Stock Market: छोटे शेअर्स मोठी कमाई! या स्मॉल कॅप कंपन्यांचा गुंतवणुकदारांना भरघोस रिटर्न्स

Stock Market: या कंपन्यांच्या समभागांनी या कालावधीत (20 जून 2023 पर्यंत) 115 ते 174 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.
Stock Market: छोटे शेअर्स मोठी कमाई! या स्मॉल कॅप कंपन्यांचा गुंतवणुकदारांना भरघोस रिटर्न्स
Published on
Updated on

Stock Market:

अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत परताव्याच्या बाबतीत चार छोट्या कंपन्यांचे शेअर्सनी मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सला मागेस टाकले आहे. या कंपन्यांच्या समभागांनी या कालावधीत (20 जून 2023 पर्यंत) 115 ते 174 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

हा भरघोस परतावा देणाऱ्या स्मॉल कॅप शेअर्समध्ये JITF Infralogistics, Brightcop Group, स्वराज शूटिंग आणि सर्वोटेक पॉवर सिस्टम्स यांचा समावेश आहे.

Stock Market: छोटे शेअर्स मोठी कमाई! या स्मॉल कॅप कंपन्यांचा गुंतवणुकदारांना भरघोस रिटर्न्स
Income Tax Return Online Filing: आयटीआर ऑनलाइन भरण्याची संपूर्ण प्रक्रिया, जाणून घ्या सोप्या स्टेप्स

जेआयटीएफ इन्फ्रालोजिस्टिक शेअर्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या एका महिन्यात हा शेअर 147.30 रुपयांवरून 403.75 रुपयांवर गेला आहे. या कालावधीत त्याने 174.10 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत त्याची सर्वात कमी किंमत 144.75 रुपये होती तर सर्वाधिक किंमत 403.75 रुपये होती.


सहा महिन्यांत झाली 301 टक्क्यांची वाढ

आजही जेआयटीएफ इन्फ्रालोजिस्टिक शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 423.90 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 5 दिवसांत सतत अप्पर सर्किटसह 21 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. गेल्या एका महिन्यात तो 174 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. कंपनीने सहा महिन्यांत 301 टक्के परतावा दिला आहे आणि यावर्षी आतापर्यंत 263 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 423.90 आहे.

ब्राइटकॉम समूह जोरात

एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये ब्राइटकॉम समूह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कालावधीत तो 14.80 रुपयांवरून 18.30 रुपयांवर पोहचला म्हणजेच 123.65 टक्क्यांनी वाढला आहे.

यानंतर स्वराज शूटिंगचा क्रमांक लागतो. या समभागानेही 119.97 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली आहे. एका महिन्यात शेअर 32.55 रुपयांवरून 71.60 रुपयांवर गेला आहे.

Stock Market: छोटे शेअर्स मोठी कमाई! या स्मॉल कॅप कंपन्यांचा गुंतवणुकदारांना भरघोस रिटर्न्स
Air India Deal: इंडिगोनंतर एअर इंडियाची मोठी डील, एअरबस-बोईंगकडून 470 विमानांची खरेदी; डिलिव्हरी कधीपासून होणार?

ब्राइटकॉम समूहाचे शेअर्स अजूनही अप्पर सर्किटमध्ये आहेत. आज शेअर 4.98 टक्क्यांनी वाढून 34.75 रुपयांवर पोहोचला आहे. अप्पर सर्किटसह गेल्या सलग 5 दिवसांत 21 टक्क्यांहून अधिक वाढ झालेला शेअर गेल्या एका महिन्यात 124 टक्क्यांनी वाढला आहे.

सर्वोटेक पॉवरबाबत बोलायचे झाल्यास, या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे केवळ एका महिन्यात दुप्पट केले आहेत. या कालावधीत तो 88.90 रुपयांवरून 191.70 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत त्याने 115.64 टक्के उड्डाण घेतले आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांची चांदी झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com