सेन्सेक्समध्ये 'या' टॉप 9 कंपन्या तोट्यात

गेल्या आठवड्यात BSE च्या 30 शेअर्सच्या निर्देशांक सेन्सेक्सने 2,528.86 अंकांची किंवा 4.24 टक्क्यांची घसरण नोंदवली.
Share Market
Share Market Dainik Gomantak
Published on
Updated on

सेन्सेक्समधील आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी (companies) नऊ कंपन्यांचे भांडवल मागच्या आठवड्यामध्ये 2,62,146.32 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) यांना मात्र याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात BSE च्या 30 शेअर्सच्या (shares) निर्देशांक सेन्सेक्सने 2,528.86 अंकांची किंवा 4.24 टक्क्यांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील प्रमुख 10 कंपन्यांपैकी भारती एअरटेल या कंपनीचेच बाजार भांडवल मागच्या आठवड्यात वाढले आहे.

बजाज फायनान्सचे बाजार भांडवल 41,518.24 कोटी रुपयांनी घसरून ते 4,10,670.50 कोटी रुपये झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 38,440.66 कोटी वरून 15,30,109.51 कोटी रुपयांवर आले.

Share Market
सेन्सेक्स 454 अंकांच्या वाढीसह झाला बंद

9 कंपन्यांचे नुकसान

त्याचप्रमाणे, इन्फोसिसची बाजार स्थिती 37,950.03 कोटी रुपयांनी घसरून 7,10,925.34 कोटी रुपये आणि HDFC (HDFC) ची बाजार स्थिती 33,067.68 कोटी रुपयांनी घसरून 4,96,168.98 कोटी रुपयांवर आली.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजारमूल्य 29,852.83 कोटी रुपयांनी घसरून 4,19,902.97 कोटी रुपये झाले. ICICI बँकेचे मूल्यांकन 28,567.03 कोटी रुपयांनी घसरून 5,01,039.91 कोटी रुपये झाले.

त्याचप्रमाणे, HDFC बँकेचे बाजार भांडवल 26,873.77 कोटी रुपयांनी घसरून 8,25,658.59 कोटी रुपये आणि हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे बाजार भांडवल 14,778.93 कोटी रुपयांनी घसरून 5,48,570.82 कोटी रुपये झाले.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ची बाजार स्थिती 11,097.15 कोटी रुपयांनी घसरून 12,74,563.64 कोटी रुपयांवर आली.

Share Market
Share Market: सेन्सेक्स इतिहासात पहिल्यांदयाच 62 हजारांच्या पार

एकच कंपनी नफ्यात

या प्रवृत्तीच्या विरोधात, भारती एअरटेलचे बाजार भांडवल 12,769.55 कोटी रुपयांनी वाढून 4,05,009.55 कोटी रुपयांवर पोहोचले.

टॉप 9 कंपन्यांची यादी

या घसरणीनंतरही रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या 10 कंपन्यांमध्ये पहिल्या स्थानावर राहिली. त्यानंतर अनुक्रमे

  • TCS

  • HDFC Bank

  • Infosys

  • Hindustan Unilever

  • ICICI Bank

  • HDFC

  • SBI

  • Bajaj Finance

  • Bharti Airtel

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com