Stock Market मध्ये या तीन IT कंपन्यांची चलती, 177% चा रिटर्न्स

बाजारात (Stock Market) बीएसईचा (BSE) टेलिकॉम इंडेक्स 17.06 टक्क्यांनी वाढला, तर बीएसई युटिलिटीज 14 टक्क्यांनी आणि बीएसई कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडेक्स 13 टक्क्यांनी वाढला आहे
These IT Companies return up to 177% to investors in Stock market
These IT Companies return up to 177% to investors in Stock marketDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या एक महिन्यापासून दूरसंचार कंपनीचे (Telecom Sector) शेअर्स तसेच ग्राहकोपयोगी वस्तू आणि उर्जा कंपनींच्या शेअर्सची देखील बाजारात (Stock Market) चांगली कामगिरी केली आहे. बाजारात बीएसईचा (BSE) टेलिकॉम इंडेक्स 17.06 टक्क्यांनी वाढला, तर बीएसई युटिलिटीज 14 टक्क्यांनी आणि बीएसई कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडेक्स 13 टक्क्यांनी वाढला आहे . बीएसई आयटी इंडेक्स (BSE IT Index) मात्र गेल्या एका महिन्यात फक्त 3.56 टक्क्यांनी वाढला आहे, तर बीएसई सेन्सेक्स फक्त एका महिन्यात 6 टक्क्यांनी वाढला आहे.(These IT Companies return up to 177% to investors)

हे स्पष्ट आहे की गेल्या एका महिन्यात आयटी शेअर्सनी बाजारात इतकी चांगली कामगिरी केली नाही असे असूनही, गेल्या एका महिन्यात अशा तीन आयटी कंपन्या आहेत ज्या कंपन्यांमुळे त्यांच्या गुंतवणूकदारांना शंभर टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे.

कॉन्टिनेंटल केमिकल्स लिमिटेड या आयटी स्टॉकने गेल्या महिन्यात त्याच्या गुंतवणूकदारांची सर्वाधिक कमाई करून दिली आहे. या शेअरने एका महिन्यात 177.66% परतावा देऊन त्याच्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

These IT Companies return up to 177% to investors in Stock market
गडकरींचा प्लॅन,दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेतून केंद्राला दरमहा 1,500 कोटींचे उत्त्पन्न

गेल्या महिन्यात आपल्या गुंतवूणकदारांना उत्कृष्ट रिटर्न्स देणाऱ्या शेअर्समध्ये झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा समाविष्ट करण्यात आला आहे.कारण या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 131.74% रिटर्न्स दिले आहे.

तर गोल्डस्टोन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांना 124.62% रिटर्न्स देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

या तीन कंपन्यांच्या व्यतिरिक्त आणखीनही काही आयटी कंपन्या आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. मॅग्री सॉफ्ट लिमिटेड कंपनीने 71.95% म्हणजेच सर्वात जास्त रिटर्न्स दिले आहेत. इन्फ्रॅनिक्स सिस्टम्स लिमिटेडने 64.18% तर इंटिग्रा दूरसंचार आणि सॉफ्टवेअर लिमिटेडने 62.35% इतका परतावा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com