजकारणाच्या दुरवस्थेबद्दल हुतात्म्यांची माफी मागून पत्रादेवी येथून पदयात्रा सुरू होऊ शकते. गोव्याच्या उत्तर व दक्षिण टोकांवरून सुरू झालेल्या पदयात्रेची सांगता मडगावच्या लोहिया मैदानावर व्हावी. गोव्याला आदर्शवादी भूतकाळ व प्रतिकाराचा इतिहास आहे, ज्याचा पुरावा वसाहती व्यवस्थेविरुद्धच्या लढ्यात सापडतो. या समृद्ध इतिहासाशी आपण पुन्हा जोडले गेले पाहिजे. नवीन राजकीय निर्मितीकरिता संसाधने उभारण्यासाठी आपण जगभर विखुरलेल्या गोमंतकीय लोकांमध्ये क्राउडफंडिंगची पद्धत वापरू शकतो.

गोव्यासाठी एक कार्यक्रम

बैठकी दरम्यान शोधून काढलेल्या प्रत्येक मतदारसंघातील गरजांचे दस्तऐवजीकरण करून त्याद्वारे नंतर राज्यस्तरीय परिषदेत गोव्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवता येईल. सरकारचा मास्टर प्लान आपण धुडकावून लावू शकतो, कारण कालांतराने आमच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त कौशल्यपूर्ण योजना असतील. आपल्या या कल्पित व्यवस्थेत प्रत्येक मतदारसंघात RTI आणि PIL युनिट्स तयार करून, प्रणालीला सतर्क ठेवणे सहज शक्य आहे. ॲड. आयरिश रॉड्रिग्ससारख्यांना बाजूला सारून जनतेतील असंतोषातून आंदोलने निर्माण करणे आवश्यक आहे. परंतु जर आपण आता हे स्वप्न पाहिले नाही तर ...

पीटर रोनाल्ड डिसोझा

(लेखक देशातील प्रख्‍यात शिक्षणतज्‍ज्ञ असून, विचारवंत म्‍हणूनही त्‍यांचा परिचय आहे.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com