Layoff Wave: आता दूरसंचार क्षेत्रातील 'ही' कंपनी 5 वर्षात शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

खर्च कमी करण्यासाठी निर्णय; लंडन कार्यालयात करणार सर्वात मोठी कर्मचारी कपात
Layoffs
LayoffsDainik Gomantak
Published on
Updated on

Layoff Wave: सन 2023 हे वर्ष मंदीच्या छायेत सुरू झाले आहे. गेल्या काही काळामध्ये देशातील आणि जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. आता या यादीत दूरसंचार सेवा कंपनी असलेल्या Vodafone चेही नाव जोडले गेले आहे. कंपनीने पुन्हा एकदा मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी पुढील 5 वर्षांत शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे.

Layoffs
Miss Universe: 'या' देशाच्या सुंदरीने जिंकला मिस युनिव्हर्स किताब

व्होडाफोनने नोव्हेंबर 2022 मध्येच आपल्या खर्चात कपात करण्याची घोषणा केली होती. कंपनीने म्हटले होते की सन 2026 पर्यंत कंपनी आपला खर्च $1.08 बिलियन पर्यंत कमी करेल. स्पेनमधील टेलिफोनिका आणि फ्रान्समधील ऑरेंज यांसारख्या युरोपीय बाजारपेठेतील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनीदेखील त्यांच्या खर्चात 50 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्होडाफोन जगभरातील शेकडो नोकऱ्या कमी करण्याचा विचार करत आहे. यामध्ये कंपनीच्या लंडन येथील कार्यालयात सर्वात मोठी कपात केली जाणार आहे. व्होडाफोन कंपनीचे जगभरात सुमारे 1,04,000 कर्मचारी आहेत. दरम्यान, या कपातीचा भारतावर किती परिणाम होईल, हे आत्ताच निश्चित्तपणे सांगता येऊ शकत नाही.

Layoffs
Godawari Electric: एक रूपयाच्या खर्चात 2km धावणार, अशी इलेक्ट्रिक ऑटो तुम्ही म्हणाल फिटले पैसे

दरम्यान, यापुर्वी भारतात Byju's, Unacademy, Lead, Swiggy, Vedantu इत्यादी अनेक स्टार्टअप कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. तर जागतिक स्तरावरील ट्विटर, अॅमेझॉन, फेसबुकची मूळ कंपनी मेटा, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com