
Yamaha Launches India First Hybrid Bike fz s Fi Hybrid
2025 Yamaha FZ S Fi Hybrid Price Features: देशात हायब्रिड कारची लोकप्रियता वाढत असताना आता हायब्रिड बाईक्स देखील मार्केट दाखल झाली आहे. बाईक उत्पादक कंपनी यामाहा इंडियाने देशातील पहिली हायब्रिड बाईक लॉन्च केली. यामध्ये तुम्हाला दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. देशातील पहिली हायब्रिड मोटरसायकल असल्याचा दावा यामाहा कंपनीकडून करण्यात आला आहे.
'FZ-S Fi Hybrid' ही भारतात लॉन्च झालेली पहिली हायब्रिड बाईक आहे. ही 150 सीसी सेगमेंटमधील भारतातील (India) पहिली हायब्रिड मोटरसायकल आहे, ज्यामध्ये हायब्रिड इंजिनसह मायलेज, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीकडून सांगण्यात आले की, ही बाईक अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. खासकरुन ही बाईक तरुणांना आकर्षित करते. नवीन यामाहा एफजी-एस एफआय हायब्रिडची दिल्लीत शोरम किंमत 1,44,800 रुपये एवढी आहे.
FZ-S Fi हायब्रिडचा लूक खूपच आकर्षक आहे. टँक कव्हरवरील तीक्ष्ण कडा त्याला स्पोर्टी लूक देतात. बाईकची डिझाइन एकदम नवीन आहे. बाईकच्या डिझाइनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये फ्रंट टर्न सिग्नल, एअर इनटेक एरियाचा समावेश आहे. ही बाईक रेसिंग ब्लू आणि सायन मेटॅलिक ग्रे अशा दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
2025 यामाहा एफझेड-एस फाय हायब्रिडच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास, 4.2 इंचाचा फुल-कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. ते Y-Connect अॅपच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट होते. ग्राहकांना टर्न बाय टर्न नेव्हिगेशन मिळते, जे गुगल मॅपशी जोडलेले असते. यातून तुम्हाला रिअल टाइम दिशा, नेव्हिगेशन इंडेक्स, चौकाचे तपशील, रस्त्यांची नावे आणि इतर अनेक माहिती मिळू शकणार आहे.
यामाहाच्या या हायब्रिड मोटरसायकलमध्ये 149 सीसी ब्लू कोर इंजिन आहे, जे आता नवीन OBD-2B मानकानुसार आहे. यात कंपनीचे स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) आणि स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम (एसएसएस) देखील आहेत. एसएमजी आवाज न करता इंजिन सुरु करण्यास मदत करते. जेव्हा बाईक थांबते तेव्हा SSS सिस्टीम आपोआप इंजिन बंद करते आणि क्लच दाबल्यावर ते पुन्हा सुरु करते. यामुळे पेट्रोलची बचत होते.
दरम्यान, या बाईकच्या लॉन्चिंग प्रसंगी बोलताना यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष इटारु ओटानी यांनी सांगितले की, भारतातील यामाहाच्या प्रवासात एफझेड ब्रँडने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते प्रत्येक जनरेशनसोबत विकसित झाले आहे. या सेगमेंटमध्ये हायब्रिड तंत्रज्ञान सादर करुन आम्ही केवळ परफॉरमन्स वाढवत नाही तर प्रगत आणि राइडर-सेंट्रिक इनोवेशन आणण्याची आमची वचनबद्धता देखील मजबूत करत आहोत. एफझेड-एस एफआय हायब्रिडसह यामाहा मोटरसायकलिंगच्या भविष्याच्या दिशेने एक पाऊल टाकत आहे. ही बाईक एफिसिएन्सी, परफॉरमन्स आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीचे संयोजन आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.