Anandacha Chowk : ...म्हणून, पोर्तुगीज वसाहतीच्या काळात या भागाला 'आनंदाचा चौक' असे नाव देण्यात आले

सांस्कृतिक उत्सव, जत्रा आणि सार्वजनिक आनंद साजरा करण्याचे ठिकाण होते
Anandacha Chowk
Anandacha ChowkDainik Gomantak
Published on
Updated on

वाल्मिकी फालेरो

लेखमालेतील गेल्या भागापर्यंत आपण २५ कपेलांचा आढावा घेतला होता, या लेखात उर्वरित कपेलांची माहिती पाहू.

२६. सेंट तेरेसा ऑफ चाइल्ड जीझस : डिस्केल्ड कार्मेलाइट्सच्या कॉन्व्हेंट मॉनेस्टरीत स्थित. कदाचित ही ख्रिस्त पंथातील सर्वांत जुनी व्यवस्था असावी. हे कपेल १९३९मध्ये मोडसाई येथे तात्पुरते स्थापित केले गेले. कार्मेलाइट गोव्यात १६१२ (किंवा १६१९, १६३०?) मध्ये आले होते. पोर्तुगालच्या राजाशी निष्ठेची शपथ घेण्यास नकार दिल्याने त्यांना १७०७मध्ये काढून टाकण्यात आले आणि त्यांची संपत्ती सेंट फिलिप नेरीच्या याजक मंडळींकडे सुपूर्द करण्यात आली, ज्यांना ‘ओरेटोरिअन’ म्हणून ओळखले जाते.

Anandacha Chowk
History Of Goa: तिमय्या राष्ट्रद्रोही कसा?

कार्मेलाइट्सने केरळमध्ये तळ हलवला. त्यांना १९ डिसेंबर १९२८ रोजी गोव्यात परत बोलावण्यात आले आणि ते त्यांच्या अगोदर, लॉरेन्स ऑफ सेक्रेड हार्ट ऑफ जीझस यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात परतले. त्यांनी १९ मार्च १९३९ रोजी डॉ. विसेंट ग्रेशियस यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या जागेत पहिले घर बांधून राहिले. डॉ. इनासिओ मॅन्युएल मिरांडा यांनी मालभाट येथील त्यांची मालमत्ता भेट म्हणून दिली, जिथे कार्मेलाइट मॉनेस्टरी (१९४३साली बांधली गेली) आणि चर्च (१९६७साली बांधले गेले) आता उभे आहे.

आधुनिक संकल्पनेनुसार बांधण्यात आलेले मडगाव येथील ते पहिले चर्च होते. मडगावच्या कोस्ता आणि आल्मेदा (वास्तुविशारद) आणि केनी आणि डिसोझा (अभियंता) या जुळ्या वास्तुविशारद-अभियंता जोडगोळीने त्याची रचना केली होती. कार्मेलाइट कॉम्प्लेक्स आता ग्रेस चर्चच्या अखत्यारीत येते.

२७. सेंट सेबॅस्टियन : लोअर कोंब येथे स्थित, आता ग्रेस चर्चशी संलग्न आहे.

२८. सेंट फ्रान्सिस सेल्स ऍट नॉव्हिशिएट ऑफ द रिलिजिअस ऑर्डर.

२९. सेंट जॉन ऑफ गॉड ऑफ द फ्रान्सिस्कन हॉस्पिटलर सिस्टर्स ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन: आबादे फारिया रोड येथील कॉन्व्हेंट हाऊसमध्ये स्थित.

३०. होली फॅमिली, गृहनिर्माण मंडळ, घोगळ येथे स्थित.

३१. अवर लेडी ऑफ माउंट कार्मेल : बोर्डा येथील कार्मेल सेवा मंदिर (अपोस्टोलिक कार्मेल मंडळी) येथे स्थित.

३२. सेल्सियन चर्च : मरड, फातोर्डा येथील त्यांच्या डॉन बॉस्को टेक्निकल कॉम्प्लेक्समध्ये स्थित.

३३. लोअर बोर्डा येथील सोसायटी ऑफ मिशनरीज ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर किंवा सोसायटी ऑफ पिलरच्या गोवा प्रांत कार्यालयातील कपेल (२००५).

डीनरी

सुरुवातीपासून मडगावमध्ये दक्षिण गोव्यातील एकमेव डीनरी होती. त्यात ३७ परगण्यांचा समावेश होता: मडगाव, वेर्णा, लोटली, कुठ्ठाळी, साकवाळ, चिखली, सेंट जॅसिंटो, वाडें, वेल्काओ, कासावली, बेताळभाटी, माजोर्डा, सेरावली, नावेली, बाणावली, कोलवा, कार्मोणा, ओरली, वार्का, वेळ्ळी, असोळणा, कुंकळ्ळी, पारोडा, चिंचिणी, सेंट जुझे दी आरियाल, चांदोर, मकाझाना, कुडतरी, राशोल, राय, शिरोडा, तिळामळ, केपे, सांगे, काणकोण, गालजीबाग आणि अंजदिव.

