Investment: बँक बुडाली तर तुमच्या पैशाचे काय? नुकसान कसे टाळायचे जाणून घ्या...

RBI च्या विम्यामुळे जास्तीत जास्त 'इतकी' रक्कम मिळते परत
 Investment
InvestmentDainik Gomantak
Published on
Updated on

Investment: क्वचितच असा कोणताही गुंतवणूक पर्याय किंवा बचत योजना असेल जिथे असा दावा केला जाऊ शकतो की खातेदाराचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. अगदी बँकेच्या बचत खात्यात ठेवलेल्या पैशाबाबतही असे खात्रीने सांगता येत नाही. अनेक छोट्या ग्रामीण आणि सहकारी बँकांची आर्थिक स्थिती कशी बिघडली आणि त्यात जमा असलेल्या लोकांच्या पैशाला कसे ग्रहण लागले याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

 Investment
Layoff Wave: आता दूरसंचार क्षेत्रातील 'ही' कंपनी 5 वर्षात शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

एखाद्या बँकेवर निर्बंध आल्यावर किंवा एखादी बँक दिवाळखोर झाल्यावर लोक स्वतःचे पैसे बँकेतून काढण्यासाठी धडपडताना दिसले. तुमचे पैसे असलेली बँकही अशीच बुडाली तर तुमच्या पैशाचे काय होणार याविषयी जाणून घेऊया.

बँकेत फक्त बचत खात्यात पैसे नसतात. बँक एफडी, आरडी आणि चालू खात्यातही पैसे असतात. पहिली गोष्ट म्हणजे, मोठ्या बँका दिवाळखोर होणे खूप कठीण आहे, कारण तशीच वेळ आली तर सरकार आणि आरबीआय काहीही करून या बँकांच्या बचावासाठी पुढे येतात. कोणत्याही मोठ्या बँकेच्या दिवाळखोरीचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत असतो.

तथापि, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बँकांमध्ये ठेवलेल्या पैशांचा विमा उतरवत असते. हे डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत प्रदान केले जाते. यामध्ये व्यापारी बँका आणि सहकारी बँकांचा समावेश करण्यात आला आहे.

 Investment
Youtube Earning Tips: आता 'Youtube' वरून कमवा हजारो रुपये; फक्त हवेत एवढे सब्क्राइबर्स

DICGC सर्व गुंतवणुकीचा विमा उतरवते. या अंतर्गत, बँक दिवाळखोर झाल्यास किंवा तिचा परवाना रद्द झाल्यास, प्रत्येक गुंतवणूकदाराला कमाल 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळेल. त्यात त्याने बँकेत जमा केलेली मूळ रक्कम आणि व्याजाचा समावेश आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने 4.80 लाख रुपये बँकेत जमा केले असतील तर त्याला संपूर्ण पैसे मिळतील, परंतु जर एखाद्याने 6 लाख रुपये जमा केले असतील तर त्याचे 1 लाखांचे नुकसान होईल.

हे टाळण्यासाठी काय करावे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला बँकेत पैसे ठेवावे लागतील आणि एकूण रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर ते एकाच बँकेत ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करा. उदाहरणार्थ, 15 लाख रुपये 3 वेगवेगळ्या बँकांमध्ये विभाजित करून ठेवता येतील. यामुळे तुमचा एक रुपयाही कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत बुडण्यापासून वाचेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com