Festival: सप्टेंबर : उत्सवांचा उत्सवी महिना

भारतात आपण सण आणि उत्सवाचे प्रतीक म्हणून फुलांचा वापर करतो. मंदिरे आणि चर्च दररोज प्रसाद म्हणून फुलांचा वापर करतात.
Festival
FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Festival माणूस हा आठवणींत रमणारा प्राणी आहे. अगदी एच. ब्रिटनच्या बँड्रा फेस्ताक गेल्लो हांव निमण्या आयतरा उगडास वयचोना मतीच्या फेस्ताचो चार आण्यांक हांव मोग जिकलो बँड्राच्या चेडवाचो...

या गाण्याप्रमाणे. कुठल्याच फेस्तात, जत्रेत आता ‘रिंग’ टाकण्याचा खेळ चार आण्यांचा उरला नाही, पण त्या आठवणी मात्र अगदी सोळा आणे शिल्लक आहेत. सप्टेंबर महिना जवळजवळ प्रत्येक गोमंतकीय कॅथलिक आणि हिंदूंच्या वर्षभर स्मरणात राहतो.

१९६१साली आलेल्या ‘कम सप्टेंबर’ हा अमेरिकन विनोदी चित्रपट, त्यातील फ्रँक सिनात्राच्या ’सप्टेंबर सॉंग’मुळे अनेकांच्या आजही स्मरणात आहे, अगदी तसाच सप्टेंबर महिना गोमंतकीयांना फेस्त व सणांची रेलचेल यामुळे कायमच स्मरणात राहतो.

कॅथलिक आणि हिंदूंच्या देवतांचे जन्मदिन साजरे करतात. श्रावणाच्या पौर्णिमेनंतर आठव्या दिवशी अष्टमीला मथुरेत कृष्णाचा जन्म झाला; म्हणून जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमीचा हा शुभ दिवस ६ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला.

गोव्यात हा कार्यक्रम पंचगंगा नदीच्या काठावर जुन्या तीर्थावर साजरा करण्यात आला. नार्व्यातील सप्तकोटेश्वर मंदिर, बांदोडा येथील नागेश मंदिर आणि माशेलातील देवकीकृष्ण मंदिर यासह इतर मंदिरांत कृष्णजन्माष्टमी साजरी करण्यात आली. बालगोपाळांनी दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला.

या तारखेला कॅथलिक चर्च व्हर्जिन मेरीच्या जन्माचे फेस्त साजरे करते. कारण हा दिवस तिच्या जन्माचा दिवस मानला जातो, जो ८ डिसेंबर रोजी झालेल्या इमेक्युलेट कन्सेप्शन फेस्ताच्या नऊ महिन्यांनंतर येतो.

गोव्यातील सर्व चर्च मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने हा सण साजरा करतात. सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी चिंचिणी चर्चचे फेस्त साजरे होते. १६व्या शतकापासून, या फेस्ताला ‘मॉन्टी सायबिणिचें फेस्त’ असे नाव देण्यात आले.

हे नाव जुने गोवे येथील कपेला द नोसा सेन्होरा दोे मॉन्ते, कपेल ऑफ अवर लेडी ऑफ द मॉंते यावरून घेतले गेले. हे कपेल अफोंसो द अल्बुकर्कच्या आदेशानुसार एका टेकडीवर बांधले गेले. अपोलिनारिओ कार्दोस एस. जे. या कपेलचे फादर होते.

१६व्या शतकातील जेझुइट गॅस्पर बार्झियस यांनी फुले उधळण्याची ही प्रथा सुरू केली. नव्याने ख्रिस्ती झालेल्या मुलांना त्यांनी नॉवेर्नाच्या दिवसांत फेस्तासाठी फुले आणण्याची विनंती केली.

