आराधना... नेतृत्व पुनर्स्थित करण्याची

आजवरच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) इतिहास पाहिल्यास भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास ते जिंकतात, त्यामुळे भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) थिवी मतदारसंघातून डॉ. सावंत (Dr. Sawant) यांच्यापेक्षा ते सरस ठरू शकतात.
आजवरच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) इतिहास पाहिल्यास भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास ते जिंकतात.
आजवरच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) इतिहास पाहिल्यास भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास ते जिंकतात.Dainik Gomantak

सुहासिनी प्रभुगावकर: गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) आजचा दुसरा दिवस. काय वर्णावी थोरवी गणेशाची? दिवसेंदिवस विनायकाचे महात्म्य वाढते आहे, लहान-थोरांत अतीप्रिय असलेले गणपती बाप्पा म्हणजे नेतृत्वाचा एक सरस नमुना. विघ्नहर्त्यात नेतृत्वाचे गुण नसते तर सकलजनांवर किमान दीड दिवस त्यांचे राज्य कसे असते? हवाहवासा वाटणारा उत्साह, आनंदाचे भरते देशोदेशींच्या मनाहृदयात नांदवणाऱ्या गणरायाच्या नेतृत्वात जादुई किमया असल्यामुळे बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या, म्हणून साकडे दरवर्षी विसर्जनावेळी घातले जाते. तो विघ्नहर्ता आहेच शिवाय गणाधीश, गणनायक वगैरे, वगैरे बराच काही आहे. विद्येचा अधिपती असलेला ज्ञान, विज्ञानाची देवता म्हणजेच गणेश, संकटमोचक म्हणूनही त्याला ओळखले जाते, शुभकार्याच्या दैवताचा मानही तोच पटकावतो. लंबोदर असला तरीही अष्टावधानी, सगळ्यांना हसत हसत आपल्यापुढे झुकवणारा. कधी परत मिळेल का, असे नेतृत्व? गणेश जयंती दरवर्षी साजरी केली जाते; पण त्याच्या गुणांचे अवलोकन केले आहे का? आचरणात आणले आहेत का अष्टविनायकाचे गुण? अंगिकारली आहे का त्याची सर्वधर्मिय प्रतिमा? नसेल तर यंदा गजाननासारखा नेता मिळो, गोव्याचे (Goa) नेतृत्व पुनर्स्थित (Replaced) होवो, अशी आराधना करायला काय हरकत आहे?

आजवरच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) इतिहास पाहिल्यास भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास ते जिंकतात.
Goa Ganesh festival: गोव्यात '150 मंडळींचा' एकच गणपती

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर स्वतःचे किंवा भाजपचे चारी ठाव गुणगान गाणारे नेते नव्हते. निवडणुका जवळ आल्या की ते भविष्याचा विचार करायचे, जनसंवाद साधताना आलेल्या सूचनांतून ‘लाडली लक्ष्मी’ त्यांनी जन्माला घातली. ‘लाडला लक्ष्मण’ का नको, अशी मागणी एकदा माजी उपसभापती दिवंगत विष्णू वाघ यांनी केली. त्यावेळी दिवंगत पर्रीकर यांनी लाडलीमागील हेतू कथन केला. लाडल्यासाठी योजना झालेली नाही; पण महत्त्वाचे म्हणजे ‘लाडली लक्ष्मी’ ज्या कारणासाठी गुंफली गेली ते लक्ष्य साध्य झाले आहे का? संशोधनाचा विषय आहे आणि ते व्हायलाही हवे अन्यथा लाडलीत उचित बदल कसे होणार?

आजवरच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) इतिहास पाहिल्यास भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास ते जिंकतात.
'नारळ खवणे' ही एक कलाच आहे

लाडली आजही लाडकी आहे, कदाचित तिचा विस्तारही व्हायला हवा, नियमित फायदेही गरजूंना मिळायला हवेत, तेही अडथळ्यांविना. लाडलीचा आढावा घ्यायला हवाच. शिवाय लाडलीतून भविष्यासाठी नेतृत्वाची जोपासना व्हावी यासाठी बदलही हवेत. लाडलीच नव्हे जागतिक बदलांचा वेध घेणारा, त्यानुसार पाऊल टाकणारा, जनतेत सातत्याने जनजागृतीची पणती तेवत ठेवणारा, जनतेला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी प्रकाशदीप हृदयांत प्रज्वलित करणारा नेता राज्याला हवा आहे.

