Jazz Music Day: शास्त्रीय-पाश्चिमात्य संगीताची सांगड

रियाज आणि माझ्या वाद्याचा ध्वनी व त्याचा स्वर या गोष्टींशी मी कधीच तडजोड करू शकणार नाही
Jazz Music Day
Jazz Music DayDainik Gomantak

Jazz Music Day माझी पार्श्वभूमी भारतीय शास्त्रीय संगीताची असली तरी फ्युजन संगीताकडे माझी ओळख ताल-गुरू त्रिलोक गुर्टू यांच्याद्वारे झाली. त्यांच्याबरोबर असताना सलीफ कैता, आंजेलिक किद्जो यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांबरोबर वादन करण्याची संधी मला मिळाली.

ऑस्ट्रियन, नॉर्वेजीयन, स्पॅनिश संगीतकारांबरोबर वेगवेगळ्या शैलीत मी कार्यक्रम केले आहेत. भारतात प्रख्यात लुई बँक्स, उस्ताद झाकीर हुसेन, रंजित बारोट, उस्ताद फजल कुरेशी, उस्ताद तौफिक कुरेशी यांच्या समवेत मी काम केले आहे.

त्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे संगीत मी सतत ऐकत असतो. चीक कुरैया, मायल्स डेव्हिस, जॉन मॅक्लोग्लीन आदी..

Jazz Music Day
E-Calendar: आयकॉनिक 11 : फॅशन ई-कॅलेंडर

आज जॅझ दिनाच्या निमित्ताने मी लुई बँक यांच्या समवेत कार्यक्रम करतो आहे. हे संगीत ऐकायला सोपे वाटले तरी त्याचे सादरीकरण कठीण असते.

माझ्या सतार वादनाला जरी शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी असली तरी पंडित रविशंकर, उस्ताद अल्लारखा, उस्ताद झाकीर हुसेन यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला पाश्चिमात्य संगीताबरोबर जोडून माझ्यासारख्यांची वाट सुलभ करून ठेवली आहे.

संगीताचे मूळ 12 स्वर वैश्विक आहेत. संगीतात तुम्ही ते कसे वापरता आणि त्यावेळी कसा विचार करता यावर त्यामधला वेगळेपणा ठरतो.

Jazz Music Day
Master Blaster Sachin Tendulkar: सचिन-भक्त बासील

पाश्चिमात्य संगीतकारांबरोबर कार्यक्रमात सहभागी होणे हे मनोरंजक असले तरी ते आव्हानात्मकही असते. जरी आमचे भारतीय संगीत बहुरंगी नसले तरी तसे वाजवणे आणि त्याचवेळी स्केल बदलण्यास सक्षम असणे ही कौशल्याची आणि रोमांचक गोष्ट असते.

अनुभवी कलाकारांबरोबर मंचावर असल्याने बऱ्याच गोष्टी शिकता येतात. मी स्वतः अनेकांकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. मी सर्व प्रकारचे संगीत ऐकतो. त्यात जॅझ देखील आले, मायल्स डेव्हिस हा माझा आवडता संगीतकार आहे.

संगीतकाराने सातत्याने रियाज करायला हवा. संगीतातल्या प्राथमिक गोष्टी मी पुन्हा पुन्हा तपासून पाहतो. सरगम, पलटे मी नित्य वाजवतो. संगीत ऐकणे देखील महत्त्वाचे आहे.

मी सतत संगीताचा विचार आणि त्या संबंधात चर्चा करत असतो. रियाज आणि माझ्या वाद्याचा ध्वनी व त्याचा स्वर या गोष्टींशी मी कधीच तडजोड करू शकणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com