Blog : मिश्‍कील नजरेतून गोवा

बार्देश तालुक्यातल्या शिरसई गावातील बिली ज्यो फर्नांडिस हा अशा अवघ्या चित्रकारांपैकी एक आहे.
Billy Fernandes
Billy FernandesDainik Goamntak
Published on
Updated on

अ‍ॅबिगेल क्रॅस्टो

वर्गात मागील बाकावर बसणाऱ्या बहुतेक मुलांमध्ये असणारी खोड म्हणजे शिक्षकाचे शिकवणे चालू असताना वहीच्या मागच्या पानावर काहीतरी रेखाटत बसणे. पण रेखाटण्याची ही सवय भविष्यात फार कमी लोकांना चित्रकार बनवते. बार्देश तालुक्यातल्या शिरसई गावातील बिली ज्यो फर्नांडिस हा अशा अवघ्या चित्रकारांपैकी एक आहे.

बिली त्याच्या कार्टून शैलीच्या चित्रांमुळे ‘बिलीटुन्स गोवा’ या नावाने ओळखला जातो. रेखाटणाची आवड जरी त्याला शाळेत असल्यापासूनच जडली होती तरी या त्याच्या आवडीला त्याने अधिक विकसित केले ते नोकरी निमित्त दुबईला गेल्यानंतर. त्यापूर्वी म्हापसा येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्याने वाणीज्य शाखेतून आपला पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमए) पूर्ण केला होता.

Billy Fernandes
Blog : '#गावाखातीर' साठी लहानग्या पर्यावरण स्नेहींची फौज सज्ज

बिलीच्या लहानपणी दूरदर्शनवर ‘जंगल बुक’ ही कार्टून मालिका लागायची. त्यातल्या मोगलीने त्याला भुरळ पाडली आणि त्याच्या वहीत मोगली अवतरायला सुरूवात झाली. कार्टून रेखाटण्याचा त्याचा प्रवास तिथूनच सुरू झाला. मारियो मिरांडा आणि आलेक्स फर्नांडिस (अलेक्सीज) या दोघांचा प्रभाव आपल्यावर आहे हे तो प्रांजळपणे कबूल करतो.

‘मोगली रेखाटण्यापासून माझ्या कार्टून रेखाटनाला सुरुवात झाली असली तरी गोव्यातील विषय आणि घटनांवर आधारलेली कार्टून दुबईत बसून रंगवणे हे आता माझ्या आयुष्याचा भाग बनले आहे.’ असे दुबईतील एका आस्थापनात लॉजिस्टिक मॅनेजर म्हणून कामाला असणारा बिली सांगतो.

जेव्हा एखादी कल्पना माझ्या डोक्यात येते तेव्हा मी माझ्या आय पॅडवर ती रेखाटायला सुरुवात करतो. ठळक रंगानी माझ्या कल्पनात जीव भरला जातो आणि मग मी त्यांना मजेशीर शीर्षके देतो. दर्शकांच्या मनावर छाप उमटावी हाच माझा हेतू असतो.’ असे बिली आपल्या कार्टून रेखाटन प्रक्रियेबद्दल सांगतो

Billy Fernandes
Blog: ‘द ग्रेटेस्ट इंडियन स्टोरीज एव्हर टोल्ड’मध्‍ये गोमंतकीय लेखकांच्या कथा

एक चित्र जसे हजार शब्द बोलते त्याचप्रमाणे एका कार्टूनला देखील हजार शब्दांचे मोल असते. गोव्यात आयोजित झालेल्या त्याच्या चित्र प्रदर्शनात जेव्हा त्याचे चित्र पहिल्यांदा विक्रीला गेले तेव्हा आपली चित्रे लोकांना आवडतात याची जाणीव त्याला झाली. लोकांचा पाठिंबा त्याला सतत मिळत गेला. ‘पोर्तुगलचे पंतप्रधान अंतोनिओ कोस्टा यांनी मला माझी चित्रे चमकदार असल्याचे व ती त्यांना गोव्याची आठवण करून देतात असे सांगितले. मला मिळालेला तो एक उत्कृष्ट अभिप्राय होता.’

आखाती देशात तो कामाला असला तरी गोवा हा त्याच्या चित्रांचा विषय असल्यामुळे आणि आपल्या चित्रातून गोव्याची जीवनशैली, गोव्याचे सण-उत्सव, गोव्याच्या आर्थिक-सामाजिक समस्या तो मांडत असल्याने, तिथले स्थलांतरित गोमंतकीय त्याच्या चित्रांमधून गोव्याला अनुभवतात.

Billy Fernandes
Blog : मॉन्तेच्या हरवलेल्या मूर्तीचे रहस्य

‘अष्टपैलू असणे ही एक महत्त्वाची देणगी आहे पण जर तुम्ही काही काळ गर्दीपासून स्वतःला वेगळे करू शकत नसला तर तुमचा आवाज आणि आत्मविश्वास प्रतिबिंबीत होणार नाही. म्हणून मधल्या काळात एक पाऊल मागे घेऊन आपल्या कामाचे विश्लेषण करणे आणि आपल्यासाठी जे उत्कृष्ट असेल त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. विनोद ही आज सर्वांच्या आकलनाची बाब राहिलेली नाही. धार्मिक आणि राजकीय बाबतीत तर त्याचा वापर जपून करावा लागतो.’ गोव्यात स्वतःची गॅलरी असावी, त्यात कार्यशाळा आयोजित व्हाव्यात, प्रदर्शने भरावीत हे बिलीचे स्वप्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com