माजी मुख्यमंत्री तथा आमदार प्रतापसिंह राणे, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यातील नेतृत्वाच्या गुणांमुळे गोवा प्रगतीपथाकडे जाऊ शकला. माजी मुख्यमंत्री दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर, माजी मुख्यमंत्री दिवंगत शशिकलाताई काकोडकर, तसेच अन्य मुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्यापरीने राज्याच्या नेतृत्वाची काहीअंशी जबाबदारी सांभाळली; पण पर्रीकर, श्री. राणे यांच्या दीर्घकालीन नेतृत्वाचा ठसा राहिला आहे. डॉ. सावंत यांना मंत्र्यांची मजबूत टीम मिळाली असती तर त्यांच्या नेतृत्वाला झळाळी येणे शक्य होते हे भाष्य याच स्तंभातून मी वारंवार केले आहे. आजही मंत्रीमंडळातील स्थिती सुधारलेली नाही उलट अंतर्गत कलह वाढत आहे. अर्थात दोन वर्षांत त्यांच्याकडून कर्तबगार नेतृत्वाची अपेक्षा कशी करावी म्हणा? फक्त स्थिर सरकार देण्याची त्यांनी कसरत केली, सुशासनात ते अपयशी ठरले. त्यामुळे असले स्थैर्य गोमंतकीयांना भवितव्यात रुचणार नाही याची जाणीव डॉ. सावंत यांनाही असावी म्हणूनच ते कोपऱ्यातील ग्रामीण मतदारसंघात जाऊन भविष्यात चांगले सरकार देण्याची भाषा करीत असावेत. विरोधकांतील विस्कळीतपणा आतापर्यंत भाजपच्या पथ्यावर पडला असला तरीही भाजप निर्धास्थ नाही, विरोधक एकत्र आल्यास कोणती खेळी खेळावी याचे आराखडे त्यांनी तयार ठेवले नाहीत या भ्रमात विरोधकांनी राहू नये. एका पश्चिम बंगालने भाजपला खूप काही शिकवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मूळ भाजप कार्यकर्ता, काँग्रेसमधून भाजपत आलेल्या कार्यकर्त्यांतील संघर्षाचा स्फोट येत्या निवडणुकीत होऊ शकणार नाही, असे गृहित धरता येईल का?

आजवरच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) इतिहास पाहिल्यास भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास ते जिंकतात.
100 वर्ष जुना मखर पाहिलाय का?

आजवरच्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास भाजप प्रदेशाध्यक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास ते जिंकतात आणि त्या अनुषंगाने थिवी मतदारसंघातून संधी मिळाल्यास भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे का विजयी होऊ नयेत? श्री. तानावडे उच्चशिक्षित आहेत, व्यवस्थापनात डॉ. सावंत यांच्यापेक्षा ते सरस ठरू शकतात. माजी आमदार दामोदर नाईक, माजी आमदार विश्वास सतरकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासारख्या निष्ठावानांचे नेतृत्व भाजपकडे आहे, हे विसरता येणार नाही. ते नेतृत्व पुनर्स्थित होईल का? त्यांच्या पुनर्आगमनाची आराधना चतुर्थीत करूया.

प्रदेश काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी सध्या चढाओढ लागलेली दिसते. प्रवेशावेळी हिऱ्या मोत्यांची पारख केल्यास काँग्रेसला ‘अच्छे दिन’ का येऊ नयेत? विरोधी पक्षनेते आमदार दिगंबर कामत यांचे अनुभवी नेतृत्व काँग्रेसचा हुकमी एक्का आहे. त्यांच्या मार्गात काटे पेरणारे अनेक असतील त्यांना दूर करावेच लागेल, प्रसंगी उघडपणे प्रदेशाध्यक्षांचे कान पिळण्याची कामगिरी त्यांच्याकडून अपेक्षित आहे. आजवरच्या अनुभवाने शहाणे झालेले असल्यास श्री. कामत यांचे नेतृत्व गोव्याला योग्य दिशा दाखवू शकते. श्री. कामत संयमी आहेत. संयम हवाच; पण आक्रमकतेत कमतरता नको.

