Raghuram Rajan On Banking Crisis: आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि आयएमएफचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी सध्याच्या बँकिंग क्षेत्रातील संकटाविषयी चिंता व्यक्त केली आहे.
भविष्यात हे संकट अधिक गहिरे होऊ शकते. परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते, असे राजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, रघुराम राजन यांनी 2008 च्या जागतिक मंदीचेही अचूक भाकीत केले होते.
ग्लासगो येथे दिलेल्या एका मुलाखतीत राजन म्हणाले की, सिलिकॉन व्हॅली बँक ऑफ अमेरिका आणि क्रेडिट सुईस बँक ऑफ स्वित्झर्लंडच्या प्रकरणांचा विचार करता, जागतिक बँकिंग प्रणालीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. अशा परिस्थितीत जगातील बँकिंग व्यवस्था एका मोठ्या धोक्याकडे वाटचाल करत आहे.
राजन म्हणाले की, गेल्या दशकापासून बँकांकडून कर्ज सहज उपलब्ध होते, कारण त्यांच्याकडे रोकड बाबत कमतरता नव्हती. पण त्यामुळे एक आर्थिक व्यसन लागले.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील केंद्रीय बँकांनी आपली आर्थिक धोरणे कडक केली आहेत. अशा स्थितीत त्याचा परिणाम आता आर्थिक व्यवस्थेवर दिसून येत आहे.
राजन म्हणाले की, मला चांगल्याची आशा आहे, परंतु सध्याची परिस्थिती पाहता येणारे दिवस कठीण असू शकतात.
गेल्या काही वर्षांपासून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी बाजारातील तरलतेचा प्रवाह वाढवण्यात आला होता, मात्र आता तो अचानक ओढला गेला आहे. त्यामुळे रोखीवर अवलंबून असलेल्या नाजूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
रघुराम राजन म्हणाले की, सिलिकॉन व्हॅली बँक आणि क्रेडिट सुईस बँकांवरील संकट हे दाखवते की बँकांमधील आर्थिक समस्येचे मूळ खोलवर आहे.
बँकांच्या चलनविषयक धोरणांचा प्रभाव खूप खोल आहे, जो हाताळणे सोपे काम नाही, हे आम्ही विसरलो आहोत. अशा स्थितीत त्याचा परिणाम थेट बँकिंग व्यवस्थेवर दिसून येतो.
2005 मध्ये रघुराम राजन यांनी आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ असताना 2008 मध्ये बँकिंग संकटाची भविष्यवाणी केली होती. जी नंतर 2008 मध्ये खरी ठरली. त्यावेळी तत्कालीन अमेरिकन ट्रेझरीने राजन यांचा इशारा विकासविरोधी ठरवून फेटाळून लावला होता.
परंतु 2008 मध्ये अमेरिकेतील बँकिंग संकटाने रघुराम राजन यांचे म्हणणे खरे असल्याचे सिद्ध केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.