आज सामान्य कुटुंबात दरवर्षी नवनवीन पर्यावरणाला घातक असलेल्या वस्तूपासून मखर बनवण्याची पद्धत रुजू होत. निसर्गात तयार होणारी प्रत्येक वस्तू ही पर्यावरणातील घटकांपासून तयार होते त्यामुळे ती बनवल्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो. तेव्हा वस्तूंचा कमी वापर हा पर्यावरण संवर्धनाचा मंत्र हे सिद्ध झालेले आहे.
याचा आधार घेत पडोशेतील नाडकर्णी कुटुंबीय मात्र 100 वर्षे जुना असलेला मखर गणेश सजावटीसाठी वापरत. एकच मखर दरवर्षी वापरत असल्याने मखर तयार करण्यासाठी कोणत्याही वस्तूंची गरज लागत नाही त्यामुळे त्यातून पर्यावरणाचे काहीच नुकसान होत नाही अशाने हे मखर पर्यावरण संवर्धनाची महती सांगणारा बनला आहे.
लाकडापासून बनवलेला यांचा मखर हा सुमारे 5 फूट लांबी-रुंदीचा चौकोनी आकाराचा मोठा आराखडा आहे. त्या आराखड्यात चौकोनी व आयताकृती लहान मोठे कप्पे तर मध्यभागी गणेश मूर्ती बसवण्यासाठी आयताकृती पोकळी आहे.
या मखराचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी तो चौकोनी कप्प्यात नक्षीरंगकाम केलेल्या काचांनी सजवला जातो. या काचांवर 100 वर्षापूर्वी विशिष्ट रंगकाम आहे. दरवर्षी मखराच्या चौकनी कप्प्यात त्या काचा बसवल्या जातात व चतुर्थी पूर्वी त्या काचा बसवल्या जातात व चतुर्थी झाल्यावर त्या काढून सुरक्षित ठेवल्या जातात. वैशिष्ट्य पूर्ण असलेला हा मखर पर्यावरण संवर्धनाचा मंत्र देतो.
150 पेक्षा जास्त लोकांचा एकच गणपती…
जसा यांच्या मखराला 100 वर्षांचा इतिहास तसेच या नाडकर्णी कुटुंबीयांचा गणपती हा 150 पेक्षा जास्त जणांचा आहे. सत्तरीतील महसुली गोळा करण्याची जबाबदारी या कुटुंबावर पूर्वी होती. पण कालांतराने यांची पुढची पिढी गोव्याच्या विविध भागात तसेच मुंबई- पुणे सारख्या शहरात स्थायिक झाले. पण चतुर्थीच्या वेळी ही सर्व मंडळी वाळवंटी किनारी माड पोफळीच्या बागायतीत वसलेल्या पूर्वज्यांच्या घरी येतात. येथील घर तसे सुमारे 125 वर्षे जुने व 25-30 खोल्यांचे राजांगण आहे. त्याला सभोवताली खोल्या आणि मधोमध तुळशी वृंदावन आहे. एरवी सुने-सुने दिसणारे हे चतुर्थी मात्र गजबजते.
यांचा दीड दिवसांचा गणपती असतो. या दीड दिवसात या नाडकर्णी कुटुंबाची बहुतेक सर्व मंडळी आत्मीयतेने आणि श्रद्धेने येतात आणि गणेश उत्सव पारंपरिकरित्या साजरा करतात. यांच्या सद्याच्या कुटुंबीयांचा मंडळींचा आकडा 150च्या आसपास झाली आहे. यातील बहुतेक येथे येऊन जण मोठ्या प्रेमाने येत असल्याने दोन दिवस या परिसर गजबलेला दिसून येतो. तसेच या दीड दिवसात गणेश पूजा, आरत्या, भजने, एकत्रित स्वयंपाक करणे पंक्तीत बसून जेवणे अशा सर्व गोष्टी मिळून मिसळून होतात.
पडोशेतील या नाडकर्णी कुटुंबीयांचे व्यक्ती गोव्याच्या सरकारी, बिन सरकारी इतर ठिकाणी मोठ्या हुद्यावर कामाला आहे. असे हे विखुरलेले कुटुंबीयांनी आपल्या गणेश उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याची कास सोडली नाही हे विशेष. यंदा कोरोनाचा काळ असल्याने यंदा येथे सुमारे 70 जण एकत्रित आले आहे. गणपतीचे 3-4 दिवस ही सर्व मंडळी या ठिकाणी राहते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.