
तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. लवकरच 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या 3 नवीन शानदार कार लॉन्च होणार आहेत. यामध्ये एक छोटी एसयूव्ही, एक हायब्रिड आणि एक प्रीमियम हॅचबॅक कार समाविष्ट आहे. भारतीय कार मार्केट वेगाने बदलत आहे. आता मार्केटमध्ये कारची सरासरी किंमत 10 ते 12 लाखांपर्यंत वाढली आहे. अशा परिस्थितीत, 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या या गाड्या तुमच्या गरजेनुसार तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हिट ठरु शकतात.
दरम्यान, तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगली एसयूव्ही हवी असेल, तर तुम्ही हुंडई व्हेन्यूच्या नेक्स्ट जनरेशनची वाट पाहू शकता. लकवरच ह्युंदाई व्हेन्यूचे एन-लाइन व्हर्जन अपडेटेड स्वरुपात मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकते. या नवीन मॉडेलमध्ये, केवळ एक्सटीरियर डिझाइनमध्ये बदल होणार नाही, तर तुम्हाला 16-इंच अलॉय व्हील्स, नवीन हेडलॅम्प, फ्रंट पार्किंग सेन्सर, ADAS सेफ्टी देखील मिळू शकतात. तथापि, कारमध्ये तुम्हाला पूर्वीप्रमाणेच 1 लिटर टर्बो पेट्रोल, 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल (Diesel) इंजिन ऑप्शन मिळू शकेल.
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये हायब्रिड कार हवी असेल तर तुम्ही मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हायब्रिडची प्रतिक्षा करु शकता. ही मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही कारपैकी एक आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्स सध्या 1.2-लिटर इंजिनसह येते, जे स्विफ्ट आणि डिझायरमधील इंजिनसारखेच आहे. कंपनी पहिल्यांदाच स्वतःहून हायब्रिड कार विकसित करणार असून मारुती फ्रॉन्क्स ती ही कार असू शकते. या शानदार कारची किंमत 10 लाखांपेक्षा कमी किंवा जवळपास असू शकते.
तसेच, 10 लाखांपेक्षा कमी किमतीची आणखी एक कार (Car) जी बहुप्रतिक्षित आहे ती म्हणजे प्रीमियम हॅचबॅक कार टाटा अल्ट्रोजची फेसलिफ्ट व्हर्जन. या कारमध्ये ग्रिलपासून ते हेडलॅम्प आणि बंपरपर्यंत बदल होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धासू कार 21 मे रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. ती पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.