सासष्टीबाहेरील परगणे नंतर विलग करण्यात आले आणि त्यांच्याशी संबंधित तालुक्यांमध्ये नवीन डीनरीजसह एकत्र केले गेले. १८९३मध्ये मडगाव डीनरीमध्ये मुरगावातील ३० परगणे होते. तेथे ८० कपेल, २६ पॅरोकियल शाळा आणि १,१५,८४० कॅथलिक लोकसंख्या होती. (आज, एकट्या मडगावची लोकसंख्या त्या आकड्याच्या जवळपास दुप्पट आहे.) ११ मे १८९७च्या चर्चच्या आदेशानुसार, मडगाव डीनरी तीन भागांत विभागली गेली: मडगाव, चिंचिणी आणि वेर्णा. नंतरच्या दोघांना ‘विकारीएट्स’ असे म्हणतात.

गोव्यातील सर्वात मोठा परगणा

कुडतरी आणि चिंचिणी हे पारंपरिकपणे संपूर्ण गोव्यात नसले तरी सासष्टीतील सर्वांत मोठे परगणे होते. परंतु, १९८०च्या दशकापासून, विशेषत: दक्षिण सासष्टीतील खेड्यांमधून झालेल्या स्थलांतरामुळे, नावेलीची लोकसंख्या वाढू लागली. मडगावच्या या पूर्वीच्या प्रभागाने २०व्या शतकाच्या उत्तरार्धात सर्वांत मोठ्या परगण्याचा दर्जा प्राप्त केला.

होली स्पिरिट पॅरिश चर्चच्या ४५० वर्षांच्या स्मरणार्थ विशेष स्मरणार्थ पोस्टल कव्हरचे प्रकाशन करताना, पॅरिश प्रिस्ट, रेव्ह. अविनाश रेबेलो यांनी घोषित केले की होली स्पिरिट ही आता संपूर्ण गोवा आणि दमणमधील सर्वात मोठी पॅरिश चर्च आहे, ज्यामध्ये अंदाजे १५,००० कॅथलिक आणि ३,५०० कुटुंबे आहेत.

चर्च परिसराचे नूतनीकरण

पॅरिश याजक फादर व्हेन्च्युरा लॉरेन्स(२००४-११) यांनी २००५च्या उत्तरार्धात चर्चच्या परिसराचे शेवटचे नूतनीकरण सुरू केले. त्यांनी डॉ. फिलिप नेरी कोरीया, अभियंता पास्कोल नोरोन्हा, ऍडेलिनो फर्नांडिस, मिंगेल मिरांडा, लिओ डी’मेलो, फर्नांडा ग्रासियास, रॅचेल फालेरो, ऑरेलिया मिरांडा ई अल्वारिस, इरेन फर्नांडिस आणि कायतान बारबोझा यांचा समावेश असलेल्या समितीचे नेतृत्व केले. कामांपैकी, वेद्या आणि व्यासपीठ पुन्हा सोन्याने मढवले गेले आणि चर्चच्या भिंती पुन्हा रंगवण्यात आल्या. हे काम पूर्णपणे योगदानातून व लोकसहभागातून झाले.

Anandacha Chowk
Religious Controversy : तिरस्काराची मंदिरे उभारून आपण शांतता निर्माण करू शकू का?

लार्गो दा इग्रेजा (चर्च स्क्वेअर)

हे क्षेत्र प्राचीन मठग्रामचे केंद्रस्थान होते. गावातील बहुधा जुने मंदिर येथेच होते. जेव्हा इंडो-आर्य लोक प्रथम सासष्टीच्या गावांमध्ये स्थायिक झाले, तेव्हा कुलदेवतेची मूर्ती स्थापित केली गेली आणि पूजाअर्चा सुरू झाली. जेव्हा कुळांची लोकसंख्या वाढली तेव्हा मूर्ती वस्तीच्या परिसरात मध्यवर्ती ठिकाणी बांधलेल्या मंदिरात हलविण्यात आली. विस्तारणाऱ्या कुटुंबांनी मंदिराभोवती आपली नवीन घरे बांधली. अशा प्रकारे मंदिर हे स्थान सामुदायिक जीवनाच्या दृष्टिकोनातून एक मध्यवर्ती ठिकाण बनले. मंदिराच्या अवतीभवती मग नवीन घरांचे बांधकाम, ग्रामरचना उभारली गेली.

लक्ष्मी-नारायण मंदिर, प्रारंभी मठग्राम येथे इंडो-आर्यन राहत असलेल्या क्षेत्राच्या मध्यभागी होते. त्याच्या पश्चिमेला मंदिराची जलव्यवस्था होती, त्यानंतर गावच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेला मांड होता. सध्याच्या चर्चच्या मैदानाच्या पश्चिमेला तो वसलेला होता. मांड हा एक मंच, सामान्यतः मातीचा उंच भराव घालून तयार केलेला. त्याचे पावित्र्य सदैव जपले जात असे - त्यावर पादत्राणे घालून जाण्याची परवानगी नव्हती. हे सर्व सांस्कृतिक उत्सव, जत्रा आणि सार्वजनिक आनंद साजरा करण्याचे ठिकाण होते. बहुधा याच कारणास्तव पोर्तुगीज वसाहतीच्या काळात या भागाला प्रासा दे अलेग्रिया (प्लाझा किंवा आनंदाचा चौक) असे नाव देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com