Budget Session 2023: मोदी सरकारला तिरंग्यातील हिरव्या रंगाची अचडण? संसदेत गरजले ओवेसी

AIAIM (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi Dainik Gomantak

Budget Session 2023: AIAIM (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.

संसदेत बोलताना हैदराबादचे खासदार ओवेसी म्हणाले की, 'मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग काढून टाकणार का? सरकारला हिरव्या रंगाची इतकी अडचण का आहे?

त्यांनी पुढे विचारले की, 'पंतप्रधान मोदी चिनी घुसखोरीवर बोलतील का? बिल्कीस बानोला न्याय मिळेल का?' केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये अल्पसंख्याक योजनांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी कमी केल्याबद्दल ओवेसी यांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली.

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi: 'इस्लामने भारताला दिली लोकशाहीची देणगी', MIM च्या ओवेसींचे वक्तव्य

'मुघल पैसे घेऊन पळून गेले का?'

2023-24 या आर्थिक वर्षासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात 38 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. मुस्लिमांनी या देशात शिक्षण घ्यावं असं भाजप सरकारला वाटत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

भाजप आणि काँग्रेसवर (Congress) निशाणा साधत ते म्हणाले की, 'काँग्रेस आणि भाजपने भारतात कुलीनशाहीला जन्म दिला आहे. देशातून अमाप संपत्ती घेऊन पळून गेलेल्या मुघलांचे नाव त्या यादीत आहे का? परंतु ते यावर काही बोलणार नाही.'

'हिंडेनबर्ग भारतात असता...'

ओवेसी पुढे म्हणाले की, "हिंडेनबर्ग संस्था भारतात असती तर त्यांना बेकायदेशीर प्रतिबंध कायद्याचा सामना करावा लागला असता." हिंडेनबर्ग रिसर्च या न्यूयॉर्कस्थित संशोधन संस्थेने गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांवर स्टॉक हेराफेरी आणि फसवणूक केल्याचा आरोप केला. या अहवालानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi: काश्मीरमधील पहिल्या मल्टिप्लेक्सवर ओवेसींचा प्रश्न, म्हणाले...

UAPA हा दहशतवादविरोधी कायदा आहे, जो अपवादात्मक परिस्थितीसाठी तयार करण्यात आला आहे. 2019 मध्ये UAPA मध्ये केलेल्या बदलांमुळे केंद्र सरकारला कोणत्याही व्यक्तीला 'दहशतवादी' म्हणून लेबल लावून त्रास देण्याचा अधिकार मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com