आजवरच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) इतिहास पाहिल्यास भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष निवडणूक रिंगणात उतरल्यास ते जिंकतात.
Ganesh Festival: गणेश चतुर्थीतही जीवनशैलीनुसार बदल

गोवा फॉरवर्डचे नेते आमदार विजय सरदेसाई पाच वर्षांत मोठी झेप घेतील, अशी आशा होती. परंतु बारा मतदारसंघापर्यंतच ते पोचलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा का आल्या? विजय यांच्याकडे नेतृत्वाचे गुण आहेत, दूरदृष्टीही आहे, पक्षाचा विस्तार करण्यात त्यांनी भविष्यात मागे राहू नये. प्रादेशिकतेच्या मुद्द्यावरच ते गोमंतकीयांच्या हृदयात स्थान मिळवू शकतात, त्यांची गोवा पुनर्स्थित करण्याची संकल्पना जनतेसमोर लवकर विस्तृतपणे जायला हवी.

आमदार रोहन खंवटे, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याकडे नेतृत्वाचाच्या गुणांची वानवा नाही. नजिकच्या भविष्यकाळात आम आदमी पार्टीचे राज्य निमंत्रक राहुल म्हाम्ब्रे यांचे नेतृत्व बहरेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यंदा विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती बदलली ती भविष्याच्या विचारातूच. आप भाजप, काँग्रेसला पर्याय होऊ शकते की नाही याची उत्तरे या रणनितीतून मिळतील. मात्र आप सत्ताधाऱ्यांना संघर्ष करायला लावत आहे, आपच्या विचारांपुढे भाजप झुकायलाही लागला आहे आणि त्यामुळे मोफत पाणी, स्वस्त उच्च शिक्षणाचा आसरा सरकारला घ्यावा लागत आहे. सर्वांना रोजगाराचा मुद्दा भाजपला नक्कीच हैराण करणार असून त्याला भाजपचा काय पर्याय असेल हे लवकरच स्पष्ट होईल.

आजच्या परिस्थितीत मगोपचे नेते रामकृष्ण ऊर्फ सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्वातील गुणांना पक्षाच्या विस्तारातून जनतेपर्यंत पोहोचवणे शक्य आहे. चतुर्थीनंतर राजकीय भूकंप घडवून आणल्यास भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना जनता स्वीकारेल का? माजी मुख्यमंत्री श्री. पार्सेकर यांनी गोव्याला वीस वर्षे मागे नेले या त्यांच्या विधानाने २०१७ च्या निवडणुकीत रंगत आणली होती. सध्याची राजवट कशा प्रकारची आहे ? यावर तशीच मार्मिक टिप्पणी ते करतील का? सुदिनबाब हेही तसे संयमी व्यक्तिमत्त्व, माजी आमदार नरेश सावळ यांच्यासारख्या तोफेला पक्षाच्या अग्रभागी आणतील का?

नेते, नेतृत्वाचा अभाव गोव्यात नाही अभावच असेल तर ते त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोचण्याचा. गोवा आज ज्या वाटेवर उभा आहे ती विध्वंसाचीच. त्यामुळे या विध्वंसाला आळा घालणारे, गोमंतकीयांची मानसिकता बदलणारे , गोव्याला उद्यमशीलतेच्या शिखरावर नेऊन ठेवणारे, समुद्रकिनारे, निसर्गावर प्रेम करून ते जपण्यासाठी कटिबद्ध असणारे आणि गोवा, गोमंतकीयासाठी राखणारे नेतृत्व राज्याला हवे. पुनर्स्थित गोव्यासाठी नेतृत्वही पुनर्स्थित होण्याची, करण्याची संधी मतदार घेतील का? तशी आराधना गणरायाकडे करूया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com