Goa Covid19: आठ महिन्यांनंतर दिलासा, राज्यात एकही मृत्यू नाही

राज्यात आतापर्यंत 1 लाख 68 हजार 824 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी 1 लाख 63 हजार 457 रुग्ण बरे झाले आहेत
Goa Covid-19 cases
Goa Covid-19 casesDainik Gomantak

पणजी: राज्यासाठी आज अत्यंत दिलासादायक बातमी असून तब्बल आठ महिन्यानंतर गेल्या 24 तासांत एकही कोरोनाचा(Covid19) बळी नाही, तर बरे होण्याचे प्रमाणही सर्वाधिक 97.12 टक्क्यांवर गेले आहे. यापुढेही राज्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील, असे मत गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांनी व्यक्त केले आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोना निगेटिव्ह चाचणीशिवाय गोव्यात प्रवेश देण्यास मंजुरी दिली आहे. (Goa Covid)

राज्य सरकारच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयात कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना राज्यात प्रवेश द्यावा अशी मागणी केली होती. त्याला आज न्यायालयाने सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही लस घेतलेल्या व्यक्तींना कोरोना निगेटिव्ह चाचणीशिवाय गोव्यात प्रवेश मिळेल असे जाहीर केले आहे.

Goa Covid-19 cases
Goa Monsoon Update: पिसुर्लेत घर कोसळले, पावसाचा तडाखा कायम

कोरोनाचा आज एकही मृत्यू नाही ही अभिमानास्पद बाब आहे. यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोलाची मदत होत आहे. लवकरच घरोघरी लसीकरण करण्यासाठी आमचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.असे मत राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केले आहे.

तर गोवा टास्क फोर्स आणि तज्ज्ञ कमिटी सदस्य डॉ. शेखर साळकर म्हणाले की, " राज्यात कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही ही आनंदाची बाब आहे. मात्र, आठवडाभर हीच स्थिती राहिली पाहिजे. याशिवाय पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाणही 100 च्या आत आले पाहिजे."

राज्यात आतापर्यंत 1 लाख 68 हजार 824 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी 1 लाख 63 हजार 457 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात1 हजार 770 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासांत एकही कोरोना रुग्णाचा बळी गेला नसून आत्तापर्यंत 3 हजार 97 रुग्ण कोरोनाने मृत्यू पावले आहेत. आज दिवसभरात 3 हजार 118 कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या केल्या. तसेच 108 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत, तर 23 रुग्णांना घरी पाठविण्यात आले व 19 जणांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहेत. आतापर्यंत 28 हजार 332 जणांना भरती करण्यात आले होते, तर 1 लाख 17 हजार14 नागरिकांनी घरी विलगीकरणाचा मार्ग स्वीकारला होता.

Goa Covid-19 cases
Goa: बस्स...यापुढे कोडार खांडेपार नदीच्या पात्रात दुर्घटना नकोच!

राज्यात ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि अमेरिकेतून आलेल्या तीन पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल 25 मार्च रोजी मिळाला आहे. लगेच त्यांना रुग्णालयात भरती करत उपचार सुरू करण्यात आले. हे गोव्यातील पहिले कोरोना रुग्ण होते. त्यापूर्वीच 23 मार्च 2020 ला राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते.

20 जून रोजी 85 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला. सध्या हा आकडा 3097 झाला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना मृत्यू 11 मे 2021 रोजी75 झाले, तर 13 मे 2021 रोजी सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32 हजार 953 झाले होते. सध्या ती 1770 पर्यंत खाली आली आहे.

राज्यातील 18 वर्षांवरील 11 लाख 50 हजार नागिरकांना येत्या 31 जुलैपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे. राज्यात आत्तापर्यंत10 लाख 97 हजार 009 एवढे लसीकरण झाले असून त्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या9 लाख 21 7हजार 81 झाली आहे, तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 75 हजार 228आहे. आज राज्यात 15,591एवढे लसीकरण झाले. त्यात 9967 जणांनी पहिला डोस, तर 5615 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com