कुशल चेंबर संगीतकार - चेल्सी आणि क्लोई

चेल्सी आणि क्लोई यांचे पियानोवादन पर्वरी येथे, त्यांच्या कर्मा या निवासस्थानी 3 आणि 4 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.
Chelsea and Chloe
Chelsea and ChloeDainik Gomantak
Published on
Updated on

Chelsea and Chloe स्टेनवे पियानिस्ट असलेल्या चेल्सीचे वर्णन रेडीफने ‘फीयर्सड अँड फोकस्ड’ तर द हिंदूंने ‘अ‍ॅन अलुरिंग स्टेज प्रेझेन्स’ असे केले आहे. सोलो तसेच चेंबर संगीतकार म्हणून युएसए, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, आणि भारतातील संगीत मैफलींमधून तिने सादरीकरण केले आहे. एनबीसी टीव्ही आणि कॅन्सास रेडिओवरून तिचे थेट (लाईव्ह) कार्यक्रम सादर झाले आहेत.

‘नथिंग बट ट्रबल’ या ओबर्लिनच्या सर्वात जास्त काळ चाललेल्या अ कपेला ग्रुपची ती सहसंचालिका तसेच गायिका होती.

अनेक पश्चिमात्य संगीत शैलींशी जुळली गेलेली चेल्सी आता तिच्या कामातून आपली संस्कृती, ओळख आणि आपली मुळे याच्याशी सांगड घालण्याचा प्रयत्न करते आहे.’

सध्या ती ह्युस्टन मधील राईस विद्यापीठाच्या शेफर्ड स्कूल ऑफ म्युझिक मध्ये ‘भारतीय स्थलांतरितांचे संकरीत संगीत’ आणि ‘संगीत सिद्धांत’ शिकवत आहे.

Chelsea and Chloe
South Goa News: दक्षिण गोव्यातील जलसंवर्धनासाठी प्रयत्नशील - सुभाष शिरोडकर

क्लोई डिसौजा हिने पियानो वादनात सोलो तसेच चेंबर संगीतकार म्हणून नाव मिळवले आहे. तीव्र भावनिक अभिव्यक्तीसाठी आणि पियानोबरोबर गाण्याच्या तिच्या क्षमतेबद्दल तिचे कौतुक सारीकडे झाले आहे.

अखिल भारतीय पियानो वादन स्पर्धेची दोन वेळा विजेती ठरलेल्या क्लोईचे भारत तसेच फ्रान्स आणि यूएसएमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम झालेले आहे. एक कुशल चेंबर संगीतकार असलेल्या क्लोईने अनेक मैफिलीत आपला आवाज तसेच पियानो वादनातून साथ दिलेली आहे.

आपल्या डॉक्टरेटच्या अभ्यासासाठी ती पीबॉडी इन्स्टिट्यूट ऑफ जॉन हॉपकिन्समध्ये गायकांना तसेच चेंबर समूहाला प्रशिक्षण देत असते.

Chelsea and Chloe
Car Accident On Atal Setu: अटल सेतुवर कारचा अपघात; एक जखमी

2020 मध्ये क्लोईची निवड पी कप्पा लंबाडा येथील अमेरिकन ऑनर सोसायटीच्या सदस्यपदी झाली होती. पियानो आणि गायनामध्ये तिने ओर्बेलिन कंजर्वेटरीची पदवी प्राप्त केली आहे तर इस्टमन स्कूल ऑफ म्युझिकमधून तिने पियानो वादनात मास्टर्स मिळवली आहे.

चेल्सी आणि क्लोई यांचे पियानोवादन पर्वरी येथे, त्यांच्या कर्मा या निवासस्थानी आज 3 जून आणि उद्या रविवारी 4 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता सादर होणार आहे. भारतातील अनेक शहरांत सादर होणाऱ्या त्यांच्या मैफिल मालिकांची ही सुरुवात आहे.

पहिल्या दिवशी क्लोई 100 वर्षांपूर्वी चॉप्किन आणि प्रॉकोफिएव्ह यांनी निर्माण केलेले सोनाटा सादर करेल. दुसऱ्या दिवशी चॅल्सीची पियानोवादन आणि व्याख्यान ‘पूर्व आणि पश्चिम यांच्यातील देवाण-घेवाण’ यासंबंधी असेल.

डेब्यूसीच्या ‘ऑब्सेशन विथ जावानीज गेमलान्स’ने तिच्या मैफलीची सुरुवात होईल तर रिमा इस्माईल यांची ‘रंग दे बसंत’ ही इंडो-वेस्टर्न रचना कार्यक्रमाच्या समाप्तीवेळी ती सादर करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com