काम्र मुन्सीपाल द  गोवा
काम्र मुन्सीपाल द गोवाDainik Gomantak

‘काम्र मुन्सीपाल द गोवा’ चा भाग 67 वर्षांपूर्वी कोसळला!

67 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ‘काम्र मुन्सीपाल द गोवा’ या पणजी नगरपालिकेच्या कार्यालयाचा एक भाग कोसळला.
Published on

पणजी: जगात अनेक घटना घडत असतात, त्यातील काही कायम आठवणीत राहतात, तर काही विस्मृतीत जातात. अनेकवेळा तो दिवस उजाडला, की त्या दिवशी घडलेली घटना डोळ्यासमोर येते. जुन्या आठवणी दाटून येतात. अशीच एक घटना पणजीत घडलेली, तीही 67 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे 13 जुलै 1954 रोजी ‘काम्र मुन्सीपाल द गोवा’ या पणजी नगरपालिकेचे कार्यालयाचा एक भाग कोसळला. मुक्तीपूर्वी घडलेल्या या घटनेचे साक्षीदार असलेले पणजीतील ज्येष्ठ नागरिक मिलिंद आंगले यांनी दै. ‘गोमन्तक’च्या कार्यालयात येऊन या घटनेला उजाळा दिला. (67 years ago today a part of Panaji Municipal Office was collapsed)

काम्र मुन्सीपाल द  गोवा
Goa: सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवस शक्‍य

तो दिवस होता 13 जुलै 1954. पणजी शहरात घडलेली ही दुर्घटना. त्याकाळी अग्निशामक दल किंवा इतर अत्याधुनिक यंत्रणा नव्हत्या. सकाळी 10.30 वाजता चर्च परिसरात काहीतरी कोसळल्याचा आवाज सर्वत्र घुमला. एकच आरडाओरड सुरू झाली. त्याकाळी वाहनांची वर्दळ जास्त नव्हती, त्यामुळे पणजी शहर शांत होते. या शांततेचा भंग त्या दुर्घटनेने केला. काम्र मुन्सीपाल द गोवा या पणजीत नगरपालिकेचे कार्यालय असलेल्या इमारतीचा एक भाग कोसळला होता. त्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सापडून तिघांचा मृत्यू झाला. एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. गोन्झाक कालदेर व मिंगेल आल्मेदा हे सदर कार्यालयात काम करणारे व एक निवृत्त नागरिक रॉड्रिग्ज यांचे या दुर्घटनेत निधन झाले. जासिंतो मिरांडा हे गंभीर जखमी झाले होते.

काम्र मुन्सीपाल द  गोवा
Goa: ‘स्मार्टनेस’ हरवून बसलीय पणजी!

इमारतीचा जो भाग कोसळला होता, तिथे मुख्य अभियंत्याची कचेरी होती. मुख्य अभियंते व त्यांचे दोन सहकारी दुर्घटनेपूर्वी बाहेर गेल्याने बचावले. पोलिस व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी त्वरित तेथे आले. त्यांनी जखमी मिरांडा यांना इस्पितळात हलवले. हे वृत्त पोर्तुगीज गव्हर्नरना कळताच, ते धावत आले व मदतकार्याला मार्गदर्शन केले. दोन वर्षांनंतर सदर इमारत नव्याने बांधण्यासाठी जमीनदोस्त केली गेली. सदर इमारत सध्याच्या गार्सिया द आर्त या महापालिकेच्या गार्डन व कामत हॉटेल यांच्यामध्ये जी मोकळी जागा आहे, तेथे होती. मिलिंद आंगले हे पिपल्स हायस्कूल, मळा येथे शिकत होते. ते चर्च परिसरात पोचले असता सदर घटना त्यांच्या दृष्टीला पडली. आज 67 वर्षांनंतरही आजचा दिवस आला की ती दुर्घटना आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, असे आंगले यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com