Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak

सर्वसामान्यांना दिलासा, CNG-PNG बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; किमती 10 टक्क्यांपर्यंत...

Modi Government: पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने नॅचरल गॅसची किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे.
Published on

Modi Government: पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने नॅचरल गॅसची किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नवीन फॉर्म्युल्यानुसार आता नॅचरल गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या किंमतीच्या आधारावर निश्चित केली जाईल.

तर, आत्तापर्यंत देशांतर्गत नॅचरल गॅसची किंमत जगातील चार प्रमुख गॅस ट्रेडिंग हब - हेन्री हब, अल्बेना, नॅशनल बॅलन्सिंग पॉइंट (यूके) आणि रशियन गॅसच्या किमतीच्या आधारे निश्चित केली जात होती.

मात्र आता, या निर्णयामुळे येत्या दोन दिवसांत म्हणजेच शनिवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होतील. PNG ची किंमत 10 टक्क्यांनी कमी होईल. त्याचवेळी, सीएनजीच्या किमती सुमारे 6 ते 9 टक्क्यांनी कमी होतील.

Prime Minister Narendra Modi
CNG-PNG Price: CNG-PNG च्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ, महागाईच्या झळा कायम!

दुसरीकडे, बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यांनी सांगितले की, नॅचरल गॅसच्या किंमती निश्चित करण्याच्या नवीन सूत्राला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

काय असेल नवीन फॉर्म्युला?

नवीन फॉर्म्युल्यानुसार गॅसची किंमत दर महिन्याला निश्चित केली जाणार आहे. तर जुन्या फॉर्म्युल्यानुसार दर सहा महिन्यांनी गॅसची किंमत होती.

याशिवाय, नवीन सूत्रानुसार, गेल्या एक महिन्यातील भारतीय क्रूड बास्केटची किंमत घरगुती नॅचरल गॅसच्या किमतीचा आधार म्हणून घेतली जाईल.

तत्पूर्वी, जुन्या सूत्रानुसार, जगातील चारही गॅस ट्रेडिंग केंद्रांच्या मागील एका वर्षाच्या किंमतीची (मूल्य वेटेड किंमत) सरासरी घेतली जाते आणि नंतर ती तीन महिन्यांच्या अंतराने लागू केली जाते.

Prime Minister Narendra Modi
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA नंतर TA मध्ये बंपर वाढ!

तसेच, नवीन फॉर्म्युला लागू झाल्यानंतर पीएनजी आणि सीएनजी स्वस्त होणार असल्याचा सरकारचा दावा आहे. यामुळे ग्राहकांना अधिक स्थिर दराने गॅस मिळेल.

याशिवाय, खते बनवणाऱ्या कंपन्यांना स्वस्तात गॅस मिळणार असून, त्यामुळे खतावरील अनुदान कमी होणार आहे.

नवीन फॉर्म्युला लागू झाल्याने ऊर्जा क्षेत्राला स्वस्त गॅस मिळणार आहे. त्यामुळे गॅस उत्पादक देशाला अधिक उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com