Blog : कल, आज और कल कपूरगीतांची मैफल

पृथ्वीराज कपूर यांनी 1942 मध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना केली, ज्याद्वारे संपूर्ण भारतात त्यांनी आपली नाट्यनिर्मिती सादर केली.
Sinchana Dixit and Anil Chand
Sinchana Dixit and Anil ChandDainik Gomantak
Published on
Updated on

गेली साठ सत्तर वर्षे कपूर घराण्याने पूर्ण बॉलीवूडवर गारूड घातले आहे. पृथ्वीराज कपूर यांनी त्याचा पाया घातला आणि त्यांचे पुत्र राज कपूरने 50 ते 70 च्या दशकात सिनेमा क्षेत्रात यशाचे परमोच्च शिखर गाठले. पृथ्वीराज कपूर यांनी 1942 मध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना केली, ज्याद्वारे संपूर्ण भारतात त्यांनी आपली नाट्यनिर्मिती सादर केली.

राज, शम्मी, शशी ही कपूर घराण्यातली दुसरी पिढी. रणधीर व ऋषी कपूर ही तिसरी तर त्यानंतर करिश्मा, करिना आणि रणबीर या अभिनेत्यांची चौथी पिढी. कपूर घराण्याच्या या चार पिढ्यांनी आपल्या कर्तृत्वातून भारतीय सिनेमाच्या इतिहासावर आपल्या घराण्याचे नाव कोरले. जवळजवळ नऊ दशके कपूर खानदान चित्रपट उद्योगात प्रमुख स्थानी आहे आणि त्याने जगभरातील प्रेक्षकांना अनेक हिट चित्रपट, हिट संगीत आणि हिट गाणी दिली आहेत.

Sinchana Dixit and Anil Chand
Blog : डॉ. स्वप्निल याने लिहिलेला चित्रपट व्हेनिस महोस्तव

याच कुटुंबातील कलाकारावर चित्रित झालेल्या सुपरहिट फिल्मी गाण्यांचा 'कल, आज और कल- दिग्गज कपूरांचे संगीतमय हिटस्' हा कार्यक्रम अनित चंद व त्यांचे साथी उद्या 28 जुलै रोजी मडगाव रवींद्र भवनात पेश करणार आहेत, ज्यात पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर आणि ऋषी कपूर यांच्यावर चित्रित केली गेलेली गाणी सादर केली जाणार आहेत.

Sinchana Dixit and Anil Chand
Blog : मिश्‍कील नजरेतून गोवा

3 तास चालणारी ही संगीत मैफल नक्कीच ब्लॉकबस्टर संगीत मैफल असणार आहे. या मैफलीत सारेगमप आणि बंगळुरूचे विजेते सिंचना दीक्षित यांच्यासमवेत ऑल इंडिया रफी स्पर्धेचे विजेते अनित चंद, प्रती किशोर कुमार अशी प्रसिद्धी मिळविलेले सुधाकर शानभाग तसेच समृद्ध चोडणकर, विभा अलगुंडगी, संजय कोरगावकर ही गोव्यातील नामवंत गायक मंडळी या कार्यक्रमात गाणार आहेत. या मैफलीला सायंकाळी 6.30 वाजता सुरुवात होईल.

गोव्यातील प्रथितयश संगीतकार विष्णू शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील 10 संगीतकारांची अत्यंत अनुभवी संगीत टीम या कार्यक्रमाला ऑर्केस्ट्रेशन आणि संगीत प्रदान करेल. गोव्यातील लोकप्रिय अँकर साईनाथ आमोणकर या मैफलीचे सूत्रसंचालन करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com