भारतात आपण सण आणि उत्सवाचे प्रतीक म्हणून फुलांचा वापर करतो. मंदिरे आणि चर्च दररोज प्रसाद म्हणून फुलांचा वापर करतात. तथापि १७३६च्या आदेशानुसार ख्रिश्‍चन झालेल्या स्त्रियांना केसात फुले माळण्यास बंदी करण्यात आली होती.

एका कॅथलिक याजकाने सांगितल्याप्रमाणे या स्त्रियांमध्ये देवाचा कौल घेण्याची, प्रसाद पाकळीची प्रथा होती. आजही गोव्याच्या मंदिरांमध्ये प्रसाद घेतला जातो.

पिढ्यानपिढ्या चालत आलेली सांस्कृतिक प्रथा, पंथ बदलल्यानंतर रातोरात समाजमनातून पुसली जाऊ शकत नाही! त्यामुळे त्यांनी कॅथलिक मूर्तींना लाळेचा वापर करून पाकळ्या चिकटवण्यास प्रारंभ केला व कॅथलिक देवांचा कौल घेण्यास सुरुवात केली.

मदर मेरीच्या पुतळ्यावर फुले उधळण्याची परंपरा गोव्यातील जवळपास प्रत्येक चर्चमध्ये बदलली आहे. आता मुले मिरवणुकीत वेदीच्या समोर ठेवलेल्या मूर्तीकडे जातात जी आणि अवर लेडीच्या पायावर फुले ठेवतात. मिरवणुकीत ते ‘देवाची माय (देवाची आई)’ हे भजन गातात.

चर्चच्या फेस्ताशी काही संबंध नसला तरीही ८ सप्टेंबर हा ‘मदेराचें फेस्त’ (लाकडी सामानाची जत्रा) म्हणूनही साजरा केला जातो. चिंचिणी हे गाग सुतारांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी घरी तयार केलेली लाकडी कपाटे, पलंग, खुर्च्या, वेद्या इत्यादी लाकडी सामान ते फेस्ताच्या दिवशी आणून चर्चसमोरील मोकळ्या जागेत ठेवत.

आगामी लग्नाच्या हंगामात याला मागणी असे. आज अर्थातच पुरुमेताचे फेस्त, मिलाग्रिस फेस्ट इत्यादी इतर फेस्तांमध्येही लाकडी सामान विकले जाते. परंतु पूर्वीच्या काळात चांगल्या फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेले फेस्त म्हणजे चिंचिणीतले अवर लेडी ऑफ होपचे फेस्त होते.

मजोर्डामध्ये माई डी ड्यूस (देवाची आई) चर्चमध्ये फेस्त साजरे केले जाते. फेस्ताच्या आधी ख्रिश्चन समुदाय बोटी बनवतात आणि त्यांना ताडाच्या पानांनी सजवतात. मेजवानीच्या पूर्वसंध्येला या सर्व बोटी मिरवणुकीतून चर्चमध्ये आणल्या जातात.

त्या प्रत्येक बोटीमध्ये मेरीची मूर्ती ठेवली जाते. मास झाल्यानंतर पॅरिश याजक आशीर्वाद देतात आणि त्यांना धूप दाखवतात. ही प्रथा बंद करण्यात आली होती, परंतु १० वर्षांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. वादळात बोट नष्ट होऊनही मदर मेरीने नाविकांना सुरक्षित किनाऱ्यापर्यंत आणले, त्याचे स्मरण म्हणून या बोटी आजही सजवल्या जातात व चर्चमध्ये आणल्या जातात.

गणेशचतुर्थी हा गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी येण्याचा सण आहे. या वर्षी हा सण सप्टेंबर महिन्यात आला आहे. गणपती ही बुद्धी, समृद्धी व सौभाग्याची देवता आहे. आपल्या परसदारी, कुळागरात उपलब्ध असलेली फळे, भाज्या व फुले वापरून ‘माटोळी’ सजवली जाते.

