Whats App
Whats AppDainik Gomantak

Whats App च्या रिअॅक्शन नोटिफिकेशन ऑफ करण्याचा सोपा मार्ग

जर तुम्ही व्हॉट्सअॅपवरील मॅसेजवरील रिअॅक्शनच्या नोटिफिकेशनने वैतागले असाल तर ही बातमी नक्की वाचा.
Published on

मेटा-मालकीचे इन्स्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सला अनेक फिचर्स देत असते. या फीचर्सच्या यादीत नवीन मॅसेज रिअॅक्शन फीचरचा (Message Reaction) समावेश करण्यात आला आहे. हे फिचर्स वर्षाच्या सुरुवातीलाच अॅपमध्ये पाहायला मिळणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स इमोजीच्या माध्यमातून मॅसेजवर रिअॅक्शन देऊ शकतात. हे फिचर सर्व Android, iOS आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

  • मॅजेस रिअॅक्शन फिचर

या फिचरच्या मदतीने, युजर्स त्यांच्या वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये इमोजीद्वारे प्राप्त झालेल्या मॅसेजवर रिअॅक्शन देऊ शकतात. एवढेच नाही तर मॅसेजच्या खाली असलेल्या रिअॅक्शन इमोजीवर क्लिक करून युजर्स रिअॅक्शन पाहू शकतात. यासोबतच ग्रुपमध्ये अॅड केलेले सर्व सदस्य मॅसेजवर आलेल्या रिअॅक्शन पाहू शकतात. कोणी काय रिअॅक्शन दिली हे पाहू शकतात.

Whats App
World AIDS Day 2022: HIV अन् एड्सबाबत तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर
  • मॅजेस रिअॅक्शन फिचरचे नोटिफिकेशन

जेव्हा व्हॉट्सअॅप युजर्स हे फिचर वापरून मॅसेजवर रिअॅक्शन देतात तेव्हा इतर युजर्सला एक नोटिफिकेशन मिळते. काहींना हे नोटिफिकेशन आवडले, तर काही लोकांना नाही आवजडले. रिअॅक्शनचे नोटिफिकेशन मिळाल्यावर, युजर्सला असे वाटते की एक संदेश आला आहे. तुम्हालाही याची काळजी वाटत असेल, तर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की व्हॉट्सअॅप तुम्हाला रिअॅक्शन नोटिफिकेशन ऑफ करण्याची परवानगी देते.

  • व्हॉट्सअॅप तुम्हाला रिअॅक्शन नोटिफिकेशन ऑफ करण्याची पध्दत

  • प्रथम whatsapp ओपन करावे.

  • यानंतर उजव्या बाजूला येणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.

  • आता येथे Settings वर क्लिक करा.

  • त्यानंतर नोटिफिकेशनचा पर्याय निवडा.

  • येथून खाली स्क्रोल करा आणि खाली या.

  • यानंतर, जर तुम्हाला सिंगल चॅटसाठी नोटिफिकेशन बंद करायचे असेल, तर मॅसेज सेक्शनमध्ये येणारे रिअॅक्शन नोटिफिकेशन

  • टॉगल ऑफ करा.

  • याशिवाय, जर तुम्हाला ग्रुप चॅटसाठी रिअॅक्शन नोटिफिकेशन ऑफ करायचे असेल तर ग्रुप चॅट सेक्शनमध्ये त्याचे टॉगल ऑफ करा.

  • यानंतर नोटिफिकेशन येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com