Goa Covid-19 : जुलै महिना गोवेकरांना दिलासा देणारा ठरला

जुलै महिन्याच्या पहिल्या 13 दिवसात 56,320 कोरोना (Covid-19) चाचण्या करण्यात आल्या.
Goa Covid-19 update
Goa Covid-19 updateDainik Gomantak

पणजी: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवलेल्या हाहाकारातून गोवा बराच सावरला असून कोरोना नियंत्रणात येत असल्याने गोवेकरांच्या व सरकारच्याही मनावरील दडपण काही प्रमाणत कमी झाले आहे. जुलै महिना गोवेकरांना दिलासा देणारा ठरला आहे. (Corona is coming under control in Goa in July)

जुलै महिन्याच्या पहिल्या 13 दिवसात 56,320 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. 2794 कोरोना रुग्ण बरे झाले, तर 2299 नवे कोरोना रुग्ण सापडले. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही नियंत्रणात असून या 13 दिवसांत 47 जणांचा मृत्यू झाला, तर काल एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Goa Covid-19 update
Goa Covid19: आठ महिन्यांनंतर दिलासा, राज्यात एकही मृत्यू नाही

दरम्यान, आज दिवसभरात 4,282 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जाहीर अहवालानुसार 164 नवे कोरोनाबाधित सापडले, तर 198 कोरोनाबाधित बरे झाले. आज ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात मृतांची संख्या 3,101 झाली आहे. आजच्या दिवशी सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 1,732 आहे. बरे होण्याची टक्केवारी 97.14 टक्के असून पॉजिटिव्हीटी दर 3.4 टक्के आहे.

राज्यातील डॉक्टर, परिचारिका, अधिकारी वर्ग व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न व लोकांनी दिलेले सहकार्य यामुळे काल राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या शून्यावर आली. आपणास समाधान वाटले. कोरोना नियंत्रणासाठी सरकार प्रयत्न करत आहेच, लोकांनी नियम पाळून सहकार्य करावे. स्वतःची काळजी घ्यावी.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com