धाडसत्र! हिरो मोटरकॉर्पचे प्रमुख पवन मुंजाल यांच्यावर आयकर विभागाची छापेमारी

हिरो मोटरकॉर्पचे प्रमुख पवन मुंजाल (Pawan Munjal) यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.
Pawan Munjal News, Income tax Raid on Hero MotoCorp Chairman News, IT Raid on Hero MotoCorp Chairman Pawan Munjal News
Pawan Munjal News, Income tax Raid on Hero MotoCorp Chairman News, IT Raid on Hero MotoCorp Chairman Pawan Munjal NewsDainik Gomantak
Published on
Updated on

दुचाकी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Hero MotoCorp चे चेअरमन पवन मुंजाल यांच्यावर आयकर विभागाने (Income Tax Department) छापेमारी केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, आयकर विभागाच्या टीमने त्यांच्या गुडगाव मधील कार्यालय आणि घरावर छापा टाकला आहे. Hero MotoCorp ही जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी 40 हून अधिक देशांमध्ये आपला व्यवसाय करते. हिरो मोटोकॉर्पने आशिया, आफ्रिका (Africa), अमेरिका (America) यांसारख्या देशांमध्येही आपला व्यवसाय विस्तारला आहे. भारतीय दुचाकी विभागात Hero MotoCorp ही आघाडीची कंपनी आहे. भारतात विकल्या गेलेल्या एकूण दुचाकींपैकी 50 टक्के हीरो मोटोकॉर्पकडे आहेत. (Pawan Munjal head of Hero Motorcorp has been raided by the Income Tax Department)

हिरो मोटोचा स्टॉक 2 टक्क्यांनी घसरला

छाप्याच्या वृत्तानंतर Hero MotoCorp च्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. शेअर 2380 रुपयांच्या खाली आला असून 2 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचबरोबर वाहन क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअर्सवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. मारुती, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर्सचे शेअर्स 1.5 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. (Income tax Raid on Hero MotoCorp Chairman News)

Hero MotoCorp स्टॉक कामगिरी

हिरो मोटोकॉर्पचा शेअर गेल्या एका आठवड्यात 1 टक्क्यांनी घसरला आहे. एका महिन्यात 11 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याच वेळी, या वर्षी आतापर्यंत 4 टक्के निगेटिव रिटर्न्स मिळाला आहे. याशिवाय, मार्च 2021 च्या तुलनेत मार्च 2022 पर्यंत स्टॉक 23 टक्क्यांनी घसरला आहे.

Pawan Munjal News, Income tax Raid on Hero MotoCorp Chairman News, IT Raid on Hero MotoCorp Chairman Pawan Munjal News
आता 'व्हॉइस मेसेज'द्वारेही बुक करता येणार एलपीजी सिलिंडर

Hero MotoCorp ची कमाई

कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार, Hero Motocorp (Hero Motocorp) चा एकूण नफा ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 36.7% घसरुन 686 कोटी रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, अगदी वर्षभरापूर्वी याच तिमाहीत Hero Motocorp चा नफा 1084.47 कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीने 7883 कोटी रुपये कमावले होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 9776 कोटी रुपये होते. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीच्या कमाईत 19.4% ने घट झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com