पेटीएमने 'ट्रान्झिट कार्ड' केले लाँच; कार्ड एक कामे अनेक

पेटीएम ट्रान्झिट कार्ड (Paytm transit card) दररोज वापरणाऱ्या आणि अखंड कनेक्टिव्हिटीचा अनुभव घेणाऱ्या जवळपास 50 लाख प्रवाशांना उपयोगी असेल.
Paytm
Paytm Dainik Gomantak

पेटीएम (Paytm) पेमेंट्स बँक लिमिटेडकडून सोमवारी एक राष्ट्र, एक कार्ड या संकल्पनेला अनुसरून पेटीएम ट्रान्झिट कार्ड (Paytm transit card) लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. हे कार्ड वापरकर्त्यांच्या दैनंदिन जीवनातील सर्व गरज भागवेल.

यामध्ये

  • मेट्रो,

  • रेल्वे,

  • राज्य सरकारी बस सेवांप्रमाणेच,

  • ऑफलाइन व्यापारी स्टोअरमध्ये भरण्यासाठी टोल आणि पार्किंग शुल्क,

  • ऑनलाइन खरेदी

यासाठी याचा वापर करण्यात वापरले जाऊ शकते. एवढेच नाही तर या कार्डद्वारे एटीएममधून पैसेही सुद्धा काढता येतील.

Paytm
तुम्ही जर नवीन बिझनेस सुरू करत असाल तर जाणून घ्या GST चे नियम

पेटीएम पेमेंट्स बँकेने (Bank) त्यांच्या एका निवेदनात सांगितले आहे की, ट्रान्झिट कार्ड लॉन्च करणे हे बँकिंग आणि व्यवहार सर्व भारतीयांसाठी अखंडित करणारी उत्पादने आणण्याच्या बँकेच्या पुढाकाराच्या अनुषंगाने आहे. पेटीएम अॅपवर कार्ड व्यवहार लागू करण्यासाठी, रिचार्ज (Recharge) करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी एक डिजिटल प्रक्रिया तयार करण्यात आली आहे. ते कार्ड वापरकर्त्यांच्या घरी वितरित केले जाईल किंवा ते विक्री केंद्रांवर खरेदी केले जाऊ शकते. प्रीपेड कार्ड थेट पेटीएम वॉलेटशी जोडण्यात येईल.

येथे आधीच आहेत कार्ड

हैदराबाद (Hyderabad) मेट्रो रेल्वेच्या सहकार्याने पेटीएम ट्रान्झिट कार्ड रोलआउट सुरू केले जात आहे. हैदराबादमधील वापरकर्ते आता ट्रांझिट कार्ड खरेदी करू शकतात, जे प्रवासासाठी स्वयंचलित भाडे संकलन गेटवर प्रदर्शित केले आहे. पेटीएम ट्रान्झिट कार्ड दररोज मेट्रो/बस/ट्रेन सेवा वापरणाऱ्या आणि अखंड कनेक्टिव्हिटीचा अनुभव घेणाऱ्या जवळपास 50 लाख प्रवाशांना उपयोगी असेल.

Paytm
सेन्सेक्समध्ये 'या' टॉप 9 कंपन्या तोट्यात

तसेच, दिल्ली एअरपोर्ट (Delhi Airport) एक्स्प्रेस लाईन आणि अहमदाबाद मेट्रोमध्ये हे कार्ड सुरू झाले आहेत. पेटीएम ट्रान्झिट कार्डसह, लोक तेच कार्ड महानगरांमध्ये तसेच देशभरातील इतर मेट्रो स्थानकांवर या कार्डचा वापर करता येईल.

पेटीएम पेमेंट्स बँकेचे एमडी आणि सीईओ सतीश गुप्ता म्हणाले की, पेटीएम ट्रान्झिट कार्ड सुरू केल्यामुळे लाखो भारतीय एकाच कार्डद्वारे सर्व कामे करू शकतील. या कार्डमध्ये बँकिंग गरजा आणि वाहतुकीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. बँकेने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील 280 हून अधिक टोलनाके डिजिटल पद्धतीने टोल शुल्क जमा करण्यासाठी सक्षम केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com