Asaduddin Owaisi: 'इस्लामने भारताला दिली लोकशाहीची देणगी', MIM च्या ओवेसींचे वक्तव्य

मग आखाती देशांमध्ये लोकशाही का सापडली नाही? असा सवाल देखील अनेकांनी उपस्थित केला आहे.
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiDainik Gomantak
Published on
Updated on

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी सध्या भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत. मुस्लिम समाजाबद्दल बोलताना, सध्याचे सरकार सरकार मुस्लिमांसाठी काहीच करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, इस्लामने भारताला लोकशाहीची देणगी दिली आहे, असे वक्तव्य देखील ओवेसी यांनी केले. दरम्यान, ओवेसी यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावरून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

Asaduddin Owaisi
Rajasthan: पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे येत होता अमली पदार्थ; जवानांनी दोघांना फिल्मी स्टाईलने केली अटक

"गंगा आणि यमुना स्वतंत्रपणे उगम पावतात पण त्यांना संगम म्हणतात. या देशात खूप खजिना होता पण नंतर आम्ही बंद दरवाजे उघडले. इस्लामने या देशाला अनेक देणग्या दिल्या आहेत, पण सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे लोकशाहीची देणगी." असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

अलीकडे असदुद्दीन ओवेसी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ओवेसी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

राहुल गांधी अस्तित्वातच नाहीत आणि त्यांनी राहुल गांधींना मारले असेल तर मग हे कोण जिन आहेत का? अशा शब्दात ओवेसींनी राहुल गांधी टीका केली आहे.

Asaduddin Owaisi
Pramod Sawant: कर्नाटक आक्रमक पण, म्हादईसाठी आमचा प्लॅन ठरलाय; CM च्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

दरम्यान, लोकांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे.

'लोकशाही मुस्लिमांनी नाही तर संविधानाने दिली आहे.' अशी प्रतिक्रिया एका ट्विटर युजरने दिली आहे. तसेच, 'इस्लामने भारताला लोकशाही भेट दिली आहे असे लिहिल्या इतिहासाच्या पुस्तकाचे पान लोकांसमोर शेअर करा.' असेही काही लोकांनी म्हटले आहे.

इस्लामने काहीही दिले नाही, पण आपल्या देशाच्या घटनात्मक पदांवर बसलेल्या नेत्यांनी आपल्याला लोकशाहीची देणगी दिली आहे. अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीने दिली आहे. तर, अनेकांनी मग आखाती देशांमध्ये लोकशाही का सापडली नाही? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com