Portuguese Architecture: घरे बदलली आणि माणसेही

या स्क्वेअरची अनेक वैशिष्ट्ये आहेत जी पाहुण्यांना दिसत नाहीत आणि नव्याने स्थायिक झालेल्यांनाही माहीत नाहीत.
Portuguese House
Portuguese House Dainik Gomantak

वाल्मिकी फालेरो

आपण गेल्या लेखात पाहिल्याप्रमाणे नवव्या वांगोडचे प्रभुसरदेसाई आणि त्यांची पत्नी सुनीता राणी यांनी ख्रिश्‍चन पंथ स्वीकारला आणि आंद्रादे हे आडनाव लावण्यास सुरुवात केली. बोर्डा येथील ते एकमेव गावकर कुटुंब होते.

कच्चे मेण आयात करणे, ते परिष्कृत करणे आणि तयार झालेले उत्पादन निर्यात करणे या व्यवसायात आंद्रादे होते. किनाऱ्यावरील व्यवसायासाठी या कुटुंबाकडे एक बोट आणि रिव्हर क्राफ्ट होते.

कच्च्या मेणाचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यांनी राय आणि राशोल येथील लोकांना कामावर ठेवले. बोर्डा येथे राशोलच्या लोकांचे पुनर्वसन झाल्यानंतर, व्यापार शिकलेल्या बोटीवरील कर्मचाऱ्याने त्यांच्याशी व्यापारी स्पर्धा सुरू केली.

भरीस भर म्हणून आंद्रादे घराण्यातील एक मुलगा शेजारी राहणाऱ्या वाझ मुलीच्या प्रेमात पडला. त्याला संपत्तीपासून व वारसाहक्कापासून त्वरित बेदखल करण्यात आले. त्या कुटुंबातील बर्नार्डो वाझ यांनी २०व्या शतकात ‘इंस्टिट्यूट आंद्रादे’ नावाची टायपिंग शाळा चालवली, हा विरोधाभास फार रंजक आहे.

दिवंगत डॉ. नॉर्मन परेरा यांच्या घराच्या पूर्वेला असलेले मूळ गावकर आंद्रादेंचे घर आता आधुनिक इमारतीत आले आहे. मडगाव-कुडतरी रस्त्याच्या पलीकडील विस्तीर्ण अंगण जेथे एकेकाळी सूर्यप्रकाशात मेण वाळवून त्यावर प्रक्रिया केली जात असे, ती आता आर्को आयरिश कॉलनी आहे.

आंद्रादे वंशज आता अनेक ठिकाणी विखुरले आहेत. आता १२व्या पिढीत आगोस्तीन आंद्रादे लेखकाचे शेजारी व नातेवाईक आहेत. दोन्ही आंद्रादे शाखांमध्ये प्रभुसरदेसाई कालखंडातील वंशावळीची शाखा आहे, ज्यांना त्यांच्या एक डझन आद्रादे याजक आणि तीन चुलत भाऊ असलेल्या याजकांनी पिढ्यान्पिढ्या एकत्र ठेवले आहे.

काही पिढ्यांनंतर जसजशी कुटुंबे विस्तारत गेली, तसतसे - गावकर असलेले आंद्रादे आणि स्थायिक कुलासो कुटुंबांसारखे - त्यांच्यापैकी बरेच जण बोर्डा येथून चर्च स्क्वेअर येथे स्थलांतरित झाले.

सांतान-तळावली येथील कोस्ता आणि शोराव येथील अल्वारिस ही आणखी दोन प्रमुख स्थायिक कुटुंबे त्याच वेळी मडगावमध्ये स्थलांतरित झाली. दोन किंवा अधिक जुन्या घरांमुळे नेहमी उंच प्लिथंवर बांधलेले आणि अनेकदा मजली असलेल्या एकाच मोठ्या घराला रस्ता मिळत असे.