सर्व गोमंतकीयांच्या घरी मोदक, करंज्या, लाडू आदी खाद्यपदार्थ बनवले जातात. प्रत्येक गोमंतकीय घर गणेशचतुर्थीची आतुरतेने वाट पाहते. भगवान गणेश हा विद्येचा देव आहे आणि विघ्नहर्ता किंवा अडथळे दूर करणारा म्हणूनही त्याचा आदर केला जातो.

हा गणपती आपल्या ‘घरी येण्याचा’ सण आहे, त्यामुळे केवळ घरच नव्या रंगांनी सजते असे नव्हे तर माणसांचे अंतरंगही सजते. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आवर्जून एकमेकांच्या घरी जाऊन कौटुंबिक नातेसंबंध जपले जातात.

नोकरीधंद्यासाठी शहरात, परराज्यांत, परदेशात वास्तव्य करणारे लोक आपल्या वडिलोपार्जित घरी परततात. घर माणसांनी भरून जाते. गोवा मुक्तीनंतरच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले जाऊ लागले.

Festival
जरा विसावू या वळणावर...

गणेशचतुर्थीनंतर भाद्रपद पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भगवान विष्णूची आराधना करणारे अनंत चतुर्दशी हे व्रत केले जाते. अनंत देवाची पूजा करण्याचा आणि लाल रंगाच्या अनंत चतुर्दशीच्या धाग्याची प्रतिष्ठापना करण्याचा दिवस आहे.

खिरीचा व खास पाककृतीचा नैवेद्य दाखवला जातो. जुने धागे विसर्जित करून नवीन धागा बांधला जातो. सात जुन्या धाग्यांसह हे सूत्र ब्राह्मणांना दान केले जाते व उर्वरित धागे कुटुंबासाठी ठेवले जातात.

बऱ्याच गोमंतकीयांसाठी वेलंकणी चर्चचे फेस्त हे मदर मेरीवरील त्यांची श्रद्धा आहे. फेस्ताच्या आधी आणि नंतर यात्रेकरूंसाठी रेल्वे गोवा ते नागपट्टिनम दरम्यान विशेष गाड्या सोडते.

प्रसिद्ध बॅसलिका ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ ‘लॉर्डेस् ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखली जाते. लोकांचा असा विश्वास आहे की मदर मेरीमुळेच काही पोर्तुगीज खलाशी वादळातून चमत्कारिकरीत्या वाचले.

Festival
Gol Gumbaz Bijapur - Vijapur: गोलघुमट व ‘बिजली पत्थर’

युरोपमध्ये सप्टेंबर हा शाळांमध्ये नवीन वर्षाचा महिना आहे. कारण तिथे शरद ऋतूच्या आगमनाने दमट, ढगाळ वातावरण बदलून सूर्याचे दर्शन घडू लागते. भारतात सप्टेंबर हा सर्वांत उत्सवी महिन्यांपैकी एक आहे.

इस्लाम पंथीयांच्या सणांच्या तारखा चंद्राच्या दर्शनावर अवलंबून असल्यामुळे तारखांमध्ये फरक पडतो. सप्टेंबर हा एक असा महिना आहे जो देव, निसर्ग आणि लोक एकत्र साजरे करतात. मग तो मोंते फेस्त, फुलांचे फेस्त, जन्माष्टमी किंवा गणेश चतुर्थी असो - गोवा, भारत आणि युरोपमधील सर्वांसाठी सप्टेंबर हा उत्सवी महिना आहे.

जेव्हा देव त्याच महिन्यात कोणत्याही वैरभावाशिवाय उत्सव साजरा करतात तेव्हा आपण आपल्यातील मतभेद का चव्हाट्यावर आणून भांडतो? मतभेदांचा आदर करणे आवश्यक आहे आणि आमच्या गोव्यातील मैत्रीपूर्ण जीवनाचा एक भाग म्हणून मतभेद कायम राहतील. मतभेद असले तरी मनभेद नसणे, हेच गोमंतकीय असण्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com