Bhandari Community : भंडारी कोण आहे?

भंडारी कोकणातील एक मोठा व प्राचीन समुदाय आहे.
Goa Bhandari Community
Goa Bhandari Community Dainik Gomantak
Published on
Updated on

तेनसिंग रोद्गीगिश

भंडारी कोकणातील एक मोठा व प्राचीन समुदाय आहे. परंतु त्या समाजाच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीबद्दल उपलब्ध माहितीप्रमाणे हा एक दुर्मीळ समाजदेखील आहे. . समाजाबद्दलच्या गैरसमजांचा मोठा भाग कदाचित त्याच्या नावावरून निर्माण झाला असावा; ‘भंडारी’ याचा अर्थ सामान्यतः खजिनदार किंवा खजिन्याचा रक्षणकर्ता किंवा भांडार सांभाळणारा असा होतो. हेच जेव्हा व्यक्तीचे आडनाव म्हणून येते तेव्हा व समाजाचे नामाभिधान म्हणून पाहिले जाते तेव्हा त्यांचे संदर्भ बदलतात. कधीकधी पूर्णपणे वेगळेच असतात.

Goa Bhandari Community
Family System: कुटुंब व्यवस्थेचे, मूल्यांचे रक्षण व्हावे

भंडारी समाजाच्या लढवय्ये असण्यालाही खूप महत्त्व दिले गेले आहे. याचमुळे कदाचित ते केरळचे एझावा, कर्नाटकचे बिल्लवा आणि तामिळनाडूचे नादार यांच्याशी जोडले गेले असावेत; हे बरोबर असू शकते किंवा कदाचित चुकीचेही असू शकते.

भंडारी हे आडनाव नेपाळमध्येही आढळते आणि पंजाबी खत्रींमध्ये या नावाचे एक घराणे आहे. परंतु, त्यांचा कोकणातील समाजाशी संबंध नसावा. त्या दृष्टीने, भंडारी हे आडनाव सारस्वत ब्राह्मणांमध्येही आढळते. त्यामुळे ‘भंडारी कोण आहेत‘ या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला व्युत्पत्ती आणि वरवर दिसणाऱ्या समान धाग्यांच्या पलीकडे जाऊन शोध घ्यावा लागेल.

थर्स्टन यांनी त्यांच्या दक्षिण भारतातील जाती आणि जमातींच्या खंड ३ मध्ये केलसी (न्हावी) या शीर्षकाखाली भंडारींचे वर्णन केले आहे. याच पुस्तकाच्या पहिल्या खंडात भंडारी ही नोंद आहे, पण त्याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिलेली नाही. ते असे सूचित करतात की दोन केलसी व भंडारी या संज्ञा एकाच समुदायाशी जोडल्या गेल्या आहेत. (संदर्भ : थर्स्टन, १९०९ : कास्ट्स अँड ट्राइब्स ऑफ सदर्न इंडिया, खंड १, २२३) परंतु, तुळू प्रदेश वगळता इतरत्र भंडारी हा शब्द सध्या केळसी या शब्दापेक्षा जास्त वापरला जातो.

थर्स्टनने नंतरची ओळख दक्षिण कॅनरामधील नाईची जात म्हणून केली. हे मुख्यत्वे तुळू भाषेतील शब्दाच्या वापरावर आधारित आहे; तुळू न्हाव्यांना केलसी किंवा ‘कुचिदाये - केस कापणारा माणूस’ किंवा भंडारी, असे म्हणतात. गोव्यात, कोकणीत ‘म्हालो’ म्हणतात. उत्तर हिंदुस्थानीत ‘हजाम’, लिंगायत हडपवाड(पैसे, बटवा असणारा माणूस), मापिल्लूर मोपला ‘वास’, मल्याळी ‘विल्कुरुप्पू’ किंवा ‘विल्कोल्लाकुरुप्पू’ - यांना भंडारी असे संबोधले जात नव्हते.

(संदर्भ : थर्स्टन, १९०९ : कास्ट्स अँड ट्राइब्स ऑफ सदर्न इंडिया, खंड ३, २६८) रसेलने भंडारींचाही उल्लेख केला नाही आणि केलसींचाही उल्लेख केलेला नाही.

(संदर्भ : रसेल, १९१६ : द ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ सेंट्रल प्रोव्हिएन्सीस ऑफ इंडिया) यावरून आपण निश्चितपणे असा निष्कर्ष काढू शकत नाही की हा समुदाय मध्य प्रांतांमध्ये (ईशान्य मराठी प्रदेश आणि उत्तर-पश्चिम तेलगू प्रदेश) आढळला नाही, असे दिसते. शक्यता हा समुदाय महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीच्या पट्ट्यापर्यंत मर्यादित आहे, असे दिसते - परशुराम क्षेत्रात तुम्हाला असे म्हणणे आवडेल.

