Babush Monserrate Case: बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीस गैरहजर राहण्याची बाबूश मोन्सेरात यांंना मुभा, पण...

येत्या सुनावणीस होणार पिडीतेची साक्ष; जूनपासून आठवड्याला तीन दिवस सुनावणी
Babush Monserrate |Goa News
Babush Monserrate |Goa News Dainik Gomantak

Babush Monserrate Case: बलात्कारासारख्या गंभीर आरोपात अडकलेले महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांना खास न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीस कायमचे गैरहजर राहण्यासाठी त्यांनी केलेला अर्ज खास न्यायाधीश इर्शाद आगा यांनी आज सशर्त मंजूर केला.

बाबूश मोन्सेरात यांना या सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी देताना न्यायालयाला गरज वाटल्यास त्यांना प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुनावणीस हजर व्हावे, लागेल अशी अट घालण्यात आली आहे.

Babush Monserrate |Goa News
Konkan Railway: मान्सूनपूर्व कामासाठी कोकण रेल्वे सज्ज

2016 साली मोन्सेरात यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद झाला होता. एका 16 वर्षीय मुलीला तिच्या आईकडून 50 लाख रुपयांना विकत घेऊन नंतर तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्या मुलीच्या आईलाही सह आरोपी करण्यात आले आहे.

आता या प्रकरणी 5 जून पुढील सुनावणी होणार असून त्या दिवशी त्या पिडीतेची महत्वाची साक्ष होणार आहे. 5 जूनपासून या प्रकरणी दर आठवड्याला तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस हे प्रकरण सुनावणीस येणार आहे.

मॉविन गुदीन्हो यांनाही दिलासा

4.50 कोटींच्या वीज बिल सवलत घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेले पंचायत मंत्री मॉविन गुदीन्हो यांनाही त्यांच्या विरोधात चालू असलेल्या सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी दिली न्या. आगा यांनी दिली. मात्र न्यायालयाला गरज भासल्यास त्यांना न्यायालयासमोर हजर राहावे लागेल असे या आदेशात म्हटले आहे.

गुदीन्हो हे काँगेस मंत्रीमंडळात वीज मंत्री असताना त्यांनी काही कारखान्यांना बेकायदेशीररित्या वीज बिलात सवलत देऊन 4.50 कोटींचा घोळ केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com