Connecting To Serve Legal Services: कायदे सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड

कायदे सेवांची समाजात जागृती व्हावी, यासाठी सायोनारा तेलीस लाड यांच्या ‘कनेक्टिंग टू सर्व्ह - लीगल सर्व्हिसेस, माय जर्नी-ए मेमोअर’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले
Connecting To Serve Legal Services
Connecting To Serve Legal ServicesDainik Gomantak
Published on
Updated on

मंगेश बोरकर

प्रत्येक देशामध्ये स्वतःचे कायदे असतातच. या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शांतता, जैसे थे स्थिती प्रस्थापित करण्यासाठी व वैयक्तिक हक्कांचे जतन करण्यासाठी या कायद्यांचा वापर केला जातो. पण प्रत्येकाला या कायद्यांची माहिती असतेच असे नाही. कायदे माहीत नसल्यामुळे माणूस अडचणीत येऊ शकतो.

कायदेशीर सेवांची माहितीही अनेकांना नसते. याच कायदे सेवांची समाजात जागृती व्हावी, यासाठी धडपडणाऱ्या गोवा राज्य बाल न्यायालयाच्या अध्यक्ष सायोनारा तेलीस लाड यांच्या ‘कनेक्टिंग टू सर्व्ह - लीगल सर्व्हिसेस, माय जर्नी-ए मेमोअर’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले.

या पुस्तकाद्वारे वंचितांसाठी उपलब्ध कायदे सेवांची माहिती देण्यात आली आहे. गेली 30 वर्षे सायोनारा तेलीस लाड या विधी व्यवसायात आहेत. हे पुस्तक लिहिताना त्यांना त्यांच्या अनुभवाचा पुरेपूर लाभ झाला आहे.

त्यामुळेच त्यांना कायदेविषयक माहिती अगदी सोप्या भाषेत प्रस्तुत करणे शक्य झाले आहे. एका दृष्टीने या पुस्तकातून त्यांनी आपल्या जीवनाची कहाणी सांगितली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

Connecting To Serve Legal Services
Babush Monserrate Case: बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीस गैरहजर राहण्याची बाबूश मोन्सेरात यांंना मुभा, पण...

सायोनाराने 1987 साली कारे विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. 3 डिसेंबर 1987 पासून त्यांनी कायदा व्यवसायात प्रवेश केला. 1992 साली त्या सहाय्यक सरकारी वकील बनल्या. 1996 साली त्या गोव्याच्या न्यायव्यवस्थेत सामील झाल्या व जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली.

2019 साली त्यांची गोवा राज्य कायदे सेवा प्राधिकरणाच्या पूर्णवेळ सदस्य सचिवपदी नियुक्ती झाली. 14 मार्च 2022 पासून त्या गोवा राज्य बाल न्यायालयाच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

त्यांच्याकडे असलेली गुणवत्ता, ज्ञान, पारख करण्याची क्षमता या साऱ्या गुणांमुळे या प्रवासात त्यांच्यावर विधी पेशातील नानाविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या व अनेक अधिकारही प्राप्त झाले.

Connecting To Serve Legal Services
Margao Court: पतीच्या कार लोनसाठी पत्नी हमीदार; चेक झाला बाऊन्स अन् महिलेला 15 लाख दंडासह झाली 2 महिन्यांची शिक्षा

सायोनारा तेलीस लाड यांचे हे तिसरे पुस्तक आहे. या पूर्वी १९८९ साली त्यांचे ‘माय कलेक्शन्स’ हे त्यांनी लिहिलेल्या अनेक लेखांचे संकलन संग्रह रूपाने प्रकाशित झाले. २०२० साली ‘चिअर्स! लाफ आऊट लाऊड’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

विधी सेवेची सर्वांना समान संधी मिळणे, मोफत कायदे सल्ल्यासाठी ज्या अनेक संस्था कार्यरत आहेत, त्यांची माहिती प्राप्त होणे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती किंवा दिव्यांगांना मोफत कायदे सल्ला मिळणे या बाबींची सविस्तर माहिती या पुस्तकात असल्याचे लेखिका सायोनारा लाड सांगतात.

त्या म्हणतात, की कायदा सेवेचा परिणामकारक लाभ उपेक्षितांना सक्षम करण्यासाठी व्हावा या दृष्टीने आपण सक्रिय असून हे पुस्तक त्या सर्व उपेक्षितांना लाभदायक ठरेल. तसेच ज्यांना कायदेशीर बाबी माहीत आहेत व ज्यांना माहीत नाहीत, यांच्यामधील माहितीची दरी कमी करण्यासाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल. हे पुस्तक लिहिताना माझ्या अनुभवांचा चांगलाच लाभ झाल्याचेही त्या सांगतात.

Connecting To Serve Legal Services
Mapusa Municipality: नगरसेवकांचा अभियंत्यांवर गंभीर आरोप, म्हणाले..

या पुस्तकाद्वारे कायदेशीर सेवांचे स्वरूप, योजना, कायदेशीर सल्ला देणाऱ्या संस्था याबद्दलची माहिती देणारी प्रकरणे असल्याचेही त्यांनी सांगितले.

सायोनारा लाड यांनी अनेक वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमध्ये अनेक कायद्याशी संबंधित मार्गदर्शनपर लेख लिहिले आहेत. कायदेविषयक उपक्रमांचेही त्यांनी संचालन केले आहे. लाड यांना विविध मान्यवर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यात प्रामुख्याने ‘आदर्श महिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2019’ तसेच टपाल खात्याने 2022 साली आंतरराष्ट्रीय महिला दिनी ‘माय स्टॅम्प’ या पुरस्काराचा समावेश आहे. त्याच दिवशी गोवा राज्य कायदे सेवा महामंडळाने त्यांचा यथोचित गौरव केला.

कायदेशीर समस्या घेऊन त्यांच्या समोर आलेल्या अनेकांना त्यांनी योग्य न्याय मिळवून दिला आहे. कायदेविषयक जागृती करणे व आनंद पसरविणे हेच सायोनारा लाड यांचे समाजसेवेतील प्रमुख धोरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com