Artificial Intelligence चा गैरवापर करताय? वाचा, कायदा काय सांगतो

Misuse Of AI : तुम्ही AI चा गैरवापर केल्यास तुमला काय शिक्षा होईल? या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे आपल्या गैरवापरावर अवलंबून आहे. म्हणजेच तुम्ही कोणता गुन्हा कराल, त्याची शिक्षाही त्यानुसार ठरवली जाईल.
Misuse of Artificial Intelligence
Misuse of Artificial IntelligenceDainik Gomantak
Published on
Updated on

Misuse of Artificial Intelligence, In Maharashtra's Palghar obscene videos made using AI:

आर्टिफिशियल इन्टेलिजेन्सच्या (Artificial Intelligence) गैरवापराबद्दल जी भीती होती, ती आता खरी होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्ये AI चा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे.

येथे एका पोलिस कर्मचाऱ्याच्या दोन मुलांनी आर्टिफिशियल इन्टेलिजेन्सचा वापर करून महिला आणि मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवले आहेत.

एवढेच नाही तर हे व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. याला विरोध केल्यावर पीडितांना मारहाणही करण्यात आली.

तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली खरी, मात्र यासोबतच एक नवीन आव्हान लोकांसमोर येताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत, जिथे एआयचा वापर तुमचे चित्र विकृत करण्यासाठी केला जाऊ शकतो. जर कोणी असा व्हिडीओ एडिट केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

आर्टिफिशियल इन्टेलिजेन्सचा गैरवापर केला तर काय होईल?

आर्टिफिशियल इन्टेलिजेन्सचा गैरवापर केल्यास, आयटी कायदा, आयपीसी आणि डेटा संरक्षण कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.

एका सायबर तज्ज्ञाने सांगितले की, आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत इंटरनेटवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे.

या कलमांतर्गत तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे आणि या शिक्षेत वाढही होऊ शकते. तुमच्या शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ज्या व्यक्तीची प्रतिमा डागाळली आहे ती व्यक्ती तुमच्याविरुद्ध मानहानीचा खटलाही दाखल करू शकते.

या लेखाच्या सुरुवातीला आपण ज्या केसबद्दल बोललो त्यामध्ये पोलिसांनी अनेक प्रकरणांमध्ये गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (POCSO) कलमांखालीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Misuse of Artificial Intelligence
आर्टिफिशियल इन्टेलिजेन्स न्यायालयीन प्रक्रियेत मानवी बुद्धिमत्तेची जागा घेऊ शकत नाही, हायकोर्टाचे निरीक्षण

तुमच्या बाबतीत असे घडल्यास काय करावे?

या प्रकाराला कोणी बळी पडल्यास सायबर क्राईमच्या संबंधित पोलिस ठाण्यात संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता.

याशिवाय यूजर्सनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे फोटो कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आढळल्यास, तुम्ही तेथेही तक्रार करू शकता.

Misuse of Artificial Intelligence
Success Story: कर्जबाजारी तरुण सहा वर्षात 55 हजार कोटींचा मालक, यशोगाथा पहिल्या क्रिप्टो अब्जाधीशाची

AI चा गैरवापर

सोशल मीडियावर तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसतात, ज्यावरून असे दिसून येते की लोक AI चा गैरवापर करत आहेत.

यामध्ये डीपफेक व्हिडिओ, मॉर्फ व्हिडिओ आणि चाइल्ड पोर्नोग्राफीचा समावेश आहे. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पीडोफाइल्सचे अनेक गट (मुलांकडे लैंगिक आकर्षण असलेले) सक्रिय आहेत.

एवढेच नाही तर त्याचा संपूर्ण व्यवसाय डार्क वेबवर सुरू आहे. लोकांना सोशल मीडियावर अशा डेटाचा सशुल्क प्रवेश दिला जात आहे.

सोशल मीडिया कंपन्या अशा अकाऊंटवर कारवाई करत आहेत, पण तरीही यावर पूर्ण नियंत्रण करणे अवघड होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com