यांपैकी काही घरे नंतर विस्तारित कुटुंबांमध्ये विभागली गेली, परंतु पुनर्बांधणी केलेली लहान घरे त्या काळातील श्रीमंतांना परवडणारी व इंडो-पोर्तुगीज वास्तुशिल्प रचनांना अनुरूप अशी होती.

जुन्या गावाच्या चौकाची भूमिती आणि वातावरण कायमचे बदलले. नवीन घरे, चर्च आणि त्याचा परिसर यांना पूरक असल्यामुळे स्क्वेअरचे वैशिष्ट्य ठरली. जी आजही मडगावचा सर्वांत उल्लेखनीय आणि शांत भाग आहे.

Portuguese House
जरा विसावू या वळणावर...

ऑक्टोबर १८६४मध्ये पोर्तुगीज कृषीशास्त्रज्ञ, आंतोनियो लोपेझ मेंडिस मडगावला गेले तेव्हा त्यांनी त्याचे वर्णन अथेनास कॉन्कॉन्सेन्स (गोव्याचे अथेन्स) असे केले.

त्यांनी चौकातील सर्वांत प्रभावी सार्वजनिक इमारतींची यादी म्हणून नगरपालिका, गावकारिया, प्रशासक द कॉन्सेल्हो (तालुका प्रशासक) कार्यालय, केडिया (जेल), क्वार्टल मिलिटरी (लष्करी स्टेशन), जुनी व नवीन अशा दोन स्मशानभूमी आणि कॅमारा अग्ररिया यांचा उल्लेख केला आहे.

(मेंडिस नऊ वर्षे, १८६२-७१पर्यंत गोव्यात होते. त्यानंतर ते पोर्तुगाल आणि ब्राझीलमध्ये होते. २४ नोव्हेंबर १८७८ रोजी ते म्हापसा, दमण आणि दीव या मतदारसंघातून संसदेत निवडून आले आणि ३ रोजी लिस्बन कोर्टेसमध्ये त्यांची जागा घेतली - फेब्रुवारी १८७९.)

जुन्या बाजारातून चर्च स्क्वेअरकडे वळताना लेखकाचे बाहेरचे आणि परदेशातील अभ्यागत सामान्यतः पूर्णपणे वेगळ्या भावना व्यक्त करतात.

अरविंद अडिगा २०१२मध्ये प्रस्तुत लेखकाला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनी या जागेबद्दल, ‘वेगळे वातावरण, जागा आणि सहजतेची आनंददायी भावना’, असे म्हटले होते.

(आदिगा हे दक्षिण पूर्व आशियातील टाइम मासिकाचे माजी विशेष प्रतिनिधी, त्यांना २००८मध्ये हार्परकॉलिन्स आणि इंडिया टुडे ग्रुपने प्रकाशित केलेल्या ‘द व्हाईट टायगर’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार मिळाला आहे.)

या स्क्वेअरची अनेक वैशिष्ट्ये आहेत जी पाहुण्यांना दिसत नाहीत आणि कदाचित अलीकडच्या काळात स्थायिक झालेल्या व स्क्वेअरमध्ये राहणाऱ्यांनाही माहीत नसावीत. उदाहरणार्थ, १८व्या शतकापर्यंत, किमान रुआ डी नॉर्टेवरील सर्व घरे त्यांच्या दरम्यानच्या समान भिंतींमधील दरवाजांनी एकमेकांशी जोडलेली होती. हे एक अद्वितीय संरक्षक वैशिष्ट्य होते.

Portuguese House
Gol Gumbaz Bijapur - Vijapur: गोलघुमट व ‘बिजली पत्थर’

१७४१ संपता संपता मराठ्यांच्या मोठ्या आक्रमणापर्यंत, जेव्हा ४३वे व्हाइसरॉय, १७४१-४२, लुईस कार्लोस इनासिओ झेवियर द मिनेझिस, कोंद द एरिकिएरा आणि नंतर सहा युद्धनौका, चार कंपन्या आणि १६ (६०?) उत्तम गती असलेल्या तोफा घेऊन मार्क्स द लॉरिसाल तोफगोळ गोव्यात आले (१७१७-२० दुसऱ्यांदा) तेव्हाही मडगाववर हल्ले होतच होते.

