कारप्रेमींना झटका! Tata Curvv सारखी डिझाइन असणारी 'ही' कार महागली

Manish Jadhav

ग्राहकांना झटका

नवीन वर्षाचे (2025) आगमन होताच सिट्रोएनने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

Citroen Basalt | Dainik Gomantak

किमती वाढल्या

सिट्रोएनने कूप एसयूव्ही बेसाल्टच्या किमती वाढवल्या आहेत. ही कार Tata Curvv सारख्या प्रीमियम SUV ला स्पर्धा करते. हजारो रुपयांच्या वाढीनंतर त्याची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 8.25 लाख रुपये झाली आहे. प्रास्ताविक ऑफर नवीन वर्ष संपल्यानंतर ही वाढ करण्यात आली आहे.

Citroen Basalt | Dainik Gomantak

Tata Curve

Tata Curve ची एक्स-शोरुम किंमत 9.99 लाख ते 19 लाख रुपये आहे. ही एसयूव्ही तिच्या स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम फीचर्ससाठी ओळखली जाते

Tata Curve | Dainik Gomantak

Citroen Basalt

Citroen Basalt दोन इंजिन पर्यायांसह येते. यात 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 18 किमी/लिटर मायलेज देते. याशिवाय, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय देखील आहे, ज्याचे मॅन्युअल प्रकारात मायलेज 19.5 किमी/लीटर आहे. ऑटोमॅटिक व्हेरिएंट 18.7 किमी/लिटर मायलेज देते.

Citroen Basalt | Dainik Gomantak

फिचर्स

Citroen Basalt मध्ये LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, 16 इंच अलॉय व्हील, रियर एसी व्हेंट आणि सेकेंड एडजस्टेबल थाई सपोर्ट यांसारख्या फिचर्ससह येते. त्याची 10.25 इंच टचस्क्रीन सिस्टिम वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते.

Citroen Basalt | Dainik Gomantak

सुरक्षित

Basalt ला भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या क्रॅश टेस्टमध्ये टाटा कर्व 5 स्टार सेफ्टी रेटिंग प्राप्त करुन देशातील सर्वात सुरक्षित कार बनली.

Citroen Basalt | Dainik Gomantak
आणखी बघा