'Bondla' मास्टरप्लॅनला मान्यता; नव्या बदलाने प्राण्यांचा अधिवास वाढेल

वाघांची जोडी आणण्यासाठी प्रयत्नशिल
Bondla
BondlaDainik Gomantak

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (CZA) बोंडला मास्टरप्लॅनला तत्वतः मान्यता दिली आहे. अशी माहिती वन्यजीव संरक्षक संतोष कुमार यांनी दिली आहे. या मान्यतेने बोंडला वन्यजीव अभयारण्यात आवश्यक असणारे बदल करणे शक्य होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

(central Zoo Authority gives thumbs up for Bondla masterplan)

संतोष कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, बोंडला वन्यजीव अभयारण्यात गेल्या काही दिवसांपासुन वाघ, डुक्कर, प्राण्यांचे पिंजरे यांच्यासाठी काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक होते. या बदलांना प्राधिकरणाने ( central Zoo Authority ) मान्यता दिली असल्याने आवश्यक बदल केले जातील. याच्यामुळे अभयारण्यात प्राण्यांना अधिक योग्य वातावरण मिळेल. आणि याचा परिणाम त्यांची संख्या वाढण्यात होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Bondla
Goa Police: अखेर राज्यातील '10' पोलिस अधीक्षकांना कार्यभार!

गोवा वन विभागाने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण (CZA) कडे सादर केलेल्या बोंडला वन्यजीव अभयारण्याच्या मास्टर प्लॅनला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. याचा भाग म्हणुन यांच्याकडून काही सूचना येणार आहेत आणि त्यानंतर आम्ही बोंडलाचा विकास करू शकू असे कुमार यांनी सांगितले. ते नुकताच पार पडलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने माध्यमांशी बोलत होते. मास्टरप्लॅननुसार प्राणीसंग्रहालयासाठी पिंजऱ्यांचे नवीन केले जाणार आहे आणि वन्यजीव अभयारण्यातील सुधारणा योजनाही हाती घेण्यात येणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.

Bondla
Goa Taxi App: टॅक्सी व्यवसाय कॉर्पोरेटच्या घशात!

प्राणीसंग्रहालयात वाघांची जोडी आणण्यासाठी प्रयत्नशिल

कुमार म्हणाले, "आम्हाला वाघाच्या पिंजऱ्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातून भारतीय गव्यांच्या बदल्यात नागपुरातील वन्यजीव अभयारण्यातून वाघा आणार आहोत, याशिवाय, प्राणीसंग्रहालयात रानडुकरांची जोडी आणण्यातही विभाग प्रयत्नशिल आहे. असे ते म्हणाले.

वाघांसाठी आवश्यक अधिवास प्रदान करणे आवश्यक

"गोवा राज्याच्या सीमेवर वाघांच्या स्थलांतराचा मागोवा घेण्यासाठी आणखी अभ्यास करणे आवश्यक आहे. ते कोणत्या बाजूने कर्नाटकात प्रवेश करतात आणि बाहेर पडतात हे समजून घेणे आवश्यक आहे. गोव्यातील त्यांचा आढळ असणाऱ्या भागातून माहितीच्या आधारावर आम्हाला वाघांसाठी आवश्यक अधिवास प्रदान करणे आवश्यक आहे. असे ही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com