त्यांनी मराठा सरदार व्यंकटरावांची स्वप्ने धुळीस मिळवली. १९व्या शतकात सत्तरीच्या राणेंनीही लहानसहान हल्ले केले होते.

अशा वेळी, एकमेकांशी समान भिंतींनी जोडलेल्या घरांमधून बाहेर पडत स्त्रिया आणि मुले, सांतोस वाझ यांच्या घराच्या अंतर्गत अंगणात आश्रयास आली. या अंगणात सुरू होणारा एक बोगदा त्यांना राशोलच्या तत्कालीन तटबंदीत असलेल्या सध्याच्या सेमिनरीच्या अंगणात घेऊन गेला.

अंगणात भूमिगत पॅसेज असलेले लोअर बोर्डा येथील गावकर पाशेको यांचे घर त्यांना वाटेत लागले. ज्यामुळे कदाचित या मडगाव-राशोल बोगद्याकडे नेले असेल.

२४ डिसेंबर १६८३ रोजी संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांशी झालेल्या अत्यंत क्लेशकारक आणि दुःखद अनुभवानंतरच हा सुटकेचा मार्ग बांधला गेला की, प्राचीन काळापासून अस्तित्वात होता हे माहीत नाही.

Portuguese House
Festival: सप्टेंबर : उत्सवांचा उत्सवी महिना

लेखकाच्या माहितीनुसार, या बोगद्याच्या अस्तित्वाचे दस्तऐवजीकरण यापूर्वी झालेले नाही, सध्याच्या सेमिनरीच्या कंपाऊंडमध्ये राशोलच्या टोकाला उघडणारी एक गुहा असली तरी. या बोगद्याची माहिती मडगाव येथील गावकर कुटुंबीयांच्या मौखिक इतिहासातून पुढे आली आहे.

वर आच्छादित छप्पर आणि खाली समान भिंतीतील दरवाजांनी एकमेकांशी जोडलेली घरे एकेकाळी चांगल्या विणलेल्या समाजाच्या एकतेचे प्रतीक होती.

नंतर घरे विकली गेली, त्यांची पुनर्विक्री झाली आणि विविध पार्श्वभूमीतील लोक चौकात राहायला आले तेव्हा ही एकता भंग पावणे स्वाभाविक होते.

घर फिरले की, घराचे वासेही फिरतात. मग काय, शेजारच्या शेजाऱ्यांमध्ये भांडणे आणि खटले ही दररोजची व सामान्य बाब बनली. कारण समानी भिंती किंवा छप्पर दुरुस्त केले गेले तेव्हा दारे पाडली गेली आणि शेजाऱ्याने त्याच्या बाजूच्या घरात आमूलाग्र बदल केले होते. केवळ घरेच नव्हे तर माणसे व आदरातिथ्याची पद्धतही बदलली.

मूळ गावकर असलेले लोक (हिंदू असो वा ख्रिस्ती) श्रीमंतीचा खोटा बडेजाव करणारे नव्हते. जी आपली परिस्थिती आहे ती आहे, त्या परिस्थितीत आनंदाने राहत होते. पण, नव्याने आलेला वर्ग श्रीमंत असण्यापेक्षा श्रीमंत असल्याचे दाखवण्यातच जास्त स्वारस्य असलेला होता.

सकाळी अंगणात बसून पेज जेवत असला, तरी थाट मात्र येणाऱ्या जाणाऱ्याला अशा पद्धतीने दाखवायचा की, जणू तो मटणाचा रस्साच भुरकतोय. दिखाऊ श्रीमंती माजली, मनाची श्रीमंती गरीब होत गेली. मठग्रामाचे मडगाव होताना, तशा वेगळ्याच अर्थाने बदलले!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com