South Goa News: दक्षिण गोव्यातील जलसंवर्धनासाठी प्रयत्नशील - सुभाष शिरोडकर

पुढील 25 ते 30 वर्षांपर्यंत गोवा पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठीही आपले प्रयत्न चालू
Subhash Shirodkar
Subhash ShirodkarGomantak Digital Team
Published on
Updated on

सासष्टी व मुरगाव हे दाटीवाटीने लोकवस्ती असलेले तालुके. शिवाय या तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये नियमित पाणीपुरवठ्याची गरज आहे व त्यादृष्टीने तयारी असणे महत्त्वाचे आहे. भविष्यात या दोन्ही तालुक्यांमध्ये पाण्याचा तुटवडा होऊ नये म्हणून आपण प्रयत्नशील आहे, असे जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी शुक्रवारी (ता.२) दवर्ली येथील जलाशयाची पाहणी केल्यावर पत्रकारांना सांगितले.

मे महिन्यात जास्तीत जास्त पाणीपुरवठ्याची गरज भासते. त्यामुळे पाण्याची किती गरज आहे, पाण्याचा तुटवडा किती प्रमाणात आहे व पुढील 5, 10, 20 वर्षांत पाणी साठवून ठेवण्यासाठी काय उपाययोजना आखली पाहिजे यासंदर्भात विचारविनिमय करण्याच्या दृष्टिने दक्षिण गोव्यातील जलाशयांना भेटी देणे हा त्याचाच एक भाग आहे. केपे येथील कुशावती नदीत भरपूर पाणी आहे. या पाण्याचा पिण्यासाठी व सिंचनासाठी कसा उपयोग करता येईल याचा अभ्यासही या भेटीदरम्यान करण्यात येईल, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

Subhash Shirodkar
Goa Beach Shacks: किनारपट्टी भागातील तीस टक्के शॅक्स दिल्लीवाल्यांकडे- खंवटे

पुढील २५ ते ३० वर्षांपर्यंत गोवा पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठीही आपले प्रयत्न चालू आहेत. गोव्यातील सर्व जलाशयांची त्यादृष्टीने सुधारणा केली जाईल. दवर्ली जलाशयानंतर आपण दिकरपाल, सारझोरा येथील पाण्याच्या टाक्यांची पाहणी करणार आहे. तसेच पुढे कुशावती नदी, मिराबाग व साळावली धरणांना भेटी देणार आहे.

सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com