'यांना' पीएम किसानचा आगामी 11 वा हप्ता मिळणार नाही

रु. 2000-2000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष रु. 6,000/- चे उत्पन्न समर्थन प्रदान केले जात आहे.
PM Kisan
PM KisanDainik Gomantak
Published on
Updated on

PM किसान सन्मान निधीचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) 11 वा हप्ता कधी जमा होणार? पीएम किसानच्या खात्यात पैसे येणार की नाही? एप्रिल-जुलैचा पुढचा हप्ता म्हणजे 2000 रुपये कुठेतरी लटकत आहेत का? असे सर्व प्रश्न आजकाल खेड्यातील चौपाल, चहाच्या दुकानातील शेतकऱ्यांमध्ये सर्रास पडत असणार आहेत. या प्रश्नांची योग्य उत्तरे शोधण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की राज्य सरकारांनी अद्याप मंजुरी दिलेली नाहीये. (These farmers will not get the next 11th installment of PM Kisan)

PM Kisan
Market Trading Timing: 18 एप्रिलपासून आरबीआय रेग्युलेटेड मार्केटच्या वेळेत बदल

आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना रु. 2000-2000 च्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष रु. 6,000/- चे उत्पन्न समर्थन प्रदान केले जात आहे. या योजनेंतर्गत, कोरोना महामारीच्या काळात 1.30 लाख कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत 11.78 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 1.82 लाख कोटी रुपये पाठवले गेले आहेत. तथापि, पीएम किसान पोर्टलनुसार, या योजनेत 12.50 कोटींहून अधिक शेतकरी नोंदणीकृत झाले आहेत.

पती-पत्नी या दोघांनाही हप्ता मिळू शकतो का?

अनेकदा असा प्रश्न पडतो की पती आणि पत्नी दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात का? तर याचे उत्तर नाही असे आहे, असे कोणी केले तर सरकार त्याच्याकडून वसुली करते.

करदात्यांचा हप्ता थांबेल याशिवाय शेतकरी कुटुंबात कोणताही कर भरत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. म्हणजेच पती किंवा पत्नीपैकी कोणीही गेल्या वर्षी आयकर भरला असेल, तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

PM Kisan
वैयक्तिक कर्ज घेणं पडू शकतं महाग, आधी संबंधित खर्च घ्या जाणून

त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाहीये

त्याच वेळी, जे लोक शेतीच्या कामांऐवजी इतर कामांसाठी शेतजमीन वापरत आहेत किंवा इतरांच्या शेतात शेतीची कामे करतात, परंतु ते शेताचे मालक नाहीत. अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येत नाहीये.

जर शेतकरी शेती करत असेल, पण शेत त्याच्या नावावर नसेल, तर त्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. शेत वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असले तरी त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

PM Kisan
ईव्ही आगीची सर्वात मोठी घटना, नाशिकमध्ये 20 इलेक्ट्रिक स्कूटरला आग

जर कोणी शेतजमिनीचा मालक असेल, पण तो सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त असेल, विद्यमान असेल किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल तर त्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही. आणि त्या साठी ते देखील अपात्र आहेत. व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचे कुटुंबीयही अपात्र लोकांच्या यादीत बसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com