Electronic Components Price Cut: तुम्हीही सध्या टीव्ही किंवा मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्ही नक्की वाचा. लवकरच या वस्तूंच्या किमतीत मोठी घसरण होणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या वर्षभरापासून मागणी कमी होत असल्याने उत्पादनाची किंमत कमी करण्याचा विचार करु शकतात. खर्चात कपात झाल्यामुळे असे होणे अपेक्षित आहे. एका अहवालानुसार टेलिव्हिजन, मोबाईल आणि कॉम्प्युटर या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या (Corona epidemic) काळात या वस्तू कारखान्यांना पाठवण्याचा खर्च विक्रमी पातळीवर पोहोचला होता. आता पुन्हा कोविडपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या उद्योगाशी संबंधित जाणकारांचे म्हणणे आहे की, कंपन्या इनपुट कॉस्टमध्ये कपातीचा फायदा दिवाळीच्या दिवशी ग्राहकांना देऊ शकतात.
कोविड महामारीदरम्यान, चीनमधून कंटेनर पाठवण्याचा खर्च $8,000 च्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. आता ते 850 वरुन 1,000 डॉलरवर घसरले आहे.
तसेच, सेमीकंडक्टर चिप्सच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कोरोना काळापासून या किमती एक दशांश पर्यंत खाली आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंटच्या किमतीत 60-80% पर्यंत घट नोंदवली गेली आहे.
किंमतीतील ही घसरण जगभरात मागणी नसल्यामुळे आणि काही देशांमध्ये आर्थिक मंदीमुळे झाली आहे. सणासुदीच्या आसपास बाजारात (Market) खळबळ माजवण्याच्या उद्देशाने कंपन्या दरात कपात करु शकतात, असे मानले जात आहे.
त्याचबरोबर, 2021-2022 मधील 16,400 रुपयांच्या तुलनेत 2022-23 मध्ये सरासरी विक्री किंमत सुमारे 11,500 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड हायर इंडियाचे अध्यक्ष सतीश एनएस म्हणाले की, मागणी कमी झाल्यामुळे कंटेनर भरता आले नाहीत. अशा स्थितीत माल त्वरीत पोहोचवायचा असेल, तर मालवाहतूक चालक अधिक पैसे मागत आहेत. किंवा दुसरा पर्याय म्हणजे प्रतिक्षा करणे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.