
Nissan India Plans New SUV and MPV Launch for 2025-26 to Challenge Maruti and Hyundai
भारतीय कार मार्केटवर आपली पकड मजबूत करण्यासाठी निसान इंडियाने मोठी तयारी केली आहे. कंपनीने पुढील आर्थिक वर्ष 2025-26 साठीच्या आपल्या प्लानिंगचा खुलासा केला आहे. यावेळी कंपनी दोन नवीन मॉडेल्स घेऊन येत आहे, जे मारुती सुझुकी आणि ह्युंदाईला टक्कर देतील. निसान इंडिया लवकरच एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि एक कॉम्पॅक्ट एमपीव्ही लॉन्च करणार आहे.
निसानने अलीकडेच जपानमधील (Japan) योकोहामा येथे त्यांचे ग्लोबल प्रोडक्ट प्रदर्शित केले होते. दरम्यान, लॉन्च करण्यात दोन्ही मॉडेल्स रेनॉल्टच्या ट्रायबर आणि डस्टरवर आधारित असतील. कंपनीने याचा फोटो टीझर देखील जारी केला आहे. निसानची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाला टक्कर देऊ शकते. सध्या, निसानची केवळ कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइट भारतात कार प्रेमींच्या पसंतीस उतरली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडे जास्त मॉडेल्स नाहीत. अशा परिस्थितीत, 2 नवीन प्रोडक्टची घोषणा करुन कंपनीने भारतीय कार मार्केटसाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
निसानची नवीन एमपीव्ही कॉम्पॅक्ट आकारात येईल. त्यात 7 जण सहज बसू शकतील अशी क्षमता असेल. कारची लांबी 4 मीटरपेक्षा कमी असेल आणि त्यात 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असू शकते. यामध्ये एक बोल्ड लूक पाहायला मिळतो. भारतात (India) ती मारुती सुझुकी एर्टिगाशी स्पर्धा करेल. निसानच्या आगामी एसयूव्हीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील मिळू शकते, ज्यामध्ये 5 जणांची बसण्याची क्षमता असेल. डिझाइनमध्ये डस्टरची झलक पाहायला मिळू शकते.
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी सांगितले की, निसानची प्रोडक्ट कॅटेगरी नवीन 7-सीटर एमपीव्हीपासून सुरु होते. 2025 च्या आर्थिक वर्षात ती भारतात लॉन्च केली जाईल. त्यानंतर आर्थिक वर्ष 26 च्या सुरुवातीला आधीच घोषित केलेली नवीन एसयूव्ही लॉन्च केली जाईल. निसान मोटर इंडिया आर्थिक वर्ष 26 पर्यंत 4 प्रोडक्ट लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.