Renault Upcoming Cars: रेनॉल्ट धूमधडाका करण्याच्या तयारीत! येत्या 3 वर्षात लॉन्च करणार 5 नवीन एसयूव्ही

Renault new SUV models 2025: रेनो कंपनी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील तीन वर्षांत खास तुमच्यासाठी 5 नवीन शानदार कार लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनीला पॅसेंजर व्हिकल सेगमेंटमध्ये 5 टक्के मार्केटमधील हिस्सा प्राप्त करायचा आहे.
Upcoming Cars in India
Upcoming Cars in IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

रेनो कंपनी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील तीन वर्षांत खास तुमच्यासाठी 5 नवीन शानदार कार लॉन्च करण्याची तयारी करत आहे. सर्वप्रथम, कंपनी तुमच्यासाठी दोन नेक्स्ट जेनरेशन एसयूव्ही लॉन्च करेल, त्यानंतर कंपनीच्या नवीन प्लॅटफॉर्मवर बनवलेल्या दोन नवीन एसयूव्ही लॉन्च केल्या जातील. यानंतर कंपनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करेल. कंपनी भारतीय मार्केटवर आपली पकड मजबूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीला पॅसेंजर व्हिकल सेगमेंटमध्ये 5 टक्के मार्केटमधील हिस्सा प्राप्त करायचा आहे.

कंपनी नेक्स्ट जेनरेशन मॉडेल लॉन्च करणार

कंपनीच्या म्हणण्यानुसार, एप्रिल 2025 ते एप्रिल 2027 दरम्यान ग्राहकांसाठी नेक्स्ट जेनरेशन मॉडेल आणि नवीन मॉडेल मार्केटमध्ये आणले जातील. नवीन इलेक्ट्रिक वाहनांव्यतिरिक्त, कंपनी मजबूत हायब्रिड इंजिन असलेल्या मॉडेल्सवर देखील काम करत आहे. 2025 मध्ये, कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये 7 कार लॉन्च केल्या असून गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये 12 नवीन कार (Car) लॉन्च केल्या होत्या.

Upcoming Cars in India
Upcoming Kia Seltos Car: किआ एसयूव्हीचा मायलेज 'गेम चेंजर', क्रेटा आणि विटाराला देणार टक्कर

रेनॉल्ट

दरम्यान, या नवीन धोरणाला 'रेनॉल्ट' असे नाव देण्यात आले आहे. कंपनी एक नवीन ब्रँड आइडेंटिटी निर्माण करण्यावर काम करत आहे, ज्याचा उद्देश कम्युनिकेशन, टचपॉइंट्स आणि मॉडेल्समध्ये सुधारणा करणे आहे. कंपनी $600 दशलक्ष गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.

सर्वात मोठा डिझाईन स्टुडिओ

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचा पहिला डिझाईन स्टुडिओ चेन्नईमध्ये ओपन करण्यात आला आहे. हा फ्रान्सबाहेर कंपनीचा सर्वात मोठा डिझाईन स्टुडिओ आहे. कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाची उत्पादन क्षमता 4.8 लाख युनिट्स आहे, ज्यामध्ये देशांतर्गत आणि निर्यातीचा समावेश आहे.

Upcoming Cars in India
Upcoming Hybrid Cars 2025: मारुती-ह्युंदाई लवकरच लॉन्च करणार 'या' 5 शानदार हायब्रिड कार; इलेक्ट्रिक कार्स जाल विसरुन

रेनॉल्ट क्विडने 10 वर्षे पूर्ण केली

रेनोची ही हॅचबॅक कार प्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे, या कारची किंमत 4 लाख 70 हजार रुपये (एक्स-शोरुम) ते 6 लाख 45 हजार रुपये (एक्स-शोरुम) पर्यंत आहे. या कारमध्ये 1.0 लिटरचे तीन सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन असून ते 5500 आरपीएमवर 68 बीएचपी पॉवर आणि 92.5 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शनमध्येही खरेदी करता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com