WhatsApp Latest News: आता डेस्कटॉपवरूनही करता येणार WhatsApp व्हिडिओ-ऑडिओ कॉल; कसं ते वाचा

डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल करण्याचे नवे फिचर अपडेट झाले आहे.
WhatsApp Features Settings | WhatsApp Settings
WhatsApp Features Settings | WhatsApp Settings Dainik Gomantak

WhatsApp Latest News: व्हॉट्सअॅपने डेस्कटॉपसाठी अनेक फीचर्स आणले आहेत. पण दोन फीचर्सची कमतरता अजूनही जाणवत आहे. पहिला म्हणजे डेस्कटॉपवर WhatsApp लॉक करणे आणि दुसरे म्हणजे डेस्कटॉपवर व्हिडिओ किंवा ऑडिओ करणे. 

यापैकी एक फिचर उपलब्ध झले आहे. वास्तविक, व्हॉट्सअॅपने विंडोजसाठी नवीन अॅप आणले आहे. अॅप जलद गतीने लोड होतो आणि वापरण्यास सोपा इंटरफेससह येतो. 

त्याच्या मदतीने, व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना आठ लोकांपर्यंत ग्रुप व्हिडिओ कॉल आणि 32 लोकांपर्यंत ऑडिओ कॉल करु शकतो.

WhatsApp Features Settings | WhatsApp Settings
Whats App च्या रिअॅक्शन नोटिफिकेशन ऑफ करण्याचा सोपा मार्ग

macOS चीही सुविधा मिळाली का?

समोर आलेल्या माहितीमध्ये फक्त विंडोजचा उल्लेख करण्यात आला आहे. हे वैशिष्ट्य मॅकबुक वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध केले जाईल. कारण Mac डेस्कटॉप आवृत्ती सध्या बीटा चाचणीत आहे.

नुकत्याचझालेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये मेटाने सांगितले की, विंडोजसाठी इन्स्टंट मॅसेजिंग अॅप, व्हॉट्सअॅपला नवीन वैशिष्ट्यांसहएक नवीन रूप मिळाले आहे. मेटाने सांगितले की, आम्ही विंडोजसाठी एक नवीन व्हॉट्स अॅप सादर करत आहोत जे जलद गतीने लोड होईल आणि अॅपच्या मोबाइल व्हर्जनप्रमाणेच इंटरफेससह येईल.

WhatsApp Features Settings | WhatsApp Settings
Anupam Mittal in Hospital : शार्क टॅंक अनुपम मित्तल हॉस्पिटलमध्ये? व्हिडीओ शेअर करून दिली माहिती
  • डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप कॉल कसा करायचा

डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ (Video) किंवा ऑडिओ कॉल करण्याचे नवे फिचर लॉंच झाले आहे. या फीचरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला डेस्कटॉप व्हॉट्स अॅप अपडेट करावे लागेल. अपडेट केल्यानंतर तुम्हाला मोबाईल इंटरफेसप्रमाणेच व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉलचे आयकॉन दिसेल.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका निवेदनात व्हॉट्सअॅपने म्हटले होते की, व्हॉट्सअॅप युजर्सच्या प्रायव्हसीला प्राधान्य देते. हेच कारण आहे की कंपनी मोबाइल फोन, संगणक, टॅब्लेट आणि इतर उपकरणांसारख्या सर्व प्लॅटफॉर्मसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मॅसेजिंग करता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com