अय्यर यांनीदेखील त्यांच्या यादीत भंडारींचा समावेश केलेला नाही, जरी त्यांनी बिल्लव आणि तुलु ब्राह्मण सारख्या कर्नाटक किनारपट्टीवरील काही इतर समुदायांचा समावेश केला आहे. (संदर्भ : अय्यर, १९३५ : द म्हैसूर ट्राइब्स अँड कास्ट्स) रिस्ले यांनी त्यांच्या बंगालच्या जमाती आणि जातींच्या खंड १ मध्ये भंडारीबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. (संदर्भ : रिस्ले, १८९१ : ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ बंगाल, ९२) रिसले ओरिसाच्या न्हावी समुदायाबद्दल बोलत आहेत. रिस्ले यांनी केलेल्या या समुदायाच्या वर्णनातून जे समोर येते ते न्हावी व भंडारी म्हणून. याचे श्रेय ’हिंदू जमीनधारकाच्या घरातील न्हाव्याच्या विश्वासाचे आणि प्रभावाचे स्थान’ याला रिस्ले देतात.

Goa Bhandari Community
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाची रचना कशी होती माहितीये का?

थर्स्टनने त्याचा उल्लेख केला नसला तरी कोकणातही न्हाव्यांना त्यांनी दिलेल्या सेवेमुळे काही प्रमाणात आदर दिला जातो. ब्राह्मण, खजिन्याचे रक्षक म्हणून त्यांची भूमिका आदरणीय आहेच, पण त्यांच्यातील युद्धकलेमुळे त्यांच्याप्रति समाजात अधिक आदराची भावना आहे.

पण थर्स्टन आणि रिस्ले हे दोघेही विशिष्ट भौगोलिक सीमांमधील समुदायांबद्दल बोलत आहेत असे दिसते. त्यामुळे देशभरातील भंडारी समाज जिथे जिथे आढळेल तिथे त्यांच्या विधानांचे सामान्यीकरण करणे चुकीचे ठरेल. कारण ही वर्णने गोव्यातील भंडारी समाजाला लागू पडत नाहीत.

भंडारी समाजाला समजून घेण्यात सर्वांत मोठा अडथळा म्हणजे भारतातील कोणत्याही समुदायाचे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या चौकटीत काम करणे हा आहे.

कारण ते पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. काणे यांनी अगदी स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे: ऋग्वेदाच्या अगदी सुरुवातीपासूनच वर्ण हा शब्द काळसर किंवा गोरा रंग असलेल्या लोकांच्या ‘समूहाशी’ संबंधित आहे. (संदर्भ : काणे, १९४१ : हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, खंड २, भाग १, २५) आणि पुन्हा: प्रारंभिक काळात फक्त दोनच वर्ण होते, आर्य आणि त्यांचे विरोधक दास्यू किंवा दास. या दोघांमधील फरक रंग आणि संस्कृतीच्या फरकावर आधारित होता.

त्यामुळे वांशिक आणि सांस्कृतिक भाग कमी होता. (संदर्भ : काणे, १९४१ : हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, खंड २, भाग १, ४८) आर्य स्वतःला ब्राह्मण म्हणत. त्यांचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे अग्नी आणि सोम विधी. त्यांच्या लगतच्या प्रदेशात राहणारे त्यांच्याहून वेगळे लोक क्षत्रिय होते. याला पुष्टी देणारे अनेक परिच्छेद वैदिक ग्रंथांमध्ये सापडतात. जसजसे ते पुढे गेले, तसतशा चातुर्वर्णात नवीन श्रेणी जोडल्या गेल्या; ज्याला व्यावसायिक भिन्नतेचा आधार देणे चुकीचे आहे.

Goa Bhandari Community
Anandacha Chowk : ...म्हणून, पोर्तुगीज वसाहतीच्या काळात या भागाला 'आनंदाचा चौक' असे नाव देण्यात आले

काणे यांनी बरोबर नमूद केल्याप्रमाणे, वर्ण भेद हा व्यावसायिक नसून भौगोलिक, वांशिक आणि सांस्कृतिक आहे. मग, प्रश्न असा आहे की, भंडारींचे मूळ स्थान कोणते आहे? आणि त्यांची वांशिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये कोणती होती? त्यांचे व्यवसाय भिन्न असू शकतात, कारण ते परिस्थितीजन्य आहेत - वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी, परिस्थितीनुसार, त्यांनी योग्य व्यवसाय स्वीकारला असण्याची शक्यता आहे.

व्यवसायांची ही परिस्थितीनुरूप केलेली निवड क्षत्रिय समाजात स्पष्ट दिसून येते. क्षत्रिय हे भटके पशुपालक होते जे शेवटी शेती व्यवसायात स्थिरझाले. संख्येने लहान असल्याने आर्यांनी नवीन भूमी शोधण्यासाठी त्यांनी या पशुपालकांशी संबंध जोडले. या पशुपालकांना आर्यांनी ‘संरक्षक’ म्हणून जवळ केले आणि त्यांना ‘क्षत्रिय’ असे नाव दिले.

त्यांची दणकट शरीरयष्टी आणि श्वापदांपासून संरक्षण करण्याचा अनुभव यामुळे ही उत्कृष्ट निवड ठरली. अशाप्रकारे त्यांचात युद्धकुशल असण्याचा गुण आला. समुदायाने मौर्य ते मराठ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात राजे निर्माण केले. पण समाजाचा मोठा भाग मेंढपाळ आणि शेतकरी राहिला. या वास्तववादी संदर्भात आपण ‘भंडारी कोण आहेत?’ या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com