Petrol Pump
Petrol Pump Dainik Gomantak

तब्बल चार महिन्यांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ का झाली?

सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.21 रुपये प्रतिलिटर आहे तर डिझेल 87.47 रुपये प्रतिलिटर आहे.
Published on

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चार महिन्यांत पहिल्यांदाच मंगळवारी वाढल्या. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.21 रुपये प्रतिलिटर आहे तर डिझेल 87.47 रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने तेल कंपन्यांनी तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 85 टक्के तेल आयात करतो.

Petrol Pump
धाडसत्र! हिरो मोटरकॉर्पचे प्रमुख पवन मुंजाल यांच्यावर आयकर विभागाची छापेमारी

इंधनाच्या किमती किती वाढण्याची शक्यता आहे?

तेलाचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांना (OMC) त्यांचे मार्केटिंग मार्जिन राखता यावे यासाठी कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 1 डॉलरच्या वाढीमागे पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) या दोन्हींच्या किमती 0.52 रुपयांनी वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या उच्च किमतीचा ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी केंद्र पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करू शकते, असा अंदाज आहे. पेट्रोलवरील सेंट्रल उत्पादन शुल्क अजूनही कोरोना महामारीपूर्वीच्या वेळेपेक्षा 8 रुपये जास्त आहे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क महामारीपूर्वीच्या वेळेपेक्षा 6 रुपये जास्त आहे.

Petrol Pump
आता 'व्हॉइस मेसेज'द्वारेही बुक करता येणार एलपीजी सिलिंडर

मोठ्या खरेदीदारांवर डिझेल दरवाढीचा कसा परिणाम होईल?

डिझेलचा वापर प्रामुख्याने पॉवर बॅकअपसाठी आणि मोबाईल टॉवरच्या जेनसेट्सला उर्जा देण्यासाठी केला जातो. भारतीय रेल्वे, कारखाने, मॉल्स सारख्या मोठ्या खरेदीदारांना देखील डिझेलच्या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. एका तज्ज्ञाने सांगितले की, वाढलेल्या किमती टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील वापरकर्त्यांवर मोठा परिणाम करू शकतात. दिल्ली (Delhi) आणि मुंबई सारख्या टियर 1 शहरांमध्ये वीज पुरवठा नियमित असल्याने डिझेलचा वापर कमी केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com