गणेशोत्सव
गणेशोत्सवDainik Gomantak

Goa: सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवस शक्‍य

यंदाही गणेशोत्‍सवावर ‘कोविड’चे सावट!
Published on

आगोंद : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाही काणकोण तालुक्यात गणेश चतुर्थी मर्यादित स्वरूपात साजरी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक स्वरूपातील उत्सवावर विशेष परिणाम जाणवणार नसला, तरी सार्वजनिक गणेशोत्सव यंदासुद्धा दीड दिवसात आटोपता घेण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. (Ganeshotsav Mandals in Goa have decided to hold a public Ganeshotsav celebration in a day and a half)

काणकोण तालुक्यातील चाररस्ता, चावडी, वडामळ, आगोंद, माटवें, खोला, साळेरी गावडोंगरी आणि खोतीगाव येथील गणेशोत्‍सव मंडळे 9 ते 11 दिवसांचा उत्सव साजरा करीत असत. त्‍यानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल असायची. या उत्सवासाठी दोन महिने अगोदर मंडळाचे कार्यकर्ते तयारी करायचे. निधी गोळा करण्यासाठी देणगी कुपन्सची विक्री करण्यात येत असे, या निधीच्या माध्यमातून कार्यक्रम सादर केले जायचे. मात्र मागच्या वर्षापासून यावर निर्बंध आलेले आहेत, अशी माहिती चार रस्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष अजय भगत यांनी दिली.

गणेशोत्सव
गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली जाहीर; यंदाही...

काणकोण तालुक्यातील सर्वांत जुने मंडळ चावडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असून मंडळाचे अध्यक्ष प्रमोद नाईक गावकर, वडामळ-श्रीस्थळ मंडळाचे अध्यक्ष जैयेंद्र तुबकी, माटवेंमळ- खोला मंडळाचे अध्यक्ष कृष्णा वेळीप, साळेरी मंडळाचे अध्यक्ष सुनील पागी, आगोंद मंडळाचे किरण नाईक गावकर, गावडोंगरी मंडळाचे आनंद तहसीलदार, राजबाग मंडळाचे रत्नाकर धुरी, पाळोळे मंडळाचे दिवाकर पागी होते, तर गाव मंडळाचे कृष्णा देविदास अध्यक्ष आहेत. मागच्या दोन वर्षापासून मंडळ आणि नवीन समित्यांची निवड केलेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पोलिस स्थानकावर अकरा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.

लहान मूर्तीनाच मागणी

काणकोण तालुक्यातील विलास च्यारी, राजेश च्यारी, मनोज चारी, सिद्धार्थ चारी, रघुनाथ चारी, पर्तगाळी येथील श्रद्धा नाईक कुटुंबीय, माशे येथील मनोज प्रभू गावकर, बाळकृष्ण अय्या, खोतीगाव येथील तोळू वेळीप, इडदर येथील च्‍यारी बंधू, पोळे येथील प्रसन्न पागी, खावटा येथील जालंदर वझे, साळेरी येथील धनंजय पागी, प्रशांत पागी हे प्रमुख मूर्तिकार असून सार्वजनिक गणेशमूर्ती लहान करण्‍यास सांगितल्‍यामुळे त्‍यांचाही व्‍यवसाय संकटात आहे. बहुतांश लोकांनी घरातील मूर्तीही लहान सांगितली आहे.

आर्थिक साहाय्‍य अदा करावे

कोरोना महामारीमुळे यंदा मोठ्या प्रमाणात सर्वच गोष्टीवर निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे मूर्तिकारांना सरकारने आर्थिक सहकार्य करण्याची मागणी मूर्तीकारांकडून करण्यात येत आहे. गेल्यावर्षी चतुर्थीपूर्वी योग्यवेळी सरकारकडून देण्यात येणारे मानधन अदा केलेच नाही. ते देण्‍यात यावे, अशी मागणी मूर्तिकार सिद्धार्थ च्‍यारी यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com