Goa Diwali 2022: ''दिवाळीचा फराळ अन् फराळाची दिवाळी''

Goa Diwali 2022: दिवाळी म्हटली की नरकासुरापेक्षा तऱ्हेतऱ्हेचा बनणारा फराळ हिच तिची संपन्न ओळख असते.
Goa Diwali 2022:
Goa Diwali 2022:Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Diwali 2022: गणेश चतुर्थीनंतर येणारा महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी जवळ आली आहे याची चाहूल, निदान गोव्यात तरी, नरकासुर बनवण्याचे साहित्य जेव्हा कोपऱ्या-कोपऱ्यावर जमा व्हायला लागते तेव्हाच येते. आणि फराळाची तयारी घरच्या स्वयंपाकघरात जेव्हा सुरु होते तेव्हा त्यावर शिक्कामोर्तब होते. अर्थात दिवाळी म्हटली की नरकासुरापेक्षा तऱ्हेतऱ्हेचा बनणारा फराळ हिच तिची संपन्न ओळख असते.

कधी काळी हे फळाराचे जिन्नस वर्षातून एकदाच- दिवाळीच्या निमित्ताने बनत. त्यामुळे लाडू, चकली, शंकरपाळे, चिवडा, साटोऱ्या, अनारसे वगैरे पदार्थांचे कमालीचे अप्रूप असायचे. मात्र आता हे जिन्नस वर्षभर उपलब्ध होत असल्यामुळे त्यांचे फारसे काही वाटत नाही. तरी अजूनही दिवाळीच्या दिवशी हे जिन्नस फळाराचा भाग बनून, सन्मानानेच बशीतून मिरवत येतात.

Goa Diwali 2022:
Goa News: कळंगुटमध्ये टॉवरला ग्रामस्थांचा विरोध!

त्यामुळे या पदार्थांच्या तळणीचा वास दिवाळीपूर्वी स्वयंपाकघरात घमघमतोच. घरात, खुसखुशीत, तोंडात घातल्या-घातल्या विरघळणारी चकली बनली तर तो घरातल्या गृहीणीच्या अभिमानाचाच विषय बनतो. मग या चकल्या शेजारच्याही चार घरात जातात आणि मग तिथले कौतुकही दिवाळीच्या दिवसात अंगावर चढणाऱ्या नव्या कोऱ्या वस्त्रासारखे छान मिरवले जाते.

11व्या शतकातील ‘भोजनकुतूहल’ या रघुनाथसुरी उर्फ रघुनाथ गणेश नवहस्ते लिखित ग्रंथात दिवाळीच्या फराळाचा उल्लेख येतो. बसुबारसेला सुरु होणारा हा सण भाऊबिजेपर्यंत विविध प्रकारे साजरा होतो. आणि त्यातल्या प्रत्येक दिवशी ‘फराळ’ हा महत्वाचा भाग असतो. त्यामधल्या ‘दिवाळी’ या सणाला विशेष महत्व असते.

त्या दिवशी भल्या पहाटे अभ्यंगस्नान करुन पायांच्या छोट्याखाली कारीटे फोडून त्यातला कडू रस चाखून किंवा कडूलिंबाचा रस पिवून, देवदर्शन करुन घरी बनवलेल्या पोहे-फळाराच्या पदार्थांचा समाचार घेऊन दिवाळीची सुरुवात होते.

Goa Diwali 2022:
Goa Construction: बांधकाम साहित्य मिळेना; कामगारांवर ओढवली उपासमारीची वेळ!

ह्या फळारासंबंधाने दिवाळीच्या दिवसात वेगवेगळ्या माध्यमातून सल्ल्यांचा मारा सुरु असतो. उदा. ‘चकली कुरकुरीत कशी बनवावी या संबंधाने’ वर्तमानपत्रांमधून, फेसबुकवरून, व्हॉट्सअ‍ॅपवरून, आनलाईन माध्यमातून हमखास सल्ला मिळत असतो. ‘चकलीसाठी लागणारां पीठ थोडं वाफवून घेतलं की चकली कुरकुरीत होते’ किंवा ‘चकली बनवत असताना सारखी तुटत असेल तर पिठात थोड पाणी आणि तेल घालून व्यवस्थित तळून घ्या’ ही वाक्ये तर या दिवसात हमखास वाचनात येतात.

‘शंकरपाळी खुसखुशीत बनत नाही? तर नक्की वाचा खास टिप्स’, ‘दिवाळीचा फराळ वर्तमानपत्रावर ठेवू नका, गंभीर आजाराचा धोका वाढतो’ ही वाक्ये जर आपण या दिवसात कुठे ना कुठे जर वाचलेली नसतील तर त्याचा एकच एकच अर्थ असू शकतो- आपले वाचन फार कमी आहे.

Goa Diwali 2022:
Rohan Khaunte: ...अन्यथा गोव्यातील पर्यटक कर्नाटक, महाराष्ट्रकडे वळतील

दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे तरी गोव्यात पाऊस अजून सुरुच आहे त्यामुळे पुढील वाक्ये जर वाचनात आली तर ती तपशीलवार अवश्‍य वाचा- ‘ऐन दिवाळीत पावसामुळे चिवडा चकली मऊ पडत?’ 4 सोपे उपाय: फराळ होईल मस्त कुरकुरीत’! ‘लक्ष्मी पूजनात या पदार्थांचा नैवद्य नक्की दाखवा’ अशासारख्या वाक्यातून भावीक वृत्तीच्या लोकांना धमकीवजा इशाराही मिळतो.

फराळाच्या बाबतीत दरवर्षी नेमाने येणारी आणखी बातमी म्हणजे राज्यात (किंवा देशात) स्वयंपाकाच्या गॅसची किमंत वाढल्याने या वर्षी दिवाळीचा फराळ महागणार अर्थात महागाईच्या वाढत्या निर्देशांकाची सवय असल्याने लोक ही बातमी अलिकडच्या काळात फारशी मनावर घेत नाहीत ही गोष्ट वेगळी.

Goa Diwali 2022:
'Bondla' मास्टरप्लॅनला मान्यता; नव्या बदलाने प्राण्यांचा अधिवास वाढेल

कधी धान्याची किमंत वाढलेली असते, एखाद्या वर्षी खाद्यतेल वाढलेलेले असते, कच्चा पदार्थ्यांचे दर वाढलेले असतात त्यामुळे ‘यंदा अमूक टक्के दरवाढ’ हे वर्तमानपत्रांच्या पानावर हमाखास अवतरणारे वाक्य असते.

अर्थात हे सगळं असलं तरी कसं काय कळत नाही पण ‘महागाई वाढली असली तरी फळारांच्या पदार्थांची मागणी घटलेली नाही’ या वाक्यानेच त्या महागाईवरच्या बातमीचा समारोप होत असतो. आणि दिवाळीच्या दिवशी तर महागाई वगैरे शब्दांना बासनात गुंडाळून ‘फराळ’ अगदी अतिथ्यपूर्वक ताटातून समोर हजर होतोच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com