फॅशन डिझाईन मधील गोमंतकीय नवप्रभा

‘हाऊस ऑफ मार्क्सि’ हा मार्सीने स्वतः निर्माण केलेला ब्रँड आहे
Art
ArtDainik Gomantak
Published on
Updated on

मार्सी गोम्स

मार्सी गोम्सने 12वी जरी वाणिज्य शाखेतून पूर्ण केली तरी तिच्या मधला कलाकार आणि रचनाकार तिला वेगळ्या वाटेतून जाण्यासाठी खुणावत होता. रंग, आकार यांचे सौंदर्यशास्त्र तिला फार पूर्वीपासून मोहित करत होते.

कलेच्या आकर्षणामुळे आर्ट क्लासेस मध्ये ती भाग घ्यायची. ती म्हणते, ‘मला नेहमीच कलाकार बनायचे हाेते. 12 वी पूर्ण व्हायच्या पूर्वीच मला ते जाणवले होते. फॅशन डिझाईनकडे माझी ओढ होती. माझ्यात त्यासंबंधीचे काहीतरी आहे असे मला जाणवायचे. मी तेच करायचे ठरवले.’

म्हापसा येथून बारावी पूर्ण केल्यानंतर मार्सीने मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीत वसलेल्या िव्हसलींग वूडस्‌ इंटरनॅशनलमध्ये फॅशन डिझाईन अभ्यासक्रम करण्यासाठी प्रवेश घेतला. या संस्थेमधली तीन वर्षे तिच्यासाठी तिला समृद्ध अनुभव देणारी ठरली.

Art
Margao : पायाभूत स्तरावर मुलांना हसत खेळत शिक्षण देण्याची योजना : मधूश्री

या अभ्यासक्रमातला तिचा अंतीम वर्षाचा प्रकल्प, ‘मुळांचो मोग’, तिला ‘इनोव्हटीव्ह डिझाईन इन टॅक्सटाईल’ या विभागात उत्कृष्ट डिझाईनर म्हणून पुरस्कार देऊन गेला. गोव्याची कुणबी साडी, मदर ऑफ पर्ल शिंपले आणि बांबूच्या वेतापासून तिने बनवलेल्या वस्त्ररचना असाधारण अशाच होत्या. गोव्याच्या या वैशिष्ट्यांना आपल्या प्रतिभेद्वारे तिने आकर्षक स्वरुपात सादर केले.

मार्सी आता गोवा आणि मुंबई या दोन्ही ठिकाणावरुन काम करत असते. ‘हाऊस ऑफ मार्क्सि’ हा तिने स्वतः निर्माण केलेला ब्रँड आहे जिथे ती शाश्‍वत फॅशनची निर्मिती करत असते. मार्क्सि हे तिचे इन्स्टाग्राम नाव असल्याने खुप लोक तिला त्या नावानेच ओळखत असत. ि

व्हसलींग वूडमध्ये शिकत असताना, पहिल्या सेमिस्टरच्या काळातच तिने आपला मार्क्सि हा लोगो बनवला. त्यामुळे ‘हाऊस ऑफ मार्क्सि’ हेच आपल्या बॅण्डचे नाव असावे असे तिने समर्पकपणे ठरवले.

Art
Bicholim News: वीज खात्याकडे काँग्रेसची मागणी; भूमिगत वीज केबलसाठी खोदकाम...

फॅशन डिझाईऩची पदवी प्राप्त करुन तिला आता फक्त एकच वर्ष झाले आहे पण तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरची, तिच्या वस्त्ररचनांची छायाचित्रे पाहिल्यास तिच्या प्रतिभेची कल्पना येते.

तिच्यापाशी बोलताना, ‘आपल्याला अजून खुप शिकायचे आहे’ हा तिचा नम्र भाव तिच्या भविष्यकालीन वाटचालीची दिशा व तिची वृत्ती स्पष्ट करतो.

मुंबईतील व्यावसायिक मॉडेलबरोबर काम करत असताना गोव्यातील काही मॉडेलबरोबरही तिने काम केले आहे. मुंबईतील अती व्यावसाियक असणाऱ्या मॉडेलबरोबर गोमंतकीय मॉडेलची तुलना करताना तिला वाटते की, गोव्यातही अनेक प्रतिभावंत मॉडेल आहेत ज्यांना अजून संधी मिळण्याची गरज आहे. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

वस्त्ररचनांमध्ये शाश्‍वत आणि कमी खर्चिक अशा निर्मितीवर मार्सी भर देऊ इच्छिते. तिच्यासाठी या दोन्ही बाबी खूप महत्वाच्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com