
जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी वाट पाहणे फायद्याचे ठरू शकते. कारण या आठवड्यात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एकाच वेळी चार नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहेत. भारतीय बाजारपेठेत सॅमसंग आणि मोटोरोला या नामांकित कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन सादर केले जाणार आहेत. दरम्यान, ओप्पो कंपनीचा नवा स्मार्टफोन चीनच्या बाजारात लाँच केला जाणार आहे.
सॅमसंगचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी एस२५ एज उद्या म्हणजेच १३ मे रोजी लाँच होणार आहे. कंपनीचा दावा आहे की हा आगामी स्मार्टफोन S25 Edge हा सर्वात बारीक फोन असेल, रिपोर्ट्सनुसार, या फोनची जाडी ५.८ मिमी असेल तर वजन १६३ ग्रॅम असेल.
या फोनला ३९००mAh बॅटरी, वेग आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर, ६.७ इंचाचा S AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी एस२५ अल्ट्रा प्रमाणे, या फोनमध्येही मागील बाजूस २०० मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा असू शकतो.
मोटोरोला कंपनी उद्या म्हणजेच १३ मे रोजी एक नवीन फ्लिप फोन Razr 60 Ultra देखील लाँच करणार आहे. या फोनसाठी Amazon वर एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्याद्वारे फोनच्या वैशिष्ट्यांची पुष्टी करण्यात आली आहे. मोटो एआय २.० सपोर्टसह, या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी रॅम / ५१२ जीबी स्टोरेज, स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर, दोन ५०-मेगापिक्सेल रियर आणि ५०-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असतील.
सोनी कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन १३ मे रोजी म्हणजेच उद्या लाँच होऊ शकतो. लीक झालेल्या फीचर्सनुसार, हा फोन ६.५ इंचाचा OLED डिस्प्ले, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४के रिझोल्यूशन सपोर्टसह येईल.
मागील बाजूस ४८-मेगापिक्सेलचा प्रायमरी, १२-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड आणि १२-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे. हा फोन गीकबेंचवर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसरसह दिसला आहे. याशिवाय, या हँडसेटमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत यूएफएस ४.० स्टोरेज असण्याची अपेक्षा आहे.
ओप्पो ब्रँडचा हा आगामी स्मार्टफोन १५ मे रोजी चिनी बाजारात लाँच होणार आहे. लाँच होण्यापूर्वी या फोनबद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत, रेनो १४ मध्ये ६.५९ इंचाची ओएलईडी स्क्रीन असू शकते तर १४ प्रो मध्ये ६.८३ इंचाची ओएलईडी स्क्रीन असू शकते. दोन्ही मॉडेल्स १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १.५ के रिझोल्यूशन सपोर्